ADVERTISEMENT
home / Diet
यासाठी आहारात असाव्यात या सुपरसीड्स

यासाठी आहारात असाव्यात या सुपरसीड्स

 

आजकालच्या अती धावपळीच्या काळात प्रत्येकाने आपल्या आहाराबाबत सावध असणं फार गरजेचं आहे. मात्र या महत्त्वाच्या गोष्टीकडे नेहमीच सर्व दुर्लक्ष करतात. म्हणूनच पोषकतत्त्व भरपूर असलेले पदार्थ आहारात असतील तर तुमच्या शरीराचं पोषण चांगलं होतं. यासाठी तुमच्या आहारात मिनरल्स, व्हिटॅमिन्स, प्रोटिन्स, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि अॅंटि ऑक्सिडंट युक्त पदार्थ असतील याची काळजी घ्या. खरंतर आपल्या किचनमध्येच असे अनेक टाकाऊ पदार्थ असतात जे आरोग्यासाठी अतिशय उत्तम ठरतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे काही फळांच्या आणि भाज्यांमधील बिया. या बिया आपण बऱ्याचदा फेकून देतो. मात्र जर तुम्ही या बियांचा वापर आहारात अथवा स्वयंपाकात केला तर तुम्हाला त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. यासाठी जाणून घ्या कोणत्या बिया तुमच्यासाठी ठरू शकतात सुपरसीड

Shutterstock

या आहेत काही पौष्टिक सुपरसीड्स –

 

काही फळांमधील अथवा भाज्यांमधील बियांना सूपरसीड म्हटले जाते. याचे कारण या बियांमध्ये अनेक पोषकतत्त्वं असतात. आळशी, भोपळ्याच्या बिया, टरबूजाच्या बिया, हलीम, तीळ, तुळशीच्या बिया, सब्जा, मेथी, धणे अशा अनेक बियांच्या आपल्या आहारात समावेश असायलाच हवा. यातील काही बिया गोड पदार्थांची सजावट करण्यासाठीही वापरल्या जातात. सहाजिकच या  बिया आपल्या घरात सहज उपलब्ध असतात. यासाठीच या बियांमधील पोषकतत्त्व जरूर जाणून घ्या.

 

ADVERTISEMENT

भोपळ्याच्या बिया –

भोपळा ही भाजी बऱ्याचदा घरात केली जाते. भाजी चिरल्यावर त्यातील बिया मात्र आपण टाकून देतो. मात्र जर या बिया सुकवून तुम्ही खाण्यासाठी वापरल्या तर त्याचे अफलातून फायदे तुम्हाला मिळू शकतात. या बियांमध्ये फॉलिक अॅसिड आणि व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणात असते. ज्यांना मूडस्वींग आणि मधुमेहाची समस्या असेल त्यांनी या बिया जरूर खाव्या. तव्यावर थोड्याशा गरम करून या बिया खाण्यामुळे त्या आणखी चविष्ठ लागतात.

फणसाच्या बिया –

अनेकांच्या घरी उन्हाळ्यात आवर्जून फणसाची भाजी केली जाते. फणसाच्या बियांना आठल्या असं म्हणतात. या बियांचीही भाजी केली जाते. या बिया उकडून अथवा भाजून खाण्यात एक वेगळीच मजा आहे. एवढंच नाही यात भरपूर पोषक घटक असतात ज्यामुळे तुमचं चांगलं पोषण होतं आणि आरोग्यासाठी फणसाचे फायदे मिळतात.

ADVERTISEMENT

टरबूजाच्या बिया –

टरबूजामध्ये अनेक अॅंटि ऑक्सिडंट असतात. ज्यामुळे हे फळ आहारात असायलाच हवं. यामुळे चेहऱ्यावरील सुरकूत्या कमी होतात. मधुमेहींसाठी टरबूज खाणं फायदेशीर ठरतं. मात्र जर याच्या बिया सुकवून आहारातून घेतल्या तर तुमचे वजन झटपट कमी होऊ शकतं.

आळशीच्या बिया –

आळशीमध्ये अनेक प्रकारची पोषकतत्त्व दडलेली आहेत. यातील प्रोटिन, फायबर, ओमेगा 3 फॅटी अॅसिड तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरतात. यासाठीच आहारात आळशीच्या बियांचा वापर जरूर करा. रजोनिवृत्ती, कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण, कॅंन्सरपासून संरक्षण, मधुमेहावर नियंत्रण, हाडे आणि स्नायुंच्या बळकटीसाठी आळशीचा वापर उपयुक्त ठरतो.

ADVERTISEMENT

 

मेथीचे दाणे –

मेथीच्या बिया स्वयंपाकासाठी नेहमीच वापरल्या जातात. मेथीच्या कडूपणामुळे कधी कधी या बिया खाण्याचा कंटाळा केला जातो. मात्र कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी, मधुमेहावर उपाय करण्यासाठी, त्वचेवरील डाग कमी करण्यासाठी मेथीच्या बिया गुणकारी असतात.

तीळाच्या बिया –

ADVERTISEMENT

तीळाच्या बियांममध्ये मॅगनीज, लोह, कॅल्शियम, फायबर, प्रोटिन्स, व्हिटमिन्स असतात. ज्यामुळे तुमची रक्तदाबाची समस्या, मधुमेह, पचनक्रियेच्या समस्या कमी होतात.

 

अशा अनेक बिया आहेत ज्या तुमच्या आहारात असण्याने तुमचा फायदाच होऊ शकतो. यासाठी त्या फेकून न देता त्यांचा स्वयंपाकात अवश्य वापर करा.

 

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

ADVERTISEMENT

हे ही वाचा –

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

अधिक वाचा –

अक्कल दाढ दुखीवर उपाय (Home Remedies For Wisdom Tooth Pain In Marathi)

ADVERTISEMENT

गुळवेल (Gulvel) म्हणजे जणू अमृतच (Benefits of Giloy In Marathi)

अशी ओळखा केमिकल-फ्री फळं How to recognize chemical free fruits

13 Feb 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT