ADVERTISEMENT
home / Diet
डाएटवर असाल तर तुमच्यासाठी चीज आणि आईस्क्रिम आहे वरदान

डाएटवर असाल तर तुमच्यासाठी चीज आणि आईस्क्रिम आहे वरदान

वजन कमी करायचं असेल तर ‘डाएट’ करावं लागेल. डाएट करण्याचा सल्ला तुम्हालाही मिळाला असेल आणि तुम्ही ते करण्याचा विचार करत असाल तर आता तुम्हाला नाराज होण्याची गरज नाही. नाराज यासाठी कारण अनेकांना डाएट करायचे म्हणजे बऱ्याच गोष्टी सोडाव्या लागतात असे वाटते. साखर, पाव,जंक फूड असे काही पदार्थ तुम्हाला तुमच्या जेवणातून हद्दपार करावे लागतात. पण तुम्हाला माहीत आहे का? डाएटवर असताना तुम्हाला काही गोष्टी खाण्याची मुभा असते. त्यापैकीच आहे चीज आणि आईस्क्रिम. दुधापासून तयार झालेले हे पदार्थ तुमच्या डाएटमध्ये अगदी हमखास ठेवले जातात. डाएट करणाऱ्यांसाठी चीज आणि आईस्क्रिम एकप्रकारे वरदानच आहे. म्हणूनच आज जाणून घेऊया डाएटमध्ये चीज आणि आईस्क्रिम नक्की काय करतं ते

संध्याकाळी कधीही खाऊ नका हे पदार्थ नाहीतर वाढेल वजन

ये चीज बडी है मस्त मस्त

चीज क्युबचा घ्या आनंद

shutterstock

ADVERTISEMENT

हल्ली अनेक जंक फूडमध्ये चीज भरभरुन घातले जाते. चीजचे इतके प्रकार बाजारात मिळतात की ते फार चविष्ट लागतात आणि ते खाण्याचा मोह अजिबात आवरत नाही. जर तुम्हाला डाएट करायचे असेल आणि चीज सोडायचे नसेल तर तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही. कारण वजन कमी करण्यासाठी चीज हा उत्तम पर्याय आहे. अनेकांना चीज फक्त फॅट वाढवू शकते असे वाटते. पण चीजमध्ये प्रोटीन, कॅल्शिअम आणि न्युट्रीएन्ट्रस असतात. जे तुमच्या शरीराला उर्जा पुरवण्याचे काम करतात. जर तुम्ही नाश्त्यानंतर एखादा चीज क्युब खाल्ला तर चालू शकतो. दिवसभरात आवश्यक असलेली उर्जा तुम्हाला चीजमधून अगदी हमखास मिळू शकते. जर तुम्ही घेत असलेला वेटलॉसचा आहार अगदी योग्य असेल तर तुम्हाला एखादा चीज क्युब दिवसाआड खाण्यास काहीच हरकत नाही.

वजन कमी करण्याआधी लक्षात ठेवा या महत्वाच्या गोष्टी

आईस्क्रिम खा आणि वजन नियंत्रणात ठेवा

आईस्क्रिम आहे तुमच्यासाठी वरदान

shutterstock

ADVERTISEMENT

आईस्क्रिम खायला अनेकांना आवडते. पण आईस्क्रिममधील साखरेचा विचार करता त्यामुळे कितीतरी फॅट वाढेल, अशी भीती अनेकांना असते. पण तुम्हाला ही भीती बाळगण्याची खरचं काही गरज नाही. कारण तुमच्या शरीराला काही प्रमाणात साखरेची गरज असते. डाएटसाठी तुम्ही दुधाचा चहा, कॉफी, चॉकलेट खाणे सोडले असेल तरी तुमच्या शरीराला साखरेची आवश्यकता असते. अशावेळी तुम्ही आईस्क्रिम खाऊन तुमच्या शरीराला आवश्यकअसलेली साखर मिळवू शकता. आता तुम्ही विचार करत असाल की, आईस्क्रिममध्ये तुमचे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी काही खास घटक असतात तर जादुई असे कोणतेच घटक आईस्क्रिममध्ये नाही. तुम्हाला आवश्यक असलेल्या कॅलरीज आणि त्यापासून मिळणारी उर्जा मिळवण्यास आईस्क्रिम तुम्हाला मदत करते. जर तुम्हाला जेवल्यानंतर काही तरी गोड खाण्याची इच्छा असेल तर तुम्ही रात्री जेवणानंतर एक वाटीभर आईस्क्रिम खाऊ शकता.तुम्ही रोज आईस्क्रिम  खाल्ले तरी चालू शकेल. पण असे करताना तुम्ही तुमचा इतर डाएट नीट ठेवायला हवा. तरच त्याचा फायदा तुम्हाला जाणवेल.

चीज आणि आईस्क्रिम हे तुमचे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी कसे योग्य आहेत हे कळल्यानंतर आता बिनधास्त चीज आणि आईस्क्रिमचे सेवन करा. तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. 

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा  POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा. या लिंकवर क्लिक करा https://www.popxo.com/shop/zodiac-collection/

28 Jan 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT