'वाजवूया बँड बाजा' चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

'वाजवूया बँड बाजा' चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

अमोल लक्ष्मण कागणे प्रस्तुत लक्ष्मण एकनाथराव कागणे निर्मित आणि शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित 'वाजवूया बँड बाजा' या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या सिनेमाचा टीझर सोमवारी (17 फेब्रुवारी) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा एक विनोदी चित्रपट असून त्यात घडणाऱ्या गमती-जमती आणि तीन भावांच्या लव्हस्टोरीचा धूमधडाका या चित्रपटाच्या टीझरमधून पाहायला मिळत आहे. तीन भावांच्या आयुष्यातल्या गमती-जमतींवर आधारलेली 'वाजवूया बँड बाजा'ची गमतीदार कथा संदीप नाईक यांनी लिहिली आहे. पटकथा तसेच संवाद निशांत नाथराम धापसे यांनी लिहिली आहेत. या चित्रपटात अभिनेता मंगेश देसाई,समीर धर्माधिकारी, चिन्मय उदगीरकर, प्रीतम कांगणे, नागेश भोसले, अभिजीत चव्हाण, कांचन पगारे, रुचिरा घोरमोरे, अश्विनी खैरनार, भाग्यश्री देसाई मुख्य भूमिकेत आहेत. विजय गटलेवार यांच्या संगीत लहरींवर गायक-आदर्श शिंदे यांच्या स्वरांनी तर चारचाँदच लावले आहेत. संकल-निलेश गावंड आणि कला दिग्दर्शक-संतोष समुद्रे अशी इतर श्रेयनामावली आहे. तर 'पिकल एंटरटेनमेंट'चा या चित्रपटाच्या वितरणात खारीचा वाटा आहे.

(वाचा : 'फर्जंद'नंतर निर्माते अनिरबान सरकार घेऊन येताहेत 'ऋणानुबंध')

'वाजवूया बँड बाजा'चा विषय प्रत्येक वयोगटातील तरुण मंडळींना आवडेल असा आहे. मनाने तरुण असणाऱ्यांना आपल्या गतकाळातील प्रेमाची तर युवा पिढीला सध्या सुरू असलेल्या प्रेम प्रकरणाच्या आठवणीमध्ये तुम्हाला रमायला हा सिनेमा भाग पाडेल. 20 मार्च रोजी हा सिनेमा महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. 

(वाचा : 'वाजवूया बँड बाजा'मध्ये चिन्मय उदगीरकर-प्रीतम कागनेची लव्हेबल केमिस्ट्री)

चिन्मय आणि प्रीतम हे दोघेही 'वाजवूया बँड बाजा' या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. या चित्रपटात दोघांच्या लव्हस्टोरीसह हास्यकल्लोळही पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातील संजूची भूमिका चिन्मय साकारणार असून दिव्याच्या भूमिकेत प्रीतम दिसणार आहे. या चित्रपटात दोघांच्या जगण्याच्या वाटा वेगळ्या आहेत आणि याच वाटा वेगळ्या असल्याचे भान जेव्हा येते तेव्हा त्यांना प्रेमाचा खरा अर्थ समजतो आणि एका मर्यादेनंतर खरा अर्थ समजल्यानंतर त्या प्रेमाचे नक्की काय होते? याबद्दलची उत्सुकता सर्वच प्रेक्षकांना लागून राहिली आहे. शिवाय हे सर्व घडत असताना चिन्मय आणि प्रीतमच्या आयुष्यात नेमके काय बदल होतात हे ही जाणून घेणे तितकेच रंजक ठरेल. 

(वाचा : नवाजुद्दीन सिद्दकीने पहिल्यांदा शेअर केला खऱ्या आयुष्यातील गुरूजींचा फोटो)

चिन्मयच्या गाजलेल्या मालिका  

चिन्मयने यापूर्वी अनेक मराठी मालिका आणि नाटकांमधून काम केले आहे. सध्या ‘घाडगे अँड सून’ मधील चिन्मयची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. या मालिकेत चिन्मय ‘अक्षय घाडगे’ ही भूमिका साकारत आहे. तसंच काही महिन्यांपूर्वी संपलेल्या ‘स्वप्नांच्या पलीकडे’ आणि ‘नांदा सौख्यभरे’मध्ये या मालिकांमधून चिन्मयला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. प्रेमवारीमध्ये अभिनेता अभिजीत चव्हाणदेखील एका महत्त्वाच्या भूमिकेतून दिसणार आहे. 

हे देखील वाचा :
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.