ADVERTISEMENT
home / Recipes
तुम्ही बनवलेले कांदे पोहे होतील परफेक्ट तेही दोन मिनिटात, वाचा कसे

तुम्ही बनवलेले कांदे पोहे होतील परफेक्ट तेही दोन मिनिटात, वाचा कसे

प्रत्येक महाराष्ट्रीयन घरात सकाळी नाश्त्याला अगदी आवर्जुन केले जातात ते म्हणजे ‘कांदे पोहे’. अनेकांच्या दिवसाची सुरुवात ही पोहे खाऊनच होत असते.आपल्याकडे अगदी लग्नाच्या बोलणीलासुद्धा आपण ‘कांदापोह्यांचा’ कार्यक्रम म्हणतो. पूर्वी तर या कांदापोह्यांच्या चवीवरुनच मुलीच्या घरातील चव कळायची असे म्हटले जाते. आता एकूणच काय पोहे हा कधीही, कुठेही खाण्यासारखा मराठमोळा पदार्थ आहे.  पोहे बनवायला सोपे असतात. पोहे बनवायला सोपे असले तरी अनेकदा काहींचे पोहे कायमच बिनसतात. काहींचे पोहे पाणचट होतात. काहींचे पोहे कडक, तर काहींचे पोहे खूपच तिखट नाहीतर फिकट… आता इतक्या सोप्य रेसिपीमध्येही इतक्या चुका होत असतील तर तुमची बनवण्याची पद्धत काही तरी चुकत आहे. आज आपण जाणून घेऊया परफेक्ट पोहे होण्यासाठी काय करावे ते

अशा पद्धतीने तयारी केलीत तर तुमची बिर्याणी नेहमीच होईल बेस्ट

पोह्यांची निवड

असे  निवडा पोहे

shutterstock

ADVERTISEMENT
  • कांदे पोहे बनवण्यासाठी तुम्ही वापरणार असलेले पोहे महत्वाचे असतात. बाजारात पोह्यांचे अनेक प्रकार मिळतात. जाड पोहे, पातळ पोहे यातील रोजच्या वापरासाठी आपण जाड पोहे वापरत असतो. 
  • जाड पोहे हे ओळखायला फार सोपे असतात. तुम्हाला नुसत्या डोळ्यांनीसुद्धा हे ओळखता येतात. जर तुम्हाला तरीही कळत नसतील तर जाड पोह्याचा आकार थोडा लांब असतो तर पातळ पोहे हे अगदीच पारदर्शक आणि एकदम चपटे असतात. हे पोहे हातात घेतल्यानंतर तुम्हाला साधारण आरपार दिसू शकते. 

अशी करा पोह्यांची तयारी

अशी करा तयारी

Instagram

मी उत्तम पोहे करते असा दावा मी करणार नाही. पण मी जिच्याकडून शिकले ती उत्तम पोहे करते. तिचे पोहे प्रत्येकवेळी परफेक्ट होतात. गरम गरम, लुसलुशीत आणि  परफेक्ट चवीचे हे पोहे तयार करण्यासाठी तुम्ही काय पूर्वतयारी करायला हवी ते पाहुया

  • पोहे हा पटकन तयार होणारा पदार्थ आहे. याची थोडी पूर्वतयारी केली की, गोंधळ होत नाही. 
  • आता ही पूर्वतयारी फार मोठी नाही. पण पोह्यांना फोडणी देताना काही गोष्टी जवळ असणे फारच गरजेचे असते. 
  • फोडणीचे साहित्य म्हणजे कडिपत्ता, मोहरी, मिरची, कांदा आणि हळद. या व्यतिरिक्त काही हवे असेल तर काही थोडीशी साखर आणि चवीपुरते मीठ. 
  • सगळे साहित्य एकत्र केल्यानंतर तुम्ही पोहे भिजत घाला. कारण ते जास्त भिजता कामा नये. 

इडली-डोशाचे बॅटर बिघडत असेल तर तुम्ही करत आहात या चुका

ADVERTISEMENT

पोह्यांना फोडणी देताना

असे तयार करा पोहे

Instagram

  • पोह्यांसाठी फोडणीचे साहित्य एकत्र केल्यानंतर फोडणी घालण्याचा अगदी 2 ते 5 मिनिटं आधी तुम्ही पोहे भिजवा.
  • अनेक जण पोहे तसेच भिजत ठेवतात. त्यामुळे त्यांचे पोहे पाणचट होतात. त्यामुळे पहिली महत्वाची टिप अशी की, पोहे जास्त वेळ आणि खूप पाण्यात भिजवू नका. 
  • पोहे भिजल्यानंतर ते छान गाळून त्यातील पाणी काढून बाजूला मोकळे करुन ठेवा. म्हणजे पोह्यांचा गोळा होत नाही. त्यातच तुम्ही हळद घातली तर ती पोह्यांना चांगली लागते. 
  • फोडणीसाठी तेल गरम केल्यानंतर त्यामध्ये कडिपत्त्याची पानं, मोहरी, मिरची, कांदा घाला.( काही जण फोडणी खूप करतात. तसे करु नका. मोहरी चांगली लागत असली तरी ती सतत प्रत्येक घासाला दाताखाली आल्यानंतर कडू लागते.  कांदाही खूप झाला की, पोह्याची चव बदलते. त्यामुळे जरा मोजून मापून घाला) 
  • फोडणी करपू न देता त्यामध्ये हळद घातलेले भिजवलेले पोहे घाला.जर तुम्ही कांदा घालत नसाल तरी ठिक आहे. कांदा घालणार असाल तर तो पारदर्शक होईपर्यंतच परता. त्यानंतर पोहे घाला. पोहे फोडणीत परतून त्यात मीठ घाला. 
  • पाण्याचा हबका देऊन त्यावर थोडी साखर पेरा. आणि गॅस मंद करुन पोहे साधारण 3 ते 4 मिनिटं शिजू दया.
  •  पाण्याचा हबका मारल्याने आणि साखर घातल्यामुळे पोह्यामध्ये ओलावा आणि आवश्यक असलेला थोडासा गोडवा येतो.
  • आता काहींना यामध्ये शेंगदाणे आवडतात. आता तुम्ही शेंगदाणे कढईत तेल घेतल्यानंतर फ्राय करुन घ्या. आच मंद करुन मग उर्वरित फोडणी घाला. पण शेंगदाणे आणि फोडणी दोन्ही करपू देऊ नका.
  •  पोहे छान फुललेले दिसले की, गॅस बंद करा. पोहे वाढताना वर ओलं खोबरं, कोथिंबीर आवडत असल्यास भुरभुरा. 
    पण हे पोहे इतके छान फुलतात की, तुम्हाला ते लगेचच खावेसे वाटतील. 

आता अशा पद्धतीने पोहे करा आणि आम्हालाही कळवा तुमचे कांदे पोहे कसे झाले ते. 

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे  20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

ADVERTISEMENT

देखील वाचा – 

महाराष्ट्रीयन थाळीमध्ये हे पदार्थ करा समाविष्ट

19 Feb 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT