चेन्नईत अक्षय कुमारच्या मदतीमुळे उभी राहणार पहिली 'ट्रान्सजेंडर' इमारत

चेन्नईत अक्षय कुमारच्या मदतीमुळे उभी राहणार पहिली 'ट्रान्सजेंडर' इमारत

ट्रान्सजेंडर लोकांना आपल्या कायद्याने काही सोयी करुन दिल्या असल्या तरी अजूनही लोकांनी त्यांना फारसं स्विकारलं नाही. माणसाच्या मुलभूत गरजा असलेल्या अन्न, वस्त्र, निवारा हे सगळं मिळवण्यासाठी त्यांना इतर सगळ्यांपेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागते. आजही अनेक ठिकाणी किन्नर, छक्का म्हणत या समाजाला राहण्यासाठी जागा दिली जात नाही. त्यामुळेच त्यांना झोपडपट्टया, रस्त्यांवरच राहावे लागते. पण आता ट्रान्सजेंडर कम्युनिटीला त्यांच्या हक्काचे घर मिळणार आहे. चेन्नईत पहिली ट्रान्सजेंडर लोकांसाठी इमारत बांधण्यात येणार आहे. या इमारतीसाठी अक्षय कुमार आर्थिक मदत केली आहे.

अक्षय कुमारने दिली इतकी रक्कम

Facebook

अक्षय कुमार या देशाचा नागरिक नसला तरी त्यांचे मन हे संपूर्ण हिंदुस्तानी आहे. त्याने कायमच देशासाठी काम केले आहे. आता दुर्लक्षित झालेल्या समाजातील या घटकाला त्याच्या हक्काची जागा मिळावी म्हणून अक्षय कुमारने मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रान्सजेंडरला घर मिळावे यासाठी ही इमारत बांधण्यात येणार आहेत. चेन्नईत ही इमारत बांधण्यात येणार असून यासाठी अक्षय कुमार 1.5 कोटी रुपये देणार आहे. 

बिग बॉस फेम असीम रियाजने खास व्यक्तीला दिली खास भेट

दिग्दर्शकाने दिली माहिती

ट्रान्सजेंडर कम्युनिटीसाठी ही इमारत लॉरेंस चेरिटेबल ट्रस्ट बांधणार आहे. ही संस्था लहानमुलांसाठी आणि अपंगासाठी काम करते. या सेवाभावी संस्थेलाच ही मदत केली जाणार आहे. ही माहिती अक्षय कुमारने नाही तर अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘लक्ष्मी बॉम्ब’चा दिग्दर्शक राघव यांनी दिली आहे. त्याने अक्षय कुमारचे आभारही मानले आहेत. त्याने सांगितले की, चित्रपटादरम्यान मी अनेकदा अक्षय कुमारला या प्लॅनबद्दल, कम्युनिटीच्या अडचणीबद्दल सांगितले. अक्षय कुमारला ट्रस्ट या सेवाभावी संस्थेच्या गरजेबदद्लही सांगितले होते. अक्षयने कसलाही पुढचा मागचा विचार न करता दीड कोटी रुपयांची मदत जाहीर केली. नुसती जाहीरच केली नाही तर त्याने ती रक्कम दिली सुद्धा

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील ‘मंगली’ ला मराठीचे वेध

अक्षय कुमारला सोशल वर्कची आवड

Facebook

अक्षय कुमारने या प्रोजेक्टला पैसे दिले म्हणून तो सोशल वर्क करतो असे नाही. अनेक ठिकाणी अक्षय कुमारने प्रसिद्धीची कोणतीही अपेक्षा न करता काम केले आहे. तो अनेक सेवाभावी संस्थांशी संबंधित आहे. वेगवेगळ्या कारणासाठी तो त्यांच्याशी जोडला गेला असून त्याने अनेक चांगली कामे केली आहेत. या मदतीविषयी ही कळू शकले नसते. जर दिग्दर्शक राघव यांनी या बद्दल माहिती दिली नसती तर अक्षयच्या मदतीविषयी कळूच शकले नसते. 

 नेहा कक्करविषयी आदित्यच्या मनात आहेत या भावना, आदित्य म्हणाला...

अक्षय कुमार फारच मेहनती

अक्षय कुमार आज या वयातही इतका का चालतो? असा प्रश्न असेल तर अक्षय फारच मेहनती आहे. त्याचे ध्येय ठरलेले आहे. वर्षाला जास्तीत जास्त चित्रपट साईन करुन ते हिट करणारा तो एकमेव अभिनेता आहे. अभिनेता म्हणून लोकांनी त्याला कायम स्विकारावे यासाठी तो स्वत:च्या आरोग्याकडे फारच लक्ष देतो.  त्याच्या उठण्याच्या सवयी, खाण्याच्या पद्दधती आणि कामाच्या सवयी त्याला नेहमीच यश देतात. 


आता आणखी एका विधायक कामामुळे अक्षय कुमारवर शुभेच्छांचा वर्षाव होईल हे नक्की!

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे  20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.