व्हॅलेंटाईन्स डे ला तुमच्या पार्टनरला द्या गोड मेजवानी

व्हॅलेंटाईन्स डे ला तुमच्या पार्टनरला द्या गोड मेजवानी

व्हॅलेंटाईन डे आता काही दिवसांवरच आला आहे. तुम्हीही तुमच्या पार्टनरसोबत काही प्लॅन केला की नाही. जर तुमचा बाहेर जायचा काही प्लॅन नसेल तर आम्ही घेऊन आलो आहोत खास शेफनी शेअर केलेल्या डेझर्ट रेसिपीज. नवी मुंबईतल्या फोर पॉइंट्स शेरेटन या हॉटेलमधील शेफ मेराजुद्दीन अन्सारी यांनी या खास व्हॅलेंटाईन स्पेशल डेझर्ट्सच्या रेसिपीज शेअर केल्या आहेत.

स्ट्रॉबेरी शॉर्ट लेयर पेस्ट्री

साहित्य -

केकसाठी

1 कप (2 स्टिक्स) वितळवलेलं आणि मीठ नसलेलं बटर

2 कप ग्रॅन्युलेटेड साखर

3 कप केकचे पीठ चाळलेले

1 चमचा बेकिंग पावडर

अर्धा चमचा मीठ

सव्वा कप दूध

चार मोठी अंडी

2 चमचे व्हॅनिला इसेंस

स्ट्रॉबेरीजसाठी

एक कॅन भरून ताज्या स्ट्रॉबेरीज तुकडे केलेल्या

2 चमचे ग्रॅन्युलेटेड साखर

1 चमचा व्हॅनिला इसेंस 

व्हिप्ड क्रीमसाठी

2 कप हेवी व्हिपिंग क्रीम

पाव कप ग्रॅन्युलेटेड साखर

1 चमचा व्हॅनिला इसेंस

कृती -

 • केक बनवण्यासाठी ओव्हन 350 अंशांवर प्रीहीट करा. केकसाठी आठ किंवा नऊ इंचाच्या गोलाकार भांड्याला पार्चमेंट कागद लावून घ्या. केक चिकटू नये यासाठी पार्चमेंट कागदावर बटर आणि पीठ लावा. इलेक्ट्रिक मिक्सरच्या भांड्यात बटर, साखर सर्वाधिक वेगाने आणि फिकट व क्रीमी होईपर्यंत तीन ते चार मिनिटे फेटून घ्या. गरज पडेल तेव्हा भांड्याच्या कडांना आतून लागलेले मिश्रण काढून घ्या. 
 • मध्यम आकाराच्या भांड्यात केकचे पीठ, बेकिंग पावडर आणि मीठ एकत्र करा. दुसऱ्या भांड्यात दूध, अंडी, व्हॅनिला इसेंस एकत्र व्हिस्क करा. पिठाचं मिश्रण बटरच्या मिश्रणात 3 अॅडिशन्सह घाला. एकाआड एक दूधाचे मिश्रण आणि अखेरीस पिठाचे मिश्रण असा क्रम ठेवा. प्रत्येकवेळेस भर घालताना भांड्याच्या कडांना लागलेले मिश्रण काढून घ्या. 
 • हे मिश्रण आधी तयार केलेल्या केकसाठीच्या दोन भांड्यात विभागून घ्या आणि वरचा भाग खरपूस सोनेरी होईपर्यंत आणि हलका स्पर्श केल्यानंतर वर येईपर्यंत म्हणजे किमान 30 ते 35 मिनिटे बेक करा. पॅन 10 मिनिटे थंड होऊ द्या व त्यानंतर वायर रॅक सामान्य तापमानात थंड होण्यासाठी  काढून ठेवा. केकचे लेयर्स प्लॅस्टिक रॅपमध्ये आच्छादून घ्या आणि किमान एक तास दोन दिवसांपर्यंत रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. 
 • केक एकत्र करून सर्व्ह करताना स्ट्रॉबेरीज तयार करून घ्या. कापलेल्या स्ट्रॉबेरीज, साखर आणि व्हॅनिला इसेंस एका भांड्यात एकत्र करून 20 मिनिटे तसेच ठेवून द्या.
 • व्हिप्ड क्रीम तयार करण्यासाठी इलेक्ट्रिक मिक्सरने व्हिपिंग क्रीम, साखर, व्हॅनिला इसेंस मध्यम आकाराचे पिक्स तयार होईपर्यंत फेटा.
 • थंड केलेले केकचे लेयर्स फ्रीजमधून काढा आणि लहान सुरीने प्रत्येक लेयरला आडवा छेद द्या. त्यानंतर करवतीप्रमाणे आरे असलेल्या मोठ्या सुरीने प्रत्येक लेयर आधी दिलेल्या छेदावरून कापून घ्या.
 • केक प्लेटवर किंवा स्टँडवर केकचा एक लेयर ठेवा. एक कप व्हिप्ड क्रीमचा थर आणि स्ट्रॉबेरी मिश्रणाचा पाव भाग त्यावर लावा. केकचे बाकीचे लेयर्स, व्हिप्ड क्रीम आणि स्ट्रॉबेरीजसाठी या कृतीची पुनरावृत्ती करा. केक लगेच सर्व्ह करा.

रिच चॉकलेट स्ट्रॉबेरी ब्राऊनी

साहित्य 

2 मोठी अंडी

दोन तृतीयांश कप साखरविरहीत कोको पावडर

अर्धा चमचा मीठ

अर्धा चमचा बेकिंग पावडर

1 चमचा व्हॅनिला किंवा कॉफी इसेंस. या रेसिपीसाठी शेफने नेल्सन मेसीजचा कॉफी इसेंस वापरला आहे.

अर्धा कप मीठ नसलेलं बटर

1 कप साखर

पाऊण कप मैदा

1 मिल्क चॉकलेट बार

1 डार्क चॉकलेट बार

5- 7 स्ट्रॉबेरीजचे काप

कृती 

 • ओव्हन 350 फॅरेनहाइटवर प्रीहीट करा आणि 9x9 आकाराच्या चौकोनी ट्रे ला पार्चमेंट कागद किंवा फॉइल लावून घ्या आणि त्यावर नॉन- स्टिक स्प्रे फवारा.
 • बटर आणि साखर एकत्र करा आणि 30 सेकंदाच्या अंतराने मायक्रोव्हेव करून घ्या. एक मिनिटांपर्यंत बटर वितळेपर्यंत ही कृती करत राहा. त्यात अंडी, बेकिंग पावडर, मीठ आणि व्हॅनिला किंवा कॉफी इसेंस घाला. त्यानंतर कोको पावडर आणि मैदा घाला व गुठळ्या राहू देऊ नका.अखेर कापलेलं चॉकलेट फोल्ड करा.
 • आधी तयार केलेल्या पॅनमध्ये हे मिश्रण ओता. त्यावर कापलेल्या स्ट्रॉबेरीज ब्राउनी मिश्रणात टाका आणि 20 ते 25 मिनिटं, त्यात घातलेली टूथपिक काही मऊ कणांसह बाहेर येईपर्यंत बेक करा.
 • सर्व्ह करण्यापूर्वी थोडं थंड करा किंवा थंडगार सर्व्ह करा.

स्ट्रॉबेरी चीज केक

साहित्य -

क्रस्टसाठी 

सव्वादोन कप (302 ग्रॅम) ग्रॅहम क्रॅकर क्रम्ब्ज

तीन चमचे (39 ग्रॅम) साखर

अर्धा कप (112 ग्रॅम) मीठाचा अंश असलेले व वितळलेले बटर

फिलिंगसाठी

678 ग्रॅम क्रीम चीज, सामान्य तापमानाला आलेले

एक कप (207 ग्रॅम) साखर

तीन चमचे (24 ग्रॅम) मैदा

पाऊण कप (173 ग्रॅम) सावर क्रीम, सामान्य तापमान असलेली

तीन मोठी अंडी, सामान्य तापमान असलेली

स्ट्रॉबेरी टॉपिंगसाठी

दीड कप (310 ग्रॅम) साखर 

2 चमचे कॉर्न स्टार्च

दीड कप प्युरीड स्ट्रॉबेरीज (एक पाउंड स्ट्रॉबेरीजपासून)

अर्धा चमचा व्हॅनिला इसेंस

दोन कप स्ट्रॉबेरीजचे तुकडे 

व्हिप्ड क्रीम

अर्धा कप हेवी व्हिपिंग क्रीम, 

पाव कप पिठीसाखर

अर्धा चमचा व्हॅनिला इसेंस

कृती

 • 325 फॅरेनहाइट्सवर (163 अंश) ओव्हन प्रीहीट करा. 9×13 आकाराचा पॅन ग्रीस करून घ्या. एका लहान भांड्यात क्रस्टचे साहित्य एकत्र करा. तयार केलेल्या भांड्यात हे मिश्रण सर्वात खाली दाबून भरा. ओव्हनचे तापमान 300 फॅरेनहाइट्सपर्यंत (148 अंश) कमी करा.
 • एका मोठ्या भांड्यात क्रीम चीज, साखर, मैदा पूर्णपणे एकजीव आणि मुलायम होईपर्यंत कमी वेगाने एकत्र करून घ्या. वेग कमी असेल याकडे लक्ष द्या म्हणजे मिश्रणात मिसळली जाणारी हवा कमी होईल, नाहीतर तडे जाण्याची शक्यता असते. भांड्याच्या कडा पुसून घ्या.
 • सावर क्रीम, व्हॅनिला इसेंस हळूवारपणे एकत्र करून घ्या. एकावेळेस एक याप्रमाणे अंडी एकत्र करा. एकजीव होण्यासाठी हळू एकत्र करा. भांड्याच्या कडा पुसून घ्या म्हणजे सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र होईल.  हे मिश्रण क्रस्ट घातलेल्या मिश्रणात ओता आणि सगळीकडे सारखे पसरवून घ्या. हा चीजकेक 30 मिनिटे बेक करा.
 • ओव्हन बंद करा आणि ओव्हनचे दार बंदच ठेवून आत चीजकेक तसाच वीस मिनिटे राहू द्या.  त्यानंतर केक ओव्हनमध्येच ठेवून दरवाजा 15 मिनिटे उघडा ठेवा. थंड करण्याच्या या संथ प्रक्रियेमुळे चीजकेकला तडे जात नाहीत. चीजकेक थंड होण्यासाठी किमान तीन ते चार तास फ्रीजमध्ये ठेवा.
 • स्ट्रॉबेरी टॉपिंगसाठी साखर व कॉर्नस्टार्च एका मोठ्या भांड्यात एकत्र करा. स्ट्रॉबेरी प्युरी ढवळा. मिश्रण घट्ट होईपर्यंत मध्यम आचेवर ढवळत 15 ते 20 मिनिटे शिजवत राहा. एक ते दीड मिनिटं उकळी येऊ द्या आणि नंतर आचेवरून बाजूला करा. व्हॅनिला इसेंस आणि कापलेल्या स्ट्रॉबेरीज घालून ढवळा व 15 ते 20 मिनिटं थंड होऊ द्या. 
 • टॉपिंग चीजकेकवर घाला आणि तीन ते चार तास किंवा संपूर्ण रात्र थंड होऊ द्या. सॉस लगेच सर्व्ह करा, कारण तो थंड झाला की घट्ट होतो. 
 • व्हिप्ड क्रीम बनवण्यासाठी सर्व साहित्य एका मोठ्या मिक्सर बाउलमध्ये घाला आणि घट्ट पिक्स तयार होईपर्यंत उच्च वेगावर चालवा. चीजकेकचे स्लाइसेस व्हिप्ड क्रीमसोबतही सर्व्ह करता येतील.

स्ट्रॉबेरी चॉकलेट ट्रफल केक

साहित्य 

एक बॉक्स डार्क चॉकलेट मिश्रण आणि बॉक्सवरील साहित्य

पाव कप बटर

एक आणि एक तृतीयांश कप व्हिपिंग क्रीम

ए 10-ओझेड पॅकेज बिटरस्वीट चॉकलेट मॉर्सेल्स

8 औंस सेमी- स्वीट चॉकलेट चिप्स

3-4 कप ताज्या, कापलेल्या स्ट्रॉबेरीज

उंचीनुसार मध्यभागी कापलेल्या 6 स्ट्रॉबेरीज

पाव कप व्हाईट चॉकलेट

अर्धा कप तेल  

कृती 

 • पॅकेटवर दिलेल्या सूचनांनुसार केक तयार करा. 9x13 इंची पॅनमध्ये केक बेक करा. एक तास थंड होऊ द्या. दरम्यान एका लहान भांड्यात बटर व क्रीम एकत्र करून मध्यम आचेवर सेट करा. मिश्रणाला उकळी आल्यानंतर त्यात बिटरस्वीट आणि सेमी- स्वीट चॉकलेट घालून आच बंद करा. मिश्रण दोन मिनिटे तसंच ठेवा आणि नंतर मुलायम होईपर्यंत ढवळा.
 • सुरीच्या साहाय्याने केकचे एक इंची तुकडे करा आणि त्यातील निम्मे तुकडे मिक्सिंग बाउलमध्ये घाला. केकचे पूर्णपणे तुकडे होईपर्यंत कमी वेग ठेवून बीट करा. 
 • मिक्सिंग बाउलमध्ये सव्वा कप गनाश घाला. केकचे उरलेले तुकडे घाला आणि एकजीव होईपर्यंत बीट करा. 
 • कापलेल्या स्ट्रॉबेरीज घालून मिश्रण एकत्र करण्यासाठी लाकडी चमचा वापरा आणि सगळं मिश्रण खाऊ नका. 
 • 9 इंची स्प्रिंग फॉर्म पॅन घ्या आणि त्याच्या तळाला गोलाकार वॅक्स पेपर घाला. केक पॅनमध्ये ओता किंवा चमच्याने घाला. हे मिश्रण वरून एकसारखे करून घ्या. 
 • 45 मिनिटं प्लॅस्टिक रॅपने झाकून ठेवा. टाईमर सेट करा. तुम्हाला हे मिश्रण खूप थंड करायचं नाही, तर केवळ घट्ट करायचं आहे. जर नंतर फ्रॉस्ट करणे शक्य नसेल, तर फ्रीजमध्ये ठेवा.
 • पॅनच्या कडेने सुरी फिरवून कडा हलक्या हाताने सोडवून घ्या. केक स्टँड किंवा ताटलीमध्ये केक उलट करून काढा आणि आता वरती आलेला तळाचा वॅक्स पेपर काढा. 
 • वरचा भाग आणि केकच्या कडा राखून ठेवलेल्या गनाशने काळजीपूर्वक फ्रॉस्ट करा. हो.. गनाश खूप पातळ असते. केक अद्याप थँड असेल, तर तो काही मिनिटांसाठी परत फ्रीजमध्ये ठेवा.
 • लहान बाउलमध्ये व्हाइट चॉकलेट आणि तेल एकत्र करा. चॉकलेट वितळेपर्यंत मायक्रोव्हेव करा आणि मुलायम होईपर्यंत ढवळा केकवर व्हाईट चॉकलेट भुरभुरा. या रेसिपीमध्ये शेफने व्हाईट चॉकलेट प्लॅस्टिक बॅगमध्ये घालून केकवर त्याचा एक ठिपका दिला. 

 

मग तुम्हीही व्हॅलेंटाईन्स डे ला तुमच्या प्रिय व्यक्तीसाठी वरील डेझर्ट रेसिपीज नक्की बनवा आणि त्यांना सरप्राईज द्या.