Wedding : महाराष्ट्रीयन लग्नातील मुंडावळ्या आणि त्याचे विविध प्रकार | POPxo

मुंडावळ्या आणि त्यातील विविध प्रकार

मुंडावळ्या आणि त्यातील विविध प्रकार

महाराष्ट्रीयन लग्नातील सर्व विधी सुंदर असतात. लग्नाचा दिवस वधू-वर आणि कुटुंबियांसाठी महत्त्वपूर्ण आणि आनंदाचा असतो. लग्नाची लगबग आणि तयारी करता करता कधी लग्नाचा दिवस उजाडतो हे कळत नाही. अगदी लग्नाच्या दिवसांपर्यंत काही ना काही छोटी खरेदी प्रत्येक घरात सुरूच असतो. महाराष्ट्रीयन लग्नात आवर्जून लागणारी आणि वधू-वराचं सौंदर्य वाढवणारी गोष्ट म्हणजे मुंडावळ्या किंवा मुंडावळी.

महाराष्ट्रीयन लग्नात मस्ट असलेल्या मुंडावळ्या

महाराष्ट्रीयन लग्नात मस्ट असणाऱ्या मुंडावळ्यांमधील भरपूर प्रकार आता बाजारात मिळतात. महाराष्ट्रातील काही भागात मुंडावळ्यांऐवजी बाशिंगही बांधलं जातं. कारण मुंडावळ्यांशिवाय वधू-वरांचा लुक अपूर्ण आहे. लग्नांच्या विधींमध्ये मुंडावळ्या बांधण्याचा खास विधी असतो. लग्नाआधी ग्रहमखालाही वधू आणि वराला मुंडावळ्या बांधल्या जातात. महाराष्ट्रातील काही ठिकाणी हळदीच्या वेळी मुंडावळ्या बांधण्यात येतात. पाहूया मुंडावळ्यांचे विविध प्रकार

मुंडावळ्यांचे विविध प्रकार

बाजारात अगदी 20 रूपयांपासून ते 10,000 रूपयांपर्यंत मुंडावळ्या तुम्हाला खरेदी करता येतील.

पारंपारिक फुल मुंडावळ्या

लग्नविधींमध्ये हमखास फुलांच्या मुंडावळी किंवा मुंडावळ्या वर-वधूंना बांधल्या जातात. यामध्येही आजकाल भरपूर व्हरायटी पाहायला मिळते. ज्यामध्ये मोगरा, निशिगंधा, झेंडू आणि अष्टर फुलंही वापरली जातात. सध्या गुलाबाच्या पाकळ्यांच्या मुंडावळ्यांना जास्त मागणी आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी रूईच्या फुलांच्या मुंडावळ्याही बांधल्या जातात.

मोत्याच्या मुंडावळ्या

मोती या प्रकारात मिळणाऱ्या मुंडावळ्यांमध्ये वर सांगितल्याप्रमाणे अगदी 20 रूपयांच्या साध्या मुंडावळ्यांपासून ते अगदी ठुशीसारख्या डिझाईनच्या हजार रूपयांपर्यंतच्या मुंडावळ्याही मिळतात.

सोन्या-चांदीच्या मुंडावळ्या

गेल्या 5-6 वर्षांपासून लग्नात चांदीच्या मोत्यांच्या सोन्याचं पाणी चढवलेल्या मुंडावळ्या किंवा 1 ग्रॅम सोन्याच्या मुंडावळ्याही बऱ्याच लग्नात तुम्ही वधूवरांना घातलेल्या पाहिल्या असतील.

बाशिंग

महाराष्ट्रातील मराठवाडा आणि काही इतर भागात मुंडावळ्यांऐवजी बाशिंग बांधलं जातं. आजकाल बाशिंगमध्ये आता भरपूर व्हरायटी उपलब्ध आहे.

वेलचीच्या मुंडावळ्या

माझ्या ताईच्या लग्नात खास वेलचीपासून बनवलेल्या मुंडावळ्या वापरण्यात आल्या होत्या. पण वेलचीच्या मुंडावळ्या या वजनाला हलक्याही असतात आणि सुगंधीही. पण वेलचीच्या मुंडावळ्यांमागील प्रथा मात्र अजून कळलेली नाही.

डिझायनर मुंडावळ्या

मुंडावळ्यांमध्येही आता विविध डिझाईन्सच्या डिझायनर मुंडावळ्या तुम्हाला बाजारात मिळतात. तुम्ही अगदी तुमच्या आवडीप्रमाणे कस्टमाईज्ड मुंडावळ्याही बनवून घेऊ शकता.

खड्याच्या मुंडावळ्या

आजकाल बऱ्याच लग्नात खड्याच्या किंवा सेमी प्रेशियस स्टोनच्या फॅन्सी मुंडावळ्याही पाहायला मिळतात. या मुंडावळ्या खरेदी करायच्या असतील तर खालील आम्ही वेबसाईटची नावं दिली आहेत. तिथे तुम्हाला या मुंडावळ्या लग्नाआधी खरेदी करता येतील. 

इथे खरेदी करा युनिक मुंडावळ्या

मुंबईत दादर आणि गिरगावला गेल्यास तुम्हाला पारंपारिक प्रकारच्या मुंडावळ्या खरेदी करता येतील. ज्यामध्ये मोत्याच्या मुंडावळ्या तुम्हाला प्रामुख्याने खरेदी करता येतील. फुलांच्या मुंडावळ्या खरेदी करण्यासाठीही तुम्ही दादर फुल मार्केटमध्ये खरेदी करू शकता. बरेचदा लग्नाच्या हॉलमध्ये संपूर्ण पॅकेजमध्ये फुलांच्या मुंडावळ्याही तुम्हाला दिल्या जातात. 

आद्या या वेबसाईटवर तुम्हाला अगदी योग्य दरातील आणि चांगल्या दर्जाच्या कॉपर बेस्ड असलेल्या गोल्ड प्लेटेड मुंडावळ्या खरेदी करता येतील.

जर तुम्हाला लग्नात डिझाईनर मुंडावळ्या घालायच्या असतील तर तुम्ही अनुराधा आर्ट ज्वेलरीच्या वेबसाईटला भेट देऊ शकता. त्यांच्याकडे बाशिंग आणि मुंडावळ्या दोन्हींमध्ये भरपूर व्हरायटी उपलब्ध आहे.

वेदिक वाणी या वेबसाईटवर लग्नाचं सर्व सामान तर मिळतंच पण  हटके प्रकारातल्या ठुशी प्रकारातल्या मुंडावळ्या तुम्हाला यावर खरेदी करता येतील. पाहण्यासाठी इथे क्लिक करा. 

आवडले का तुम्हालाही हे मुंडावळ्यांचे विविध प्रकार. तुमच्याकडेही मुंडावळ्या किंवा बाशिंगाची वेगळी काही प्रथा असेल तर आम्हाला नक्की लिहून पाठवा.