अंथरूणात पडल्या-पडल्या लागेल गाढ झोप, फॉलो करा या टिप्स

अंथरूणात पडल्या-पडल्या लागेल गाढ झोप, फॉलो करा या टिप्स

बरेचदा आरोग्य, फिटनेस आणि ब्युटीशी निगडीत बऱ्याचश्या समस्या या अपूर्ण झोपेमुळे उद्भवतात. तुमच्या लाईफस्टाईलप्रमाणे याची कारणंही वेगवेगळी असू शकतात. पण सकाळी जाग न येण्याची समस्याही बऱ्याच जणांना हमखास जाणवतेच. म्हणूनच या लेखात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत काही खास टिप्स ज्यामुळे तुमची या समस्येपासून होईल सुटका.

  • सर्वात आधी हे जाणून घ्या : रात्रीच्या वेळी जेव्हा तुम्ही विचार करता की, आता झोपायला हवं आणि जेव्हा तुम्ही खरोखर झोपता या दोन्ही स्थितीमध्ये जो वेळ किंवा अंतर असतं त्याला म्हणतात लेटेंसी. 
  • वेगवेगळा परिणाम : एका नव्या संशोधनानुसार लेटेंसीचा परिणाम प्रत्येक व्यक्तीवर वेगवेगळा होतो. हे त्या माणसाच्या शरीर, लाईफस्टाईल आणि ज्या वातावरणात तो राहतो त्याने प्रभावित होत असतं. 
  • वेळेचं गणित : जर तुम्हाला बेडवर पडल्यावर 5 मिनिटांच्या आत झोप येते याचा अर्थ तुम्ही कमी प्रमाणात झोपता आणि बेडवर पडल्यानंतर झोप लागण्याआधीचा वेळ हा 20 मिनिटं किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास तुम्ही तुमच्या शरीराच्या गरजेपेक्षा जास्त वेळ झोपता किंवा तुम्हाला तुमच्या पुअर स्लीप हायजिनला सुधरवण्याची गरज आहे. या संशोधनानुसार बेडवर पडल्यावर साधारणतः सात मिनिटांनंतर तुम्ही ना पूर्ण झोपेच्या अधीन ना पूर्णतः जागे असता. या वेळेत तुम्हाला स्वतःला काही प्रमाणात व्यस्त आणि शांत असल्याचं जाणवतं.

  • खोलीतलं वातावरण : जर बेडवर पडल्यावर तुमच्या शरीराचं तापमान स्थिर करण्यास जास्त वेळ लागला तर तुमची स्लीप लेटेंसी वाढतो. ज्यामुळे तुम्हाला झोप येण्यास जास्त वेळ लागतो. त्यामुळे तुमच्या शरीराप्रमाणे खोलीतलं तापमान योग्य ठेवण्याचा प्रयत्न करा. 
  • वेळ पाळा : दररोज एका निश्चित वेळी झोपण्याची सवय तुमच्या शरीराला लावण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमच्या मेंदूला शरीराचं अंतर्गत घड्याळ सेट करण्यास मदत मिळेल. त्यामुळे शक्य असल्यास रोज ठराविक वेळी झोपण्याची सवय लावून घ्या. 
  • तणावमुक्तता : तणाव असल्यासही बरेचदा लवकर झोप लागत नाही. त्यामुळे तणावमुक्त राहणं आवश्यक आहे. यासाठी रोज व्यायाम आणि मेडिटेशन करा. तुम्हाला लगेच फरक जाणवेल. पण लक्षात ठेवा की, रात्रीच्या वेळी जिमला जाणं किंवा व्यायाम करणं टाळा. यामुळेही झोपेत बाधा येऊ शकते. लक्षात घ्या व्यायाम सकाळी केल्यास उत्तम किंवा रात्री करणार असल्यास बेड टाईमच्या किमान चार तास आधी करा.

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.