Table of Contents
फिरण्याची आवड असणाऱ्यांना नेहमीच हटके आणि वेगळी ठिकाणं फिरायची असतात. प्रसिद्ध ठिकाणांपेक्षा त्यांना कधीही कोणीही न पाहिलेली ठिकाणं पाहायची असतात. देशभरात अशी अनेक ठिकाणं आहेत जी आजही पर्यटनाच्या यादीत येत नाहीत. पण फार सुंदर आहेत.अशीच काही ठिकाणी महाराष्ट्रातसुद्धा आहेत. ही ठिकाणं सुंदर असूनही ती अद्याप कर्मशिअल झालेली नाहीत. अशा ठिकाणी तुम्हाला निसर्गाचे निखळ सौंदर्य पाहायला मिळेल. आम्ही अशाच काही ठिकाणांची यादी काढली आहेत. यातील काही ठिकाणी तुम्ही नक्कीच गेला असाल पण काही ठिकाणं तुमचीही राहून गेली असतील. जाणून घेऊया महाराष्ट्रातील अशीच काही अज्ञात आणि अविस्मरणीय ठिकाणं…
लोणार (Lonar)
गुगलवर ‘लोणार’ असे टाईप केल्यानंतर तुम्हाला याची भरपूर माहिती मिळेल. लोणार हे तलाव असून या तलावाचे पाणी खारे आहे. महाराष्ट्रातील बुलडाणा जिल्ह्यामध्ये हे लोणार तलाव आहे. लोणारबद्दल आणखी काही सांगायचे झाले तर उल्काघातामुळे हे तलाव तयार झाले आहे. त्यामुळे हे तलाव खास आहे.
कसे जाल? : बुलडाणाला जाण्याचा विचार तुम्ही करत असाल तर तुम्हाला येथे जाण्यासाठी अनेक गाड्या मिळतील. तुम्ही मुंबई, पुण्याहून ट्रेनने तुम्हाला या ठिकाणी जाता येईल. येथे जाण्यासाठी अनेक बस सुविधासुद्धा आहेत. बुलडाणावरुन लोणार साधारण 2 तासांवर आहे.
अंदाजित खर्च : जर तुम्ही एकटे जाणार असाल तर तुम्हाला साधारण 5 हजारांचा जास्तीत जास्त खर्च येईल. यामध्ये तुम्ही बुलडाण्यामधील इतर ठिकाणीही फिरु शकता.
तारकर्ली बीच (Tarkarli Beach)
सिंधुदूर्ग जिल्ह्यातील मालवण येथे तारकर्ली बीच हे फारच प्रसिद्ध आहे. हल्ली या समुद्र किनाऱ्याला प्रसिद्धी मिळाली असली तरी पूर्वी कोकणातील इतर किनाऱ्यांच्या तुलनेत येथे फारशी लोक जात नव्हती. पण आता इथे पर्यटकांची गर्दी असते. स्वच्छ आणि सुंदर किनारा असल्यामुळे तुम्हाला इथे नक्कीच प्रसन्न वाटेल. आता तारकर्लीमध्ये स्कुबा डायव्हिंग आणि इतर वॉटर स्पोर्टस देखील आहेत.त्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता.
कसे जाल? : हल्ली कोकणात जाण्यासाठी तुम्हाला अनेक बसेस आणि ट्रेन मिळतात. ट्रेनसाठी सगळ्या जवळचे स्टेशन आहे कुडाळ. कुडाळवरुन पुढे तारकर्लीला जाण्यासाठी गाड्या मिळतील. याशिवाय तुम्ही सावंतवाडी स्टेशनवर उतरुनही तारकर्लीचा प्रवास करु शकता. जर तुम्ही तारकर्लीला जाण्यासाठी फ्लाईटचा विचार करत असाल तर तुम्हाला गोवा एअरपोर्टशिवाय पर्याय नाही.
अंदाजित खर्च : आता तुम्ही कोकणात जाणार म्हटल्यावर फक्त तारकर्लीच फिराल तर तुम्हाला ही टूर महाग पडेल. जर तुम्ही मालवणातील अन्य काही ठिकाणंही सोबत फिरलात तर तुम्हाला 5 हजारांचा खर्च येईल.
केरळला जाण्याचा प्लॅन करताय… मग येथे नक्की जा – Kerala Tourism Places
वॅलोनी वाईनयार्ड (Vallonne Vineyard)
महाराष्ट्रातील नाशिक हे असे ठिकाण आहे जिथे परदेशी पर्यटक खास वाईन चाखण्यासाठी येतात. नाशिक पर्यटन स्थळे पाहताना या ठिकाणी असलेल्या अनेक वायनरीज पाहता येतात. पण त्यापैकी प्रसिद्ध असलेले हे वॅलोनी वाईनयार्ड. नाशिक शहरापासून 45 मिनिटांवर हे वाईनयार्ड आहे. इथे तुम्हाला वाईन्ससोबत चमचमीत खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येईल.हे ठिकाण शहरापासून लांब असल्यामुळे तुम्हाला नेटवर्क कनेक्टीव्हीटी नसेल. पण या ठिकाणी तुम्हाला नक्कीच रिलॅक्स वाटेल.
कसे जाल? : नाशिक स्टेशनवरुन तुम्हाला या ठिकाणी जाण्यासाठी अनेक पर्याय आहेत. तुम्ही या वाईनयार्डला फोन करुन येथे येण्याची सोय विचारुन घेऊ शकता.
अंदाजित खर्च : आता तुम्हाला इतर काही पाहायचे नसेल तर नाशिकमध्ये या वायनरीजमध्ये राहता येईल. त्यामुळे तुम्हाला अंदाजे 5 हजारांचा खर्च येईल. शिवाय जर तुम्ही या ठिकाणी होणाऱ्या वाईन टूरसाठी इच्छुक असाल तर याचा खर्च 400 रुपये असून तुम्हाला येथे असलेल्या वाईन त्यामध्ये चाखता येईल.
कान्होजी आंग्रे आईसलँड (Kanhoji Angre Islands)
कान्होजी आंग्रे आईसलँड या विषयी तुम्ही नक्कीच कधी ऐकलं नसेल. पण हे ठिकाण मुंबईत आहे. दक्षिण मुंबईत हे ठिकाण असून महाराष्ट्रातील अज्ञात स्थळांपैकी हे एक आहे. हे ठिकाण खांदेरी बेट म्हणून देखील ओळखले जाते. मराठा नौदलातील प्रमुख अधिकारी कान्होजी आंग्रे यांना खंदारी हे बेट मिळवण्यास अपयश मिळाले.त्यावेळी त्यांना याच बेटावर शिक्षा देण्यात आली म्हणून त्याला कान्होजी आंग्रे बेट असे नाव पडले.हे ठिकाण ब्रिटीशांनी बांधले असून येथे एक लाईट हाऊस आहे. बॉम्बे पोर्ट ट्रस्टच्या हद्दीत ही जागा येत असून 2013/ 2014 दरम्यान ही जागा पर्यटकांसाठी सुरु करण्यात आली असून 2018 पासून या ठिकाणी पर्यटकांना जाण्याची परवानगी मिळावी. येथे असलेल्या लाईट हाऊसमधून तुम्हाला मस्त मुंंबई आणि दूरवर पसरलेला समुद्र किनारा दिसेल.
कसे जाल?: मुंबई, अलिबाग तुम्हाला कुठूनही या ठिकाणी जाता येईल. या ठिकाणी जाण्यासाठी फेरी बोटची सोय आहे. खांदेरीला जाणाऱ्या फेरी बोट्स आहेत. त्यामुळे तुम्हाला अगदी सहज या ठिकाणी जाता येईल.
अंदाजित खर्च: तुम्हाला येथे प्रत्येकी 100 रुपयांवर ही खर्च येणार नाही. जो खर्च होईल तो फेरीबोटचा असेल. शिवाय तुम्ही एलिफंटा केव्हजला सुद्धा या ठिकाणाहून जाऊ शकाल त्यासाठी जो खर्च असेल तोही बजेटमध्ये बसणारा असेल.
वाचा – India Best Trekking In Marathi
कामशेत (Kamshet)
पुण्यातील मावळ तालुक्यामध्ये कामशेत हे गाव आहे. मुंबईपासून हे ठिकाण फारच जवळ आहेत. कामशेतपासून लोणावळा आणि खंडाळा काहीच अंतरावर आहे. तुम्ही अँडव्हेचर करणारे असाल तर तुमच्यासाठी हे ठिकाण बेस्ट आहे. या शिवाय कामशेतमध्ये लेणी आहेत. कार्ला लेणी, भजा लेणी,बेडसे लेणी, विजापूर किल्ला,कोंडेश्वर मंदिर, पवना लेक अशी काही ठिकाणं तुम्हाला पाहता येतील.
कसे जाल?: मुंबईपासून अगदी दोन तासांच्या अंतरावर हे ठिकाण आहे. पवना लेकच्या ठिकाणी तुम्हाला छान लेक किनारी राहता येईल. येथे खूप ठिकाणी कँम्पिन केले जाते. कपल्ससाठी हे अगदी रोमँटीक ठिकाणं आहे. तुम्हाला तुमचे खास दिवस इथे नक्की साजरे करता येतील.
अंदाजित खर्च: जर तुम्ही इथे काही दिवस घालवणार असाल तर तुम्हाला दोन ते तीन दिवसांसाठी 10 हजारांचा खर्च येईल. पण तुम्ही बजेट टूर ही आखू शकता किंवा एखाद्या ग्रुपसोबतही जाऊ शकता.
या ठिकाणी साजरे करा या वर्षीचे ‘लॉंग वीकेंड’
कोलाड (Kolad)
रायगड जिल्ह्यामध्ये कोलाड हे गाव आहे. हल्ली अॅडव्हेंचरसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. रिव्हर राफटींग करण्याची तुमची इच्छा राहून गेली असेल तर तुम्ही कोलाडला जाऊ शकता. शिवाय निसर्गाचे सुंदर फोटो तुमच्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठीही कोलाड अगदी बेस्ट ठिकाण आहे. या ठिकाणी घोसाळा किल्ला, भिरा डॅम, सुतारवाडी लेक, वाली ट्रेक, ताला फोर्ट, गायमुख, कुडा लेणी ही ठिकाणं तुम्हाला पाहता येतील.
कसे जाल? : कोलाड हे कोकणात असले तरी हे ठिकाणं फार जवळ आहे. तुम्हाला मुंबईहून अगदी दोन तासांमध्ये या ठिकाणी पोहोचता येईल. तुम्ही ट्रेन किंवा बाय रोडही या ठिकाणी राहू शकता.
अंदाजित खर्च: कोलाडला तुम्ही कुटुंबासोबत जाणार असाल तर तुम्हाला येथे राहायला हवे. तुमच्यासाठी एक लाँग वीकेंड पुरेसा आहे. तुम्हाला साधारण 5ते 7 हजारांचा खर्च येईल.
सांधण व्हॅली (Sandhan valley)
मुंबईपासून अगदी जवळ असलेले दुसरे ठिकाण म्हणजे संदान व्हॅली. साधारण 183 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण असेल. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं हे ठिकाण निसर्गसौंदर्याने नटलेले आहे. हे ठिकाण नाशिक जवळील भंडारदरा या गावामध्ये येते. रतनगड, कळसुबाई शिखर, अलंग मदन कुलंग अशी काही ठिकाणं इथे पाहण्यासारखी आहे. इथे तुम्हाला कोलाडप्रमाणेच अँडव्हेंचर करता येईल. रॅपलिंग, रिव्हर साईड कँम्पेन असा वेळ घालवता येईल.
कसे जाल? : या ठिकाणी जाण्याचा बेस्ट मार्ग म्हणजे ट्रेन. मध्य रेल्वेवरुन तुम्ही ट्रेनने कसारा स्टेशनला उतरा. कसाऱ्यावरुन तुम्हाला सांधण व्हॅलीला जाण्यासाठी तुम्हाला सामरद गावी उतरावे लागेल.
अंदाजित खर्च: साधारण 2 ते 5 हजारांचा खर्च तुमच्यासाठी पुरेसा आहे. कारण हे ठिकाण मुंबईपासून फारच जवळ आहे.
दिवेआगर बीच (Diveagar Beach)
जर तुम्हाला समुद्र किनारे आवडत असतील तर तुम्ही दिवेआगरला नक्की जायला हवे. रायगड तालुक्यातील श्रीवर्धन या ठिकाणी हे ठिकाण आहे. दिवेआगरला करण्यासाठी बरेच काही आहे. वेळास बीच, दिवेआगर चौपाटी,सुवर्ण गणेश मंदिर, आडगाव बीच,कोंडवील बीच, अरावी बीच तुम्हाला फिरता येईल.
कसे जाल?:श्रीवर्धनला जाण्यासाठी तुम्हाला ट्रेन, बस किंवा गाडी करुन जाता येईल. मुंबईपासून 180 किलोमीटर अंतरावर दिवेआगरचा समुद्र किनारा आहे. गुगल मॅपच्या मदतीने तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने तिथे जाता येईल.
अंदाजित खर्च: साधारण 10 हजारांचा खर्च तुमच्यासाठी पुरेसा आहे. तुम्ही यामध्ये बजेट हॉटेल्स शोधू शकता.त्यामुळे तुम्हाला अजून कमी पैशात ही टूर करता येईल.
सापुतरा (Saputara)
सापुतरा हे ठिकाण तुम्ही गुगल केलं तर तुम्हाला गुजरातमध्ये दिसेल आता तुम्ही म्हणाल की, महाराष्ट्रातल्या ठिकाणांमध्ये गुजरात काय करतय? तर सापुतरा हे ठिकाण नाशिक आणि गुजरातच्या बॉर्डरवर आहे. सापुतराचा सनसेट पाँईट, पिकनिक पॉईंट प्रसिद्ध आहे. या ठिकाणी असलेले ट्रायबल आर्ट प्रसिद्ध आहे. ऑक्टोबर ते फेब्रुवारी या ठिकाणी जाण्यासाठीचा बेस्ट कालावधी आहे.
कसे जाल?: मुंबईहून सापुतराला जाण्यासाठी मुंबई, अहमदाबाद मार्गे जाता येते. वाघाई या रेल्वे स्टेशनवर उतरुन तुम्हाला सापुतऱ्याचा प्रवास करता येतो. तुम्ही प्रायव्हेट गाडी करुनही या ठिकाणी जाऊ शकता.
अंदाजित खर्च: प्रत्येकी 5 ते 7 हजारांचा खर्च तुम्हाला या टूरसाठी होईल. शिवाय तुम्हाला येथे खरेदीसुद्धा करता येईल.
बोर्डी (Bordi)
मुंबईपासून काहीच अंतरावर असलेल्या पालघर जिल्ह्यातील बोर्डी हे सुंदर ठिकाण आहे. समुद्रापासून जवळ असलेले बोर्डी गाव म्हणूनच पर्यटकांना आकर्षित करते. जर तुम्ही येथील नीट माहिती काढून गेलात तर तुम्हाला येथे भरणाऱ्या चिकू महोत्सवाला जाता येईल. डहाणूचे चिकू फारच प्रसिद्ध आहे त्याचा आस्वाद घ्यायला तुम्ही जाऊ शकता. त्यामुळे तुम्ही आधी चौकशी केली तर फार उत्तम. समुद्र किनारी राहण्यासाठी तुम्हाला छान हॉटेल्स मिळतील.
कसे जाल?: पश्चिम रेल्वेवरुन तुम्हाला डहाणू स्टेशनला उतरता येईल. तेथून पुढे तुम्हाला प्रायव्हेट गाड्या करता येतील.
अंदाजित खर्च : जर तुम्ही सकाळी जाऊन संध्याकाळी परत येणार असाल तर प्रत्येकी तुम्हाला 1हजार रुपयेही खर्च येणार नाही. पण तुम्ही राहणार असाल तर तुमच्या हॉटेल निवडीनुसार या टूरचा खर्च वाढेल.
तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ)
अज्ञात ठिकाणी जाण्यासाठी नेमकी कशी तयारी करावी?
आम्ही दिलेली यादी पाहिल्यानंतर तुम्ही अगदी आरामात याची तयारी करु शकता. मुंबईपासून जवळ असलेली ठिकाणं ही प्रवासासाठी चांगली आहेत. कारण हल्ली तुम्हाला या ठिकाणी जाण्यासाठी टॅक्सी किंवा इतर सोय सहज मिळते. त्यामुळे तुम्हाला याची विशेष अशी तयारी करावी लागणार नाही. पण कोकणातील काही ठिकाणी जाताना मात्र तुम्हाला रिजर्व्हेशन करावे लागेल.
महाराष्ट्रातील अशा अज्ञात ठिकाणी जाणे सुरक्षित आहेत का?
महाराष्ट्रातील ही स्थळं अज्ञात असली तरी असुरक्षित नाहीत. अनेक ठिकाण ही गावांमध्येच आहेत. त्या स्थळांना प्रसिद्धी न मिळाल्यामुळे तुम्हाला इतर पर्यटन स्थळांप्रमाणे इथे गर्दी आहे असे वाटणार नाही. पण अशा अज्ञात ठिकाणी जाताना तुम्हाला थोडी काळजी घेणे गरजेचे असते. तुमच्यासोबत खाण्यापिण्याच्या आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काही गोष्टी हव्यात. तुम्ही जर स्थानिकांचे योग्य मार्गदर्शन घेतले तर तुम्हाला अडचणी येणार नाहीत.
टूर कंपनीज अशा प्रकारच्या अज्ञात स्थळांसाठी टूर प्लॅन करतात का?
हल्ली अनेक तरुण मुलं अशा Hidden जागांना भेट देण्यासाठी टूर प्लॅन करतात. अगदी दोन ते तीन दिवसांसाठी या छोट्या टूर प्लॅन केल्या जातात. तुम्हाला याची माहिती इन्स्टाग्राम, फेसबुकवर मिळतील. पण कोणतीही खातरजमा केल्याशिवाय तुम्ही जाऊ नका. एखाद्या विश्वासू ग्रुप मिळाल्याशिवाय तुम्ही जाऊ नका. पण तुम्हाला हल्ली अनेक असे ग्रुप शोधता येतील.
आता तुम्हालाही या ठिकाणांची माहिती वाचल्यानंतर येथे जायचे असेल तर लगेचच प्लॅनिंग करा.
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.