सेलिब्रिटींमध्ये बॅगचा हा ट्रेंड आहे सध्या व्हायरल

सेलिब्रिटींमध्ये बॅगचा हा ट्रेंड आहे सध्या व्हायरल

फॅशन जगतात दरवर्षी नवनवीन ट्रेंड्स पाहायला मिळतात. मग ते कपड्यांचे असोत किंवा अक्सेसरीजचे असोत. या ट्रेंड्सची सुरूवात होते ती सेलिब्रिटीजकडून. सध्या बॉलीवूड आणि मराठी सेलेब्समध्येही एका बॅगचा ट्रेंड व्हायरल झाल्याचं दिसून येत आहे. चला पाहूया कशी आहे ट्रेंडी बॅग आणि कोणते सेलेब्सनी ती कॅरी केली आहे.

परिणिती चोप्रा

बॉलीवूडमधील बबली गर्ल परिणिती चोप्रा फॅशनच्या बाबतीत नेहमीच अग्रेसर असते. तिच्याकडे स्वतःचं असं लक्जरी डिझाईनर बॅग्ज्स आणि फूटवेअरचं कलेक्शन आहे. नुकत्याच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये तिने कॅरी केली आहे लुई व्हिटॉनची ही बॅग. याच बॅगचा ट्रेंड सध्या सर्व सेलिब्रिटीजमध्ये आहे व्हायरल.

या फोटोमध्ये ती एअरपोर्टवर असून तिने मास्क लावला आहे. खरंतर या फोटोत तिने कोरोना व्हायरसपासून सावधान राहण्याचा संदेश दिला आहे. पण तिच्या लुककडे लक्ष गेल्याशिवाय राहत नाही. तर तिने कॅरी केलेली ही बॅग खूपच कंफर्टेंबल आणि भरपूर कप्पे असलेली आहे. जी कोणत्याही आऊटिंग आणि ट्रॅव्हलिंगसाठी आहे अगदी परफेक्ट

सोनाली कुलकर्णी

आता बॉलीवूड सेलेब्समध्ये एखादा ट्रेंड आला की, मराठी सेलेब्सही कसे मागे राहतील. कारण अशीच बॅग दिसली ती मराठीतील अप्सरा सोनाली कुलकर्णी हिच्याकडेही. सोनाली सध्या दुबई सफरीवर असून तिने शेअर केलेल्या कॅफे आणि इतर फोटोजमध्ये ही बॅग दिसून आली.

करिश्मा कपूर

View this post on Instagram

#touristlife 📸📍

A post shared by KK (@therealkarismakapoor) on

बॉलीवूडची लोलो करिश्मा कपूरचं नावं ही या बॅग ट्रेंडमध्ये सामील आहे. करिश्माच्या उदयपूरच्या पिचोला लेकच्या ट्रॅव्हलिंग पोस्टमध्ये तिने ही बॅग कॅरी केली आहे.

मिताली मयेकर

#tinypanda क्युट कपलमधील अभिनेत्री मिताली मयेकरसुद्धा तिच्या फॅशनसाठी ओळखली जाते. मग ती पारंपारिक असो वा मॉर्डन. मितालीने तिच्या हिमाचल टूरमध्ये अगदी अशीच बॅग कॅरी केली होती.

रणवीर सिंग

रणवीर सिंगच्या फॅशन सेन्सबाबत तर सगळ्यांना माहिती आहेच. त्याने नेहमीच कोणतीही फॅशन फॉलो करताना बिनधास्तपणे केली आहे. या ट्रेंडी बॅग वापरणाऱ्या सेलेब्समध्ये त्याचंही नाव आहे. नुकत्याच एका एअरपोर्ट लुक व्हिडिओमध्ये रणवीरकडे ही बॅग दिसली. जी त्याने अगदी कंफर्टेंबली कॅरी केली आहे.

तुम्हीही वापरा ही ट्रेंडी बॅग

या बॅगचा ट्रेंड 2020 मध्ये अगदी ईन आहे. या बॅगला मल्टी कंपार्टमेंट बॅग असं म्हटलं जातं. ज्याला भरपूर कप्पे असतात. त्यामुळे कुठेही बाहेर जाताना वापरण्यासाठी ही बॅग अगदी परफेक्ट आहे. ज्याच्या वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये तुम्हाला अनेक वस्तू ठेवता येतील. खासकरून भारताबाहेर फिरायला जाताना पासपोर्ट आणि इतर महत्त्वाची कागदपत्र कॅरी करण्यासाठी ही बॅग मस्त आहे. तसंच क्रॉस बॅग असल्याने तुम्हाला ती हातातही कॅरी करावी लागत नाही. त्यामुळे हातावर भारही पडत नाही आणि मस्तपैकी फिरता येतं. तुम्हालाही बॅग ब्रँडेड स्टोर्स, लोखंडवाला मार्केट किंवा लिकींग रोडला अगदी सहज विकत घेता येईल.

मग तुम्हाला आवडला का हा नवा बॅग ट्रेंड. तुम्हीही हा ट्रेंड कॅरी करा आणि ट्रेंडी दिसा. तुम्हाला अजून कोणत्या ट्रेंडबाबत #POPxoMarathi वर वाचायला आवडेल ते आम्हाला नक्की सांगा.

POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.