कसदारचेहऱ्यावर ओपन पोअर्स असतील तर करा हे घरगुती उपाय

कसदारचेहऱ्यावर ओपन पोअर्स असतील तर करा हे घरगुती उपाय

आपल्या चेहऱ्याच्या  त्वचेवर लहान लहान पोअर्स असतात जे त्वचेला श्वास घेण्यासाठी मदत करतात. याच पोअर्समधून घाम आणि अतिरिक्त तेल निघत असते. पोअर्स मोठे होण्याची समस्या अधिकतर त्याच व्यक्तींंना असते ज्यांची त्वचा अधिक तेलकट असते. त्वचेवेरील पोअर्स टाईट करण्यासाठी चेहरा धुतल्यानंतर टोनरचा वापर नक्की करायला हवा. आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की, बाजारमध्ये प्रचंड प्रमाणात सौंदर्य प्रसाधने असातत जे त्वचेवरील पोअर्स टाईट करण्यासाठी उपयुक्त असल्याचा दावा करतात पण आपल्या स्वयंपाकघरामध्येच असे काही पदार्थ असतात जे बाजारातील उत्पादनांपेक्षा अधिक चांगला उपयोग आपल्या चेहऱ्यावरील ओपन पोअर्स बंद करण्यासाठी उपयुक्त ठरतात. ओपन पोअर्स (Open Pores) बंद करण्यासाठी आपण जाणून घेऊया काही घरगुती उपाय. ज्यामुळे तुम्ही तुमचा खर्चही वाचवू शकता आणि तुमच्या त्वचेची तुम्हाला अधिक चांगल्या रितीने काळजी घेता येते. तसंच तुम्हाला तुमच्या ओपन पोअर्ससाठी पार्लरमध्ये जाण्याचीही गरज भासत नाही. पाहूया स्वयंपाकघरातील अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे आपल्याला घरगुती  उपाय करता येतात. 

1. साधे दही

Shutterstock

दह्यामध्ये लॅक्टिक अॅसिड आणि प्रोबायोटिक बॅक्टेरिया असतात. जे त्वचेवरील ओपन पोअर्स बंद करण्यासाठी मदत करतात. यासाठी तुम्ही चेहऱ्याला दह्याचा एक पातळसा लेअर साधारण 10 मिनिट्स लावा आणि तसाच ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने तुम्ही चेहरा साफ करा. आठवड्यातून दोन वेळा चेहऱ्याला दही लावल्याने ही समस्या दूर होईल. दही लावल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी व्हायलाही मदत मिळते. 

2. अंड्याचा सफेद भाग आणि लिंबू

Shutterstock

अंड्याच्या सफेद भागाने त्वचा अधिक कसदार होते आणि तसंच त्वचेवरील अतिरिक्त येणारे तेलही नियंत्रणात राहाते. लिंबामध्ये असणारे विटामिन सी हे त्वचेवरील डाग कमी करण्यास उपयुक्त ठरतात. एका अंड्याचा सफेद भाग फेटून घ्या आणि यामध्ये लिंबाचा एक चमचा रस मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. सुकल्यानंतर थंड पाण्याने हे धुवा. तुमच्या चेहऱ्यावरील ओपन पोअर्स बंद करण्यासाठी हा उत्तम घरगुती उपाय आहे.

3. काकडीचा रस

Shutterstock

काकडी ही नैसर्गिक अॅस्ट्रिजंट आहे आणि यामुळे पोअर्स बंद व्हायला मदत मिळते. यामुळे तुमची त्वचा अधिक तजेलदार होते. कारण यामध्ये पाण्याचं प्रमाण योग्य असते. काकडीचा रस चेहऱ्याला लावा आणि साधारण 20-25 मिनिट्स  तसेच ठेवा. नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. 

4. अॅप्पल साईड व्हिनेगर

Shutterstock

स्किन टोनर स्वरूपात तुम्ही अॅप्पल साईड व्हिनेगरचा वापर करू शकता. यामुळे त्वचेवरील पोअर्स लहान होती आणि त्वचादेखील स्वच्छ होईल. हे बनवण्यासाठी तुम्ही 1 चमचा अॅप्पल साईड व्हिनेगर घ्या आणि त्यात 1 चमचा पाणी मिसळा. मग कापसाच्या मदतीने हे चेहऱ्याला लावा. हे सुकू द्या. काही वेळानंतर चेहरा धुवा. तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर योग्य परिणाम काही दिवसातच दिसून येईल. आठवड्यातून दोन वेळा तुम्ही हा प्रयोग करू शकता. 

कॉस्मेटोलॉजिस्टकडून जाणून घेऊ या... ओपन पोर्स बंद करण्याचे सोपे घरगुती उपाय (How To Close Open Pores In Marathi)

5. बेकिंग सोडा आणि पाणी

Shutterstock

बेकिंग सोड्यात अँटीबॅक्टेरियल गुण आढळतात. जे आपल्या चेहऱ्यावरील मुरूमं आणि अॅक्ने कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. इतकंच नाही तर यामुळे त्वचेवरील पोअर्सदेखील लहान होतात. याची पेस्ट बनवण्यासाठी 2 चमचे बेकिंग सोडा आणि 2 चमचे पाणी घाला. हे पाणी थोडं गरम करून घ्या.  ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हातांनी मसाज करा. त्यानंतर हे साधारण अर्धा तास चेहऱ्यावर तसंच राहू द्या. अर्ध्या तासानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. हा घरगुती उपाय तुम्ही आठवड्यातून 3 - 4 वेळा करा. 

6. हळद आणि गुलाबपाणी

Shutterstock

पोअर्समध्ये लपलेले बॅक्टेरिया मारण्यासाठी आणि ओपन पोअर्स बंद करण्यासाठी फायदेशीर ठरते. 1 चमचा हळद आणि 1 चमचा गुलाबपाणी अथवा दूध मिसळा आणि त्याची पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर लावा. 10 मिनिट्स नंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. हा घरगुती उपाय तुम्ही दर एक दिवस आड करू शकता.

चेहऱ्यावरील ओपन पोअर्स तुम्हाला असे करता येतील कमी

7. केळं

Shutterstock

केळ्याची साल काढून ही साल तुम्ही चेहऱ्यावर लावा आणि साधारण 10 - 15 मिनिट्स तसंच ठेवा. नंतर चेहरा पाण्याने धुवा. केळ्याच्या सालीमध्ये  अँटिऑक्सिडंट्स असतात जे त्वचा तरूण राखण्यास मदत करतात. तसंच यामुळे त्वचा अधिक मुलायम होते आणि ओपन पोअर्स बंद होण्यास मदत होते. 

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.