Mahashivratri Special : भगवान शंकराला प्रिय असलेल्या बेलपत्राचं महत्त्व

Mahashivratri Special : भगवान शंकराला प्रिय असलेल्या बेलपत्राचं महत्त्व

महाशिवरात्रीच्या उपवासाचं आपल्याकडे विशेष महत्त्व असतं आणि हा उपास हमखास आपल्याकडे केला जातो. महाशिवरात्रीच्या निमित्ताने देवळात जाऊन शंकराचं दर्शन घेणंही होतंच. महादेवाच्या आराधनेत सर्वाधिक महत्वाचं मानलं जातं ते म्हणजे बेलपत्र. शिवपुराणातही बेलपत्राच्या महत्त्वाबाबत विस्तृतपणे सांगण्यात आलं आहे. चला जाणून घेऊया भगवान शंकराला का प्रिय आहे बेलपत्र आणि महाशिवरात्रीला बेलपत्रासंबंधातील काही खास गोष्टी

भोळ्या शंकराला प्रिय बेलपत्र

शिवपुराणात यासंबंधातली एक कथाही सांगण्यात आली आहे. या कथेनुसार सागर मंथनाच्या वेळी हलाहल विष जेव्हा बाहेर पडलं तेव्हा शंकर देवाने ते आपल्या कंठात धारण केलं. ज्याच्या प्रभावामुळे त्यांचं मस्तिष्क गरम होऊ लागलं. यावरील उपाय म्हणून देवतांनी त्यांच्या डोक्यावर जल चढवणं सुरू केलं आणि त्याचवेळी थंड प्रकृतीचं मानलं जाणारं बेलपत्रही वाहण्यात आलं. तेव्हा कुठे त्यांच्या मस्तिष्काचा ताप कमी झाला. याच कारणामुळे महादेवाला बेलपत्र अतिप्रिय आहे आणि त्यांच्या पूजेच्या वेळी प्रामुख्याने याचा वापर केला जातो.

पूजा करताना घ्यायची काळजी

बेलपत्र वाहण्याआधी काही गोष्टींची विशेष काळजी घ्या. बेलाच्या पानांचा आकार हा नेहमी व्यवस्थित असावा व ती तोडकी-मोडकी नसावी. सकाळच्या पूजेसाठी बेलपत्र वाहायची असल्यास ती आदल्या दिवशी संध्याकाळीच तोडावी. बेलपत्र हे नेहमी 3 च्या संख्येत असावं. जर कोणत्याही शाखेचं एकही पान तुटलेलं असले तर वाहू नये.

बेलपत्राबाबतची पौराणिक मान्यता

अशी मान्यता आहे की, तिन्ही लोकात जेवढं पुण्य तीर्थ आहे ते सर्व बेलपत्राच्या मूळ भागात निवास करतं. जे भक्त बेलपत्र वाहून शंकराची आराधना करतात त्यांच्यावर महादेवाची कृपा कायम राहते. तसंच जी व्यक्ती आपल्या मस्तिष्कावर बेलपत्राच्या मूळाचं पाणी शिंपडून घेईल त्याला संपूर्ण तीर्थांचं स्नानासमान फळ मिळतं.

पैशांची जाणवणार नाही तंगी

बेलपत्राच्या झाडाजवळ दिवा लावून ठेवल्यास भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. बेलपत्राचं मूळ जवळ ठेवून शिवभक्तांना भोजन दिल्यास पुण्यप्राप्ती होतं. त्यामुळे बेलपत्रासोबतच त्याच्या झाडाला आणि मूळालाही विशेष महत्त्व आहे.

आरोग्यासाठीही चमत्कारी

बेलपत्राचं ना केवळ आध्यात्मिक महत्त्व आहे तर औषधीय गुणांमुळे ते चमत्कारिक मानलं जातं. महाशिवरात्रीनंतर उन्हाळ्याला सुरूवात होते. अशावेळी थंड प्रकृतीचं मानल्या जाणाऱ्या बेलपत्र आणि त्याच्या फळाचं सेवन केल्यास अनेक आजारांवर ते गुणकारी ठरतं. बेलाच्या फळाचं सेवन हे उष्मघाताच्या त्रासावर गुणकारी आहे. तसंच बद्धकोष्ठ, मूळव्याध आणि जुलाबसारख्या समस्याही दूर होतात.

मग या महाशिवरात्रि तुम्हीही भगवान शंकराला मनोभावे बेलपत्र वाहा आणि आपल्या मनोकामना महादेवाला सांगा. #POPxoMarathi च्या सर्व वाचकांना महाशिवरात्रि शुभेच्छा.

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.