पैठणी साडी म्हटले की प्रत्येक महिलेसाठी खास विषय. त्यातही येवला पैठणी, कापसे पैठणी या तर प्रसिद्ध आहेतच. पूर्वी पैठणी साड्यांचे जास्त डिझाईन्स नव्हते. पण आता पैठणी साड्यांचे डिझाईन वेगवेगळ्या पद्धतीत समोर येऊ लागले आहे आणि त्यामुळे महिलांना पैठणी साड्यांमध्ये वेगवेगळ्या व्हरायटी मिळू लागल्या आहेत. साड्यांचे प्रकार वेगवेगळे आहेत पण त्यापैकी सर्वात प्रसिद्ध साडी असलेल्या या मराठमोळ्या पैठणीचे विविध डिझाईन्स नक्की कोणते आहेत, पैठणीचे प्रकार कोणते आहेत, येवला पैठणी साडी किंमत, सेमी पैठणी साडी किंमत, कापसे पैठणी येवला किंमत, पेशवाई पैठणी किंमत, पैठणी साडी कलर, पैठणी कशी ओळखावी हे सर्व आपण या लेखातून पाहणार आहोत. पैठणी साडी पाहण्याआधी ती कशी ओळखावी हे आपण आधी जाणून घेऊया.
खरी पैठणी आणि सेमी पैठणीमधील फरक हा साडी उलटी करून पाहिल्यावर समजतो. पैठणीवरील जरीचं विणकाम, मोर, नक्षीकाम उलट बाजून बघितल्यावर मशीनवर केलेले विणकाम हे वेगळे दिसते. हातमागावर विणलेले साडी उलट्या बाजूनेही वेेगळी दिसत नाही. हीच खरी पैठणी. हातमागावर विणलेल्या साडीची बॉर्डर ही पुढून आणि मागून दोन्ही बाजूने सारखीच दिसते. तर सेमीपैठणीमध्ये मागच्या बाजूला जाळी दिसून येते. ज्यांना पैठणी साड्या घेणे परवडत नाही ते सेमी पैठणी साडी घेतात. सेमी पैठणी साडी किंमत ही त्यामानाने कमी असते. साधारण 1500 पासून या साड्या मिळतात.
पैठणी दोन पद्धतीच्या असतात. पैठण ही पुरातन काळी महाराष्ट्राची राजधानी होती. पैठणमध्ये तयार होणारी वैशिष्ट्यपूर्ण साडी म्हणजे 'पैठणी'. चौकोनी नक्षी तसेच पदरावरील मोराच्या नक्षीमुळे पैठणी लगेच ओळखू येते. भारतातील सर्वात महागड्या साड्यांपैकी एक मानली जाते. ही भारतातील सर्वात प्रसिद्ध साड्यांपैकी एक आहे. ही भारतातील उत्कृष्ट रेशीमपासून बनविली जाते. आजही पैठणी साडी ही महाराष्ट्राची शान आहे. कोणत्याही समारंभात पैठणी साडीला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. त्यातही येवल्याची पैठणी ही जास्त प्रसिद्ध आहे. आपण त्याचे प्रकार पाहू.
पैठणी साड्या दाखवा असे दुकानात गेल्यानंतर सांगितल्यानंतर आजही सर्वात प्रथम पारंपरिक पैठणीच दाखवण्यात येतात. कारण या पैठणी जास्त विकत घेतल्या जातात. आजकाल जी पैठणी मिळते ती बऱ्याचदा मशीनमेड असते. पण खरी पैठणी मात्र पूर्णतः ताग्यावर विणली जात असे. एकेकाळी पैठणीसाठी चीनहून सिल्कचे धागे येत असत. तसंच पैठणीच्या पदरावरील जरीकामात खऱ्या सोन्याचे आणि चांदीचे धागे वापरून विणकाम केले जात असते. आज मात्र या साडीसाठी बंगळूरचे मलबेरी सिल्क किंवा सुरतहून आलेली जर विणकामसाठी वापरली जाते. एक सहावारी पैठणी विणण्यासाठी तब्बल 500 ग्रॅम सिल्क धागे आणि 250 ग्रॅम जर लागते तर नऊवारी विणण्यासाठी जास्त कच्चा माल लागतो. खरी पैठणीचं वैशिष्ट्य म्हणजे ती दोन्ही बाजूंनी अगदी सारखी दिसते. हो अगदी बॉर्डर आणि पदरही. खऱ्या ताग्यावर विणलेल्या पैठणीची हीच ओळख आहे. तसंच खऱ्या पैठणीची जर कधीही काळी पडत नाही.
पारंपारिक पैठणीवर फक्त पदरावरच नक्षीकाम असते तर ब्रोकेड पैठणीवर संपूर्ण साडीवर नक्षीकाम केलेले आढळते. आजकाल मॉर्डन पैठणीही बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. तसंच कमी किंमत असल्यामुळे सेमी पैठण्यांनाही भरपूर मागणी आहे. पैठणी साडीतील पेशवाई, गंधर्व ही नावं अलीकडे प्रचारात आली असून हे प्रकार पारंपरिक पैठणीत मोडत नाहीत. पैठणी साडीची डिझाईन्स (Designs of Paithani) आता पाहूया
पैठणी साडी म्हटली की आपले डोळे आपोआपच चमकतात. पैठणी साडी नक्की कशी असावी, त्याचा पदर कसा असावा, त्याचे डिझाईन्स कसे असावे या सगळ्याचा विचार आपण पैठणी घेताना करत असतो. पण पैठणी घेताना तरीही गोंधळ उडतो. नक्की कोणते डिझाईन कसे असते हे बऱ्याच जणांना माहीत नसते. आम्ही तुमच्यासाठी याच डिझाईन्सची माहिती आणली आहे. पैठणीमध्ये अनेक डिझाईन्स आहेत आणि त्याची माहिती पुढीलप्रमाणे. म्हणजे पैठणी घेताना आता तुमचाही गोंधळ उडणार नाही.
हा पैठणी साडीचा पारंपरिक प्रकार आहे. यावर असणारे जरीचे काम हे दिसायला अतिशय सुंदर दिसते आणि ही पैठणी सिल्कची असून याच्या बॉर्डर आणि पदरावर सहसा जांभळ्या आणि गुलाबी रंगाच्या फुलांचे डिझाईन्स असते. याच्या बॉर्डरवर असणारे डिझाईन हे अधिक आकर्षक असून या संपूर्ण पैठणी साडीवर पोलका डॉट्सचे काम करण्यात आलेले दिसून येते.
किंमत - 3900 च्या पुढे सुरू
Popxo Recommends - फ्लॉवर डिझाईन पैठणी, ₹ 1,499/- , इथे खरेदी करा
आजकाल पैठणीच्या अनेक डिझाईन्स येत आहेत. त्यापैकी गोल्डन डिझाईन बॉर्डर पैठणीला बरीच मागणी आहे. या प्रकारच्या डिझाईन्समध्ये फिकट रंगाचा इफेक्ट दिला असून विविध रंगाच्या बॉर्डर याला देण्यात येतात. ज्या रंगाची साडी आहे त्यावर गोल्डन अर्थात सोनेरी रंगाने इफेक्ट देण्यात येतो. याची बॉर्डर हातमागावर विणलेली असून यावर आणि पदरावर असणारा मोर हे याचे प्रमुख आकर्षण आहे. याचा पदर आणि बॉर्डर हेच याचं आकर्षण आहे. या साडीबरोबर कॉन्ट्रास्ट रंगाचा ब्लाऊज अधिक चांगला शोभून दिसतो.
किंमत - 5000 च्या पुढे सुरू
Popxo Recommends - गोल्डन डिझाईन बॉर्डर पैठणी, ₹ 4,999/- , इथे खरेदी करा
पैठणीमधील महागड्या स्वरूपाची ही साडी आहे. ज्या महिलांना पारंपरिक लुक हवा आणि हातमागावर विणलेली प्युअर पैठणी ज्याना नेसायची आहे त्यांच्यासाठी हे डिझाईन्स बनविण्यात येतात. या साड्या बनविण्यासाठी खूप वेळ लागतो. त्यामुळे यामध्ये प्रचंड मेहनत आहे. म्हणूनच याच्या किमतीही जास्त असतात. यावर जरीचे काम आणि कलाकुसर तुम्हाला अधिक प्रमाणात दिसते. त्यासाठी खूप वेळ लागतो. तसेच कामगारांची अधिक मेहनतही लागते.
किंमत - 10000 च्या पुढे
येवला हँडलूम पैठणी साडी - 20000 च्या पुढे
Popxo Recommends - हँडलूम पैठणी, ₹ 9,169/-, इथे खरेदी करा
पैठणी साडी कलर काही ठराविक असतात अथवा काही ठराविक वापरण्यात येतात. पण प्रिंटेड पैठणीमध्ये तुम्हाला वेगवेगळे रंग निवडता येतात. यावर असणारी प्रिंट तुम्हाला अधिक आकर्षित करते. तुम्हाला केवळ बुट्ट्या अथवा मोर नको असतील तर तुम्ही अशा प्रकारचे प्रिंटेड पैठणी आर्ट सिल्क डिझाईन निवडू शकता.
किंमत - 5000 च्या पुढे
Popxo Recommends - प्रिंटेड पैठणी आर्ट सिल्क साडी, ₹ 3,210, इथे खरेदी करा
‘पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा’ हे गाणं सगळ्यांनाच माहीत आहे. असाच हेव्ही पल्लू असणारे डिझाईन्स पैठणीमध्ये आहेत. पैठणीचा पदर हे त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य असते. त्यामुळे त्याचा पदर जास्त जड अर्थात हेव्ही असेल तर ती पैठणी अधिक उठवदार दिसते. हे डिझाईन बऱ्याच जणींनी आवडते. या डिझाईन्सना बाजारामध्ये जास्त मागणीही दिसून येते.
किंमत - 5000 च्या पुढे
Popxo Recommends - हेव्ही पल्लू पैठणी, ₹ 1,694, इथे खरेदी करा
कितीही आधुनिकता येऊ दे. पण प्युअर पैठणीची मागणी काही कमी होत नाही. प्रत्येकाला आपल्या वॉर्डरोबमध्ये एक प्युअर पैठणी असायलाच हवी असे नक्कीच वाटत असते. या साडीची किंमत महाग असते. त्याशिवाय याची बॉर्डर आणि त्यावरील कलाकुसर याला जास्त महत्त्व देण्यात आले आहे. त्यामुळे ही साडी दिसायला जितकी आकर्षक दिसते त्याहीपेक्षा ती नेसल्यावर त्याला अधिक जास्त शोभा येते.
किंमत - 7000 च्या पुढे
Popxo Recommends - प्युअर पैठणी सिल्क साडी, ₹ 13,729/- , इथे खरेदी करा
लग्नातील साड्यांचा पुनर्वापर करून बनवा नवे डिझाईन्स
साडीवर मीना बुटीज आणि पिकॉक अर्थात मोर असतात. ही साडी बऱ्यापैकी जड असते. पैठणीमधील सुंदर आणि आकर्षक अशी ही साडी असते. हे डिझाईन्स सहसा लग्नामध्ये जास्त प्रमाणात वापरण्यात येतात. यावरील मीना बुटीज अगदी उठून दिसतात.
किंमत - 4000 च्या पुढे
Popxo Recommends - मीना बुटीज आणि पिकॉक स्टाईल, ₹ 16,500/- , इथे खरेदी करा
गडद रंग आणि यावरील जरीची कलाकुसर यानेच ही साडी मन जिंकून घेते. पैठणी सिल्क ही महाराष्ट्रात जास्त प्रसिद्ध आहे. हे डिझाईन बऱ्याच जणींना आवडतं. पैठणी सिल्कमध्ये अनेक व्हरायटी असतात. त्याचप्रमाणे यामध्ये तुम्हाला वेगवेगळे रंगही उपलब्ध होतात. सहसा मुंज, लग्न, बारसे यासारख्या सणसमारंभाला याप्रकारच्या पैठणी सिल्क साड्या नेसण्यात येतात. कापसे पैठणी सिल्क साडी जास्त चांगली असल्याचंही म्हटलं जातं.
किंमत - 2000 च्या पुढे
Popxo Recommends - पैठणी सिल्क, ₹ 2,309/- , इथे खरेदी करा
सध्या लग्नामध्ये सर्वात जास्त ट्रेंडमध्ये आहे ते पेशवाई पैठणीचे डिझाईन. दिसायला सुंदर आणि नेसायलाही तितकीच हलकी आणि आकर्षक असणारी पेशवाई ही बऱ्याच जणांना आवडत आहे. हे डिझाईन खरे तर अनेक वर्षांपासूनचे आहे पण त्याला आता पुन्हा एकदा नवी झळाळी मिळाली आहे. बॉलीवूडमधील ऐतिहासिक चित्रपटांमध्ये अशा प्रकारची पेशवाई पैठणी जास्त प्रमाणात नेसली गेल्याचे आढळते.
किंमत - 3000 च्या पुढे
Popxo Recommends - पेशवाई पैठणी , ₹ 2,500/- , इथे खरेदी करा
काही जणींंना पारंपरिक पैठणी आवडत नाही तर त्यांच्यासाठी डिझाईनर पैठणी हा एक चांगला पर्याय आहे. यामध्ये साडीवर वेगवेगळे प्रयोग करण्यात येतात. गडद रंगाच्या या पैठणीवर वेगवेगळे डिझाईन्स असतात. जे पारंपारिकता आणि आधुनिकता याचा एक योग्य मेळ आहे.
किंमत - 3000 च्या पुढे
Popxo Recommends - डिझाईनर पैठणी, ₹ 3,399/- , इथे खरेदी करा
महाराष्ट्राचं महावस्त्र पैठणी (Everything About Maharashtrian Paithani Saree)
पैठणीमध्ये ही सर्वात महाग साडी म्हणून ओळखण्यात येते. या साडीचे खास डिझााईन म्हणजे याची बॉर्डर. इतर सर्व पैठणीपेक्षा याची बॉर्डर मोठी आणि भरजरी असते. त्यामुळेच याला महाराणी असंही म्हणण्यात येते. त्याशिवाय या साडीची किंमत सर्व पैठणीपेक्षा महाग असते. ही साडी नेसायलाही बऱ्यापैकी जड असते. पण यामध्ये वेगवेगळे रंग तुम्हाला उपलब्ध आहेत.
किंमत - 10000 च्या पुढे
Popxo Recommends - महाराणी पैठणी, ₹ 13,500/- , इथे खरेदी करा
हातमगावरील पैठणी ही अगदी कलाकुसरीची असते. त्यातही त्याला जरीची बॉर्डर असेल तर ती अधिक आकर्षक दिसते. जरी बॉर्डर पैठणीला जास्त मागणी आहे. येवला पैठणी आणि कापसे पैठणी येथे ही साडी जास्त प्रमाणात मिळते. लग्नासाठी खास ऑर्डर देऊन हे डिझाईन बनवूनही घेतले जाते.
किंमत - 6000 च्या पुढे
Popxo Recommends - जरी बॉर्डर हातमागावरील पैठणी, ₹ 44,100/- , इथे खरेदी करा
हल्ली पैठणीवर वेगवेगळे रंग असण्याचे नवे डिझाईन आले आहे. पारंपरिक आणि आधुनिक असा मेळ घालून मल्टी कलर पल्लू पैठणी आपल्याला बाजारात बघायला मिळते. पैठणी साडी कलर अनेक असतात पण ते असे एकत्र करून अधिक सुंदर दिसतात. पैठणीचा पल्लू अर्थात पदर हा सर्वात महत्त्वाचा असतो. त्यामुळे त्यावर जितकी अधिक रंगसंगती तितकी ती साडी अधिक खुलून दिसते.
किंमत - 7000 च्या पुढे
Popxo Recommends - मल्टी कलर पल्लू पैठणी, ₹ 2,749/- , इथे खरेदी करा
खऱ्या जरीच्या अर्थात खऱ्या सोन्याच्या तारेने भरलेल्या पैठणी साड्या हे तर एक स्वप्नच असतं. खऱ्या जरीची साडी आणि त्यावर अगदी लहान बुट्टे हे पैठणीचे पारंपरिक डिझाईन आहे. अनेक पैठणी अशा असतात. त्याची किंमतही जास्त असते. त्यामुळे ही साडी खरेदी करताना बराच विचार करावा लागतो. पण ही साडी एकदा नेसली की ती नक्कीच तुमचं सौंदर्य खुलवते.
किंमत - 10000 च्या पुढे
Popxo Recommends - मल्टी कलर पल्लू पैठणी, ₹ 16,897/- , इथे खरेदी करा
प्युअर पैठणी ही कॉटनमध्येही असते आणि प्युअर सिल्क पैठणीची शानच काही वेगळी असते. याची बॉर्डर आणि जर ही अतिशय आकर्षक असते. त्याशिवाय लग्नामध्ये नवऱ्या मुलीसाठी सहसा ही साडी घेतली जाते. नवरीचे सौंदर्य डिझाईनच्या साडीमध्ये अधिक खुलून दिसते.
किंमत - 7000 च्या पुढे
Popxo Recommends - प्युअर सिल्क पैठणी, ₹ 15,141/- , इथे खरेदी करा
1. पैठणीची काही विशिष्ट किंमत असते का?
पैठणीची किंमत ही सहसा जास्त असते. जी पैठणी कमी किमतीत मिळत असेल ती खरी पैठणी नक्कीच नाही. विशिष्ट किंमत अशी नसते. पण खरी पैठणी ही महाग मिळते.
2. उत्कृष्ट पैठणी कुठून मिळेल?
येवला, पैठण येथून उत्कृष्ट पैठणी मिळते. कापसे पैठणीदेखील पैठणीसाठी प्रसिद्ध आहे. त्याशिवाय येवलाला गेल्यानंतर तुम्हाला अनेक ठिकाणी उत्कृष्ट पैठणी मिळतील.
3. कोणती पैठणी नेसायला अधिक सुंदर आहे?
तशा तर सर्वच पैठणी नेसल्यावर सुंदर आणि आकर्षक दिसतात. पण त्यातही तुम्ही पारंपरिक पैठणी नेसली तर ती नेसायला अधिक सुंदर दिसते.
4. लग्नामध्ये कोणत्या रंगाची पैठणी अधिक शोभून दिसेल?
लग्नसमारंभामध्ये डार्क अर्थात गडद रंगाच्या पैठणी अधिक शोभून दिसतील. यामध्ये लाल, हिरवा, जांभळा, गुलाबी या रंगाचा समावेश आहे. आता वेगवेगळे रंगदेखील यामध्ये येऊ लागले आहेत. पण गडद रंगाच्या पैठणी नक्कीच आकर्षक दिसतात.
5. येवला आणि औरंगाबादमधील पैठणीमध्ये काही फरक आहे का?
येवला आणि औरंगाबादमधील पैठण या दोन्ही ठिकाणी उत्कृष्ट पैठणी मिळतात. फरक असलाच तर तो फक्त किमतीत तुम्हाला जाणवेल. अन्यथा त्याच्या दर्जामध्ये तुम्हाला कोणताही फरक जाणवणार नाही. तुम्हाला या दोन्ही ठिकाणी उत्तम दर्जाच्या पैठणीच मिळतील.
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.
You Might Like This:
‘या’ साड्यांशिवाय महाराष्ट्रीयन लग्न अपूर्णच (Maharashtrian Bridal Sarees)