पॉर्न मूव्हीज स्मार्टफोनवर पाहण्याचे हे आहेत तोटे

पॉर्न मूव्हीज स्मार्टफोनवर पाहण्याचे हे आहेत तोटे

मोबाईलवर पॉर्न पाहणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आतातर अनेक एप्सचा वापर करूनही पॉर्न पाहणं सोपं झालं आहे. त्यामुळे कॉप्युटर किंवा लॅपटॉपऐवजी लोक पॉर्न मूव्हीज बघण्यासाठी स्मार्टफोनचा वापर जास्त करतात. पण तुम्हाला माहीत आहे का, तुमच्या अँड्रॉईड स्मार्टफोनवरून पॉर्न पाहणं तुमच्यासाठी समस्याजनक ठरू शकतं. जर तुम्ही हा विचार करत असाल की, मोबाईलवर तुम्ही जे पाहत आहात ते कोणाला कळणार नाहीतर ते चुकीचं आहे. त्यामुळे तुम्हाला याबाबतीत सावधानता बाळगण्याची गरज आहे. कारण स्मार्टफोनवर पॉर्न बघणं तुमच्यासाठी समस्या निर्माण करणार कारणही ठरू शकतं. चला जाणून घेऊया की, अखेर पॉर्न मूव्ही स्मार्टफोनवर बघताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी -

1 -  तसं तर जास्तकरून पॉर्न साईट्स फ्री असतात. पण अनेकदा काही पॉर्न साईट्सवर नुसतं क्लिक जरी केलं तरी ते महागडं ठरू शकतं. पॉप्युलर पॉर्न वेबसाईट्स या गैरकायदेशीर पद्धतीने व्हॅल्यू एडेड सर्व्हिसशी जोडून जास्त पैसे कमावण्याच्या प्रयत्नात असतात. अशावेळी अनेकदा या सर्व्हिसेस अचानक एक्टिव्हेट होतात आणि वेबसाईट्स तुमच्याकडून परवानगी न घेता पैसे कट करतात. 

2 - पॉर्न साईट्समध्ये कधी कधी असे व्हायरस असतात जे तुमचं डिव्हाईस लॉकही करू शकतात आणि अनलॉक करण्याच्या बदल्यात तुमच्याकडून पैश्यांची मागणीही केली जाऊ शकते. आजकाल अशा प्रकारच्या बऱ्याच केसेस समोर येत आहेत. 

3 - जर तुम्ही स्मार्टफोनवर पॉर्न मूव्ही बघण्यासाठी कोणतंही एप डाऊनलोड केलंतर तर तुमच्या मोबाईलमध्ये विनाआमंत्रण अनेक व्हायरस येतात. 

4 - जर तुम्ही तुमच्या फोनवर पर्सनल जीमेल आयडीने लॉगईन करत असाल आणि यादरम्यान जर तुम्ही पॉर्न बघितलंलत तर हे तुमच्या खाजगी आयुष्यासाठीही धोकादायक ठरू शकतं. कारण तुमच्या फोनची सिक्युरिटी सायबर क्रिमिनल्सच्या हातात जाऊ शकते. ज्याचे गंभीर दुष्परिणाम तुम्हाला भविष्यात भोगावे लागू शकतात. 

5 - जर तुम्ही पॉर्न पाहताना फेसबुकने लॉग इन केलं असेल तर ते पहिल्यांदा लॉग आऊट करा. नंतर कळलं की, पॉर्न बघण्याच्या नादात फेसबुक अकाऊंटही हॅक झालं आहे.

6 - जर पॉर्न साईट पाहिल्यानंतर तुमच्या फोनवर कोणत्याही अवांछित व्हॅल्यू एडेड सर्व्हिस आपोआप एक्टिवेट झाल्या असतील तर STOP लिहून 155223 वर SMS करा.

7 - पॉर्न पाहिल्यानंतर तुमच्या फोनची इंटरनेट सर्फिंग हिस्ट्री अवश्य डिलीट करा. तसंच तुमच्या फोनचा कॅशेही वेळोवेळी क्लियर करा. 

8 - जर तुम्ही 'Do not allow website to track' फीचर सोबत इन्कॉगनिटो मोडवर पॉर्न पाहिलंतर ते जास्त योग्य ठरेल. 

9 - विनाकारण कोणत्याही समस्येत न अडकण्यासाठी पॉर्न वेबसाइट पाहतेवेळी फोनला फ्लाईट मोडवर टाका आणि वायफायमार्फत सर्फिंग करा.

10 - मोबाईलवर काहीही बघण्याआधी गोपनीयता ठेवण्यासाठी तुमच्या इंटरनेट सेटिंग्स नक्की तपासून पाहा.

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.