गोल आणि मऊ पोळ्या (चपात्या) बनवण्यासाठी वापरा सोप्या टिप्स

गोल आणि मऊ पोळ्या (चपात्या) बनवण्यासाठी वापरा सोप्या टिप्स

पोळ्या (चपात्या) तर रोज आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे. पण प्रत्येक जण वेगळ्या पोळ्या बनवत असतं. काही जणांना गोलाकार आणि मऊ पोळ्या बनवता येत नाहीत. कितीही प्रयत्न केले तरी पोळ्या गोलाकार होतात पण मऊ होत नाहीत असंही काही जणांच्या बाबतीत घडतं. खरं तर गोल आणि मऊ पोळ्या (chapati) बनवण्याची खास टेक्निक आहे. सगळ्यांनाच ती जमते असं नाही. पण तुम्हाला कायम अशा पोळ्या बनवायच्या असतील तर आमच्याकडे नक्कीच त्याच्या काही खास टिप्स आहेत ज्या आम्ही तुमच्याबरोबर शेअर करणार आहोत. यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पोळीचे पीठ आणि पाण्याचे प्रमाण. हे अतिशय योग्य असायला हवे. तसेच ही कणीक जास्त वेळ तुम्ही तिंबून ठेवाल तितकी अधिक चांगली.  पिठात पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर पोळी लाटताना ती चिकटेल आणि पाण्याचं प्रमाण कमी झालं तर पोळी भाजताना ती कडक होईल आणि नंतर चिवट होईल. त्यामुळे नक्की काय टिप्स आपण मऊ आणि गोलाकार पोळीसाठी वापरायच्या हे या लेखातून पाहूया.

रोज पोळी खात असाल तर जाणून घ्या किती आहे फायदेशीर

मऊ आणि फुगलेली पोळी बनविण्यासाठी टिप्स

Shutterstock

सर्वात आधी लक्ष द्यायला हवं ते आपल्या पिठाकडे. इथे आम्ही तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स देत आहोत ज्या युक्ती वापरून तुम्ही पोळ्या केल्यात तर त्या नक्कीच मऊ होतील आणि चिवट होणार नाहीत. 

शिळी पोळी खाल्ल्याने होतात फायदे, जाणून व्हाल हैराण

 • कणीक मळताना पीठ घ्याल त्याच्या मध्ये खड्डा करून पाणी घाला. एक वाटी पीठ असेल तर अर्ध्यापेक्षा अगदी थोडं कमी वाटीत पाणी घ्या आणि पीठ भिजवा. या पिठाच्या पोळ्या अगदी मऊ आणि फुगणाऱ्या होतील. 
 • पीठ कोणत्याही गिरणीतील असो वा रेडीमेड असो कणीक भिजवत असताना पीठ आधी चाळून घ्या. कारण कितीही ब्रँडेड असलं तरीही त्यामध्ये काही प्रमाणात चर असते.
 • पोळ्या मऊ होण्यासाठी कणीक साधारण 5 मिनिट्स मळून त्यानंतर किमान 15 मिनिट्स तिंबत ठेवण्याची गरज आहे
  पोळीच्या कणकेत थोडं तूप अथवा तेल घाला आणि मग ते कपड्याने अर्धा तास झाकून ठेवा. असं केल्यामुळे पिठाचा वरचा थर कधीही कोरडा पडत नाही आणि पोळ्या अर्थात चपात्या अतिशय मऊ होतात. शिवाय काही जणांच्या पोळ्या फुगत नसतील तर त्यांनी हा उपाय नक्की करून पाहावा
 • पोळ्या करायला घेताना पीठ पुन्हा एकदा नीट मळून घ्यावे
 • पोळी लाटताना ती केवळ दोनच वेळा परता. जास्त वेळा परतवली तर ती फुगत नाही आणि त्याचा आकारही गोल येत नाही
 • लाटल्यानंतर पोळी जास्त वेळ तशीच ठेवू नका. असं केल्यास, कधीही पोळी फुगणार नाही त्याशिवाय भाजून काढल्यानंतर ती चिवट होते
 • कधीही अति आच अथवा मंद आचेवर पोळी शेकू नका. पोळी भाजण्यासाठी तव्याखालील गॅस हा कायम मध्यम आचेवर ठेवा
 • पोळी तव्यावर टाकल्यावर पहिली बाजू ही साधारण 30 सेकंदात परता जर तुम्हाला पोळी मऊ हवी असेल
  पोळीवर जास्त पीठ लागले असेल तर ते कापडाने पुसून घ्या.  पीठ तसेच ठेऊ नका. पोळी दिसायला अतिशय घाण दिसेल पीठ तसेच ठेवल्यास, त्यामुळे भाजताना याकडे विशेष लक्ष द्या
 • तुम्हाला पोळी अगदीच मऊ हवी असेल तर तुम्ही कणीक भिजवताना त्यात दूध अथवा थोडंसं दही घालू शकता (तुम्हाला आवडत असल्यास)

या साध्या आणि सोप्या टिप्स वापरून तुम्ही तुमच्या रोजच्या डब्यातील पोळी नक्कीच बनवू शकता. सकाळीच डबा तयार करत असाल आणि दुपारी जेवणासाठी पोळी नरम आणि मऊ हवी असेल तर या टिप्स नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरतील. या पद्धतीने पोळ्या केल्यास, अगदी रात्रीपर्यंत पोळ्या मऊ राहतील. तुम्हाला दोन वेळा पोळ्या करायची गरज भासणार नाही. तसंच पोळ्या चिवटही होणार नाहीत.

पोळीवर तूप लावून खाण्याचे होतात अप्रतिम फायदे

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.