ADVERTISEMENT
home / Vastu
Vaastu : घरात येईल आनंद आणि समाधान करून पाहा हे उपाय

Vaastu : घरात येईल आनंद आणि समाधान करून पाहा हे उपाय

अनेकदा असं होतं की, काही लोकांच्या आयुष्यात सर्व भौतिक सुखं, पैसा आणि ऐशोआराम असतात पण तरीही त्यांच्या कुटुंबात सुख शांती नसते. बरेचदा याला कारणीभूत असतात घरातील सदस्यांमधील मतभेद किंवा घरातील काही वास्तूदोषही कारणीभूत असू शकतात. या दोषांमुळे घरात सदैव तणाव असतो. कोणत्याही कामात मन लागत नाही, मनातही अशांतता असते. चला जाणून घेऊया यामागील दोष आणि त्यावरील उपाय.

  • झोपण्याआधी हे करा : जर तुमच्या घरात आर्थिक सुबत्ता असूनही आनंदी वातावरण नसेल तर रात्री झोपण्याआधी पितळ्याच्या पातेल्यात तुपात बुडवून कापूर जाळा. वास्तूशास्त्रानुसार असं केल्याने घरातील क्लेश दूर होतील आणि घरात शांती कायम राहील. 
  • वैवाहिक जीवनातील शांततेसाठी : रात्री झोपण्याआधी काही न खात उशीखाली कापूराचा छोटासा तुकडा ठेवा. सकाळी काही खाण्याआधी तो कापूराचा तुकडा उचला आणि जाळा. हा तुकडा जाळल्यावर राहीलेली राख पाण्याच्या प्रवाहात सोडा (शहरी भागात राहणाऱ्यांनी नळाच्या पाण्याखाली ही राख प्रवाहित करावी). वास्तूशास्त्रानुसार असं केल्याने तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद येईल आणि नात्यात कोणत्याही प्रकारचा कलह होणार नाही.

Shutterstock

घरावर लक्ष्मीकृपा व्हावी म्हणून फॉलो करा या वास्तू टीप्स

ADVERTISEMENT
  • मंगळवारी करा हा उपाय : मंगळवारचा दिवस गणपती आणि हनुमानाला समर्पित असतो. या दिवशी मारूतीसमोर तुम्ही दिवा लावा आणि अष्टगंध उगाळून त्याच्या सुंगधाने सर्व घर सुंगधित होऊ द्या. वास्तूशास्त्रानुसार असं केल्याने तुमच्या घरात सकारात्मक उर्जा निर्माण होते आणि नकारात्मक उर्जा दूर होते. 
  • बेडरूममध्ये करा हे काम : बेडरूमच्या प्रवेश द्वाराच्या समोर डावी कोपऱ्यात एखादी धातूची वस्तू लटकवा. वास्तूशास्त्रानुसार हे स्थान भाग्य आणि संपत्तीचं असतं. या दिशेला असलेल्या दरवाज्यात एखादी भेग किंवा तडा असल्यास त्याची ताबडतोब दुरूस्ती करून घ्या. या दिशेला कोणत्याही प्रकारची दुरूस्ती बाकी ठेवल्यास ते आर्थिक नुकसानीचं कारण ठरू शकतं. 
  • घराच्या पश्चिमेला उतार असल्यास : जर तुमचं घरामध्ये उत्तर-पश्चिम दिशेला उतार असल्यास घरात सुबत्ता येत नाही. उतार हा नेहमी उत्तर-पूर्व दिशेला असायला हवा आणि सोबतच हेही लक्षात घ्या की, या दिशेला पाण्याचा स्त्रोत असल्यास तो चांगला मानला जातो. 
  • फेंगशुईचा उपाय : चीनी वास्तुशास्त्र फेंगशुईनुसार घराच्या मुख्य दरवाज्या मागे छोट्या छोट्या घंटा लटकवल्यास घराच्या आत नेहमी सकारात्मक उर्जेचा प्रभाव कायम राहतो. 

यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा ‘या’ गुडलक वास्तू टीप्स

तुम्हीही घरातील सुख-शांती आणि आनंदी वातावरणासाठी वास्तूशास्त्रानुसार सुचवलेले हे उपाय नक्की करून पाहा. तुम्ही वास्तूसाठी एखादा उपाय केला असल्यास आम्हाला तो सांगा. आम्ही तो इतर वाचकांपर्यंत नक्की पोचवायचा प्रयत्न करू. तुम्हाला POPxoMarathi वास्तूशास्त्रांशी निगडीत काय वाचायला आवडेल हेही आम्हाला कळवा.

VastuTips: तुमच्या किचनमधील हे वास्तूदोष आजच दूर करा

नवरा-बायकोसाठी बेडरूम वास्तू टीप्स

ADVERTISEMENT

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

 

18 Feb 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT