महिलांनाच नाही तर पुरुषांनाही गॉसिप करायला आवडते बरं का! म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळ्या विषयांच्या गॉसिप आवडतात. काहींना ऑफिसमध्ये चालणारं राजकारण, प्रेम प्रकरण यामध्ये रस असतो. काहींना सिरिअलमध्ये घडणाऱ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट असतो. एकूणच काय काही ना काही विषयात आपले विचार मांडून काहींना गॉसिप करायला भयंकर आवडत असते. या गॉसिप करण्यामागे त्यांची ‘रास’ कारणीभूत असते हे तुम्हाला माहीत आहे का? हो हे खरं आहे असं म्हणतात तुमच्या राशीवर तुम्ही किती गॉसिप करता हे अवलंबून असते म्हणूनच आज जाणून घेऊया या भयंकर गॉसिप करणाऱ्या राशी आहेत तरी नेमक्या कोणत्या?
धनु राशीच्या व्यक्तींनाही तुमच्या आयुष्यातील सगळ्या गोष्टी जाणून घ्यायला आवडते. तुमच्या अगदी फेसबुकवॉलपासून ते अगदी तुमच्या खासगी आयुष्यात झाकून बघायला त्यांना फार आवडते. आता हा रस त्यांना तुमच्याच खासगी आयुष्यात असतो असे नाही तर त्यांना बऱ्याच गोष्टी माहीत करुन घ्यायला त्यांना आवडत असते.त्यांना ऑफिसमधील अफेअर्स पासून ते बातम्या सगळ्या गोष्टी माहीत करुन घ्यायच्या असतात. याचे नुकसाना त्यांना कधी होते ते कळत नाही.त्यामुळेच ते सतत गॉसिप करत राहतात. या राशी जरी गॉसिप करण्यात माहीर असले तरी त्यांच्यासोबत राहण्याचा आनंद वेगळा असतो. त्यामुळे तुम्हाला यापासून अजिबात धोका नाही.
कर्क राशीच्या व्यक्तींना दुसऱ्या व्यक्तीला जाणून घ्यायला फार आवडते. जर तुम्ही एखादी गोष्ट त्यांच्यासोबत शेअर केली तर ठिक. जर तुम्ही तुमची गोष्ट शेअर केली नाहीत तर मात्र तुमच्याकडून कशी काढून घ्यायची त्यांना माहीत असते. त्यांना एखादा विषय कळल्यानंतर त्या विषयावर सतत बोलायला त्यांना आवडते. त्यामुळे कर्क राशीच्या व्यक्तींना जर तुम्हाला काही सांगायचे नसतील तर तुम्ही दूर राहा. या व्यक्तिंना काही गोष्टी सांगायला काहीच हरकत नसते. कारण ते तुमच्यासोबत तुमचे मित्र बनून राहतात. तुमचे सिक्रेट ते कोणालाही शेअर करत नाही. त्यामुळे तुम्ही अगदी निश्चिंत राहा.
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना स्वत: बद्दल सांगायला आवडत नाही. पण त्यांना दुसऱ्यांबद्दल जाणून घ्यायला आवडते. दुसऱ्यांचे फोन चेक करणे, दुसऱ्यांच्या गोष्टी जाणून घेण्यात त्यांना फारच रस असतो. जरी तुम्ही त्यांना एखादी गोष्ट नाही सांगायची ठरवली तरी ते त्याची माहिती करुन घेतात. ही माहिती करुन घेण्यासाठी ते फारच उत्सुक असतात. तुमच्या खासगी गोष्टी जाणून घेण्यासाठी ते अगदी कोणत्याही थराला जातात. पण त्यांचे सिक्रेट ते तुम्हाला कधी सांगत नाहीत. अगदीच त्यांना सांगायचे असतील तर ते तुम्हाला पारखल्याशिवाय अजिबात सांगत नाहीत.
मेष राशीच्या व्यक्ती कायमच उर्जेने भरलेल्या असतात. त्यांना सगळ्या गोष्टी जाणून घेण्याची फार इच्छा असते. एखाद्याच्या आयुष्यात काय सुरु आहे हे जाणून घेण्याची जितकी उत्सुकता असते. तितक्याच या राशी कधी कधी कोणामध्ये फारसा रस घेत नाहीत. तुम्हाला दोन्ही प्रकार या राशीमध्ये पाहायला मिळतील. मेष राशीच्या व्यक्तिंना संयम नसतो. त्यांना एखादी गोष्ट माहीत करुन घ्यायची फार घाई असते. उदा. ऑफिसमध्ये एखादा विषय झाला तो त्यांना माहीत झाला की, त्यांच्या पोटात ते राहात नाहीत. त्यांना ती गोष्ट कोणाला तरी सांगायची असते. या मागे त्यांचा कोणताही वाईट उद्देश नसतो. त्यांना त्यांच्यापर्यंत ही गोष्ट ठेवायला आवडत नाही. जर त्यांना एखाद्या गोष्टीमधील रस निघून गेला तर मात्र त्यांना गॉसिप करायला आवडत नाही.
तूळ राशीच्या व्यक्तिंना बोलायला तसे फार आवडत नाही. जोपर्यंत एखाद्यावर त्यांना पूर्ण विश्वास बसत नाही किंवा एखादी व्यक्ती त्यांना मनापासून आवडत नाही तो पर्यंत ते फार काही बोलत नाहीत. पण एकदा त्यांचा एखाद्यावर मनापासून विश्वास बसला की, मग ते गप्पांचा फड जमवतात. त्यांना स्वत: बद्दल सांगायला आवडू लागते. असे लोक भरपूर गॉसिप करतात. त्यांना जर तुमच्या काही खासगी गोष्टी त्यांना कळल्या की ते तुमच्या अधिक जवळ येतात. तूळ राशींच्या व्यक्तिबद्दल आवर्जून सांगायला आवडेल की, या राशीच्या व्यक्तींना तुमचे सिक्रेट कळले की, ते कधीही दुसऱ्यांना सांगत नाहीत. त्यामुळे तुम्हाला जर काही गॉसिप करायचे असेल आणि कुठे नावही जाऊ द्यायचे नसेल तर तुम्ही तूळ राशीच्या व्यक्तिंची निवड करा.
आता तुमचीही रास या पैकी एक असेल तर तुम्हाला हे नक्कीच पटेल.
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.