घरातील 'या' गोष्टींमुळे पोटात असणाऱ्या बाळावर होऊ शकतात दुष्परिणाम

घरातील 'या' गोष्टींमुळे पोटात असणाऱ्या बाळावर होऊ शकतात दुष्परिणाम

तुम्ही आई-बाबा होणार आहात, ही गुड न्यूज जेव्हा तुम्हाला मिळते. तेव्हा ‘आनंद पोटात माझ्या माईना रे माईना’,अशीच काहीशी तुमची भावना असते. आई-वडील आपल्या होणाऱ्या बाळासाठी त्याच्या जन्मापूर्वीच कित्येक प्रकारचं नियोजन करत असतात. गर्भाशयात असणाऱ्या बाळाची काळजी घेण्यासाठी त्याच्या आईचीही काळजी घेणे तितकंच आवश्यक आहे. तुमचं बाळ निरोगी असावं आणि जन्माच्या नंतर घरी आल्यानंतरही त्याला/तिला कोणत्याही प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागू नये, यासाठी योग्य ती खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. आपल्या बाळाला कोणत्याही आजाराची लागण होऊ नये किंवा कशाचाही त्रास होऊ नये, यासाठी प्रत्येक आई-वडील शक्य तेवढी सर्व काळजी घेतात. पण जे दाम्पत्य पहिल्यांदा आई-वडील होण्याचा अनुभव घेणार असतात, त्यांच्याकडून कमी-अधिक प्रमाणात चुका होण्याची शक्यता असते. ज्याचा थेट परिणाम बाळाच्या आरोग्यावर होण्याचा धोका असतो.  प्रत्येक गर्भवती महिलेनं आपल्या लाइफस्टाइलमध्ये बदल करण्याची गरज असते. बाळ गर्भात असताना आणि जन्माला आल्यानंतर तिनं कॅफीन, मद्य किंवा हानिकारक जीवनशैलीपासून दूर राहिलं पाहिजे. आपल्या बाळासाठी घरामधील काही गोष्टी देखील हद्दपार कराव्या. कारण या गोष्टींमुळेही बाळाच्या आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते.

(वाचा : तुम्हाला माहिती आहे का, हेल्दी राहण्यासाठी दिवसभरात कितीदा खाल्लं पाहिजे)

घरातील वॉल पेंट
तुम्ही गर्भवती आहात आणि घराचं रंगकाम करण्याचा विचार करत आहात तर हे काम थोडंसं लांबणीवर टाका. कारण या रंगकामामुळे तुमच्या बाळाच्या आरोग्यावर थेट परिमाण होऊ शकतो. त्यामुळे घराचं रंगकाम करताना अशा गोष्टींचा वापर करावा ज्यामध्ये केमिकलयुक्त पदार्थांचा समावेश नसेल.

(वाचा : सावधान ! तुमच्यात आढळली आहेत का ब्रेस्ट कॅन्सरची ‘ही’ लक्षणं)

डास मारण्याचं औषध/ कीटकनाशक
बऱ्याचदा घरामध्ये डास, झुरळे किंवा मच्छर इत्यादी कीटकांची समस्या निर्माण होते. कीटकांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही एखादा स्प्रे किंवा औषध फवारता. पण ही बाब बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीने अजिबात चांगली नाही. जर तुम्हाला कीटक मारण्यासाठी औषधांचा वापर करायचा असल्यास ते कमी प्रमाणात वापरावं किंवा ज्या रूममध्ये फवारणी केली आहे तेथे एक ते दोन तासांनंतर प्रवेश करावा.

(वाचा : पोट आणि मांडीवरील चरबी कमी घटवण्यासाठी करा 'ही' योगासने)

नेप्थलीन बॉल्स
कीटकांपासून सुटका मिळवण्यासाठी बहुतांश वेळा नेप्थलीन बॉल्सचाही वापर केला जातो. पण हे बॉल्स विषाप्रमाणेच असतात. घरामध्ये याचा वापर केल्यास चक्कर येणे, गर्भात असणाऱ्या बाळाच्या आरोग्यावर परिणाम देखील होऊ शकतात. यामुळे गर्भवती असताना शक्यतो नेप्थलीन बॉल्सचा वापर करू नये.

(वाचा : थंडीमध्ये जास्वंदीच्या फुलांचा चहा प्या, त्वचेच्या समस्या होतील कमी)

हे देखील वाचा :
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.