केस आयुष्यभर दाट आणि काळे राहण्यासाठी मेंदीमध्ये करा हे तेल मिक्स

केस आयुष्यभर दाट आणि काळे राहण्यासाठी मेंदीमध्ये करा हे तेल मिक्स

आजकाल आपण इतकं उलटसुलट खात असतो. त्याचा केवळ शरीरावरच नाही तर केसांवरही परिणाम होत असतो. पांढरे केस आणि केसगळती या दोन्ही समस्या बऱ्याच जणांना असतात. त्यामुळे आपण लवकर म्हातारे तर होत नाही ना असा प्रश्न सतवायला सुरुवात होते. त्यासाठी आपण वेगवेगळे उपाय करत असतो. केसांवर त्यामुळे वेगवेगळ्या केमिकल्सचाही वापर करण्यात येतो. पण केमिकल्सच्या वापरामुळे केसांवर अधिक उलट परिणाम दिसून येतो. बऱ्याचदा आयुर्वेदिक उत्पादनांच्या वापरानेही केसांचा पांढरेपणा जात नाही. पण तुम्ही घरच्या घरी सोपा  उपाय करू शकता. सर्वात महत्त्चाचे म्हणजे हा उपाय तुमचे केस दाट आणि काळे राहण्यासाठी उपयुक्त आहे. तुम्ही मेंदीचा वापर जर करत असाल तर तुम्हाला हे सहज सोपे आहे. आपल्या केसांची सुंदरता टिकवायची असेल तर तुम्ही नुसती मेंदी वापरून चालणार नाही तर तुम्ही त्यामध्ये एक गोष्ट मिक्स केली तर तुम्हाला त्याचा उत्तम परिणाम मिळेल. एका आठवड्यात तुमचे केस दाट आणि चमकदार होतील. 

हर्बल मेंदी बनवून केसांवर कसा करायचा वापर, काय होतात फायदे जाणून घ्या

मेंदीमध्ये करा बदामाचं तेल मिक्स

Shutterstock

मेंदीमध्ये  तुम्ही जर बदामाचं तेल मिक्स केलं तर तुम्हाला नक्कीच चमकदार आणि दाट केस मिळतील. त्यासाठी तुम्हाला जास्त त्रासही सहन करावा लागणार नाही. शिवाय तुम्हाला जास्त पैसेही खर्च करावे लागणार नाहीत.  घरच्या घरी तुम्ही सोप्या पद्धतीने हा प्रयोग करून तुमची समस्या दूर करू शकता. बदाम हे केसांसाठी अधिक पौष्टिक आहे. त्यामुळे त्याचा मेंदीसह उपयोग केल्यास, तुम्हाला योग्य आणि चांगला परिणाम मिळतो. पण हे लावण्याची एक पद्धत आहे. त्यामुळे त्या पद्धतीचा वापर करूनच तुम्ही मेंदी लावा. 

 • मेंदी लावण्याच्या एक दिवस आधी तुम्ही मेंदी आणि पाणी घालून मिक्स करून ठेवा 
 • त्यानंतर ही मेंदी तुम्ही थोडी मंंद आचेवर गरम करा 
 • ती खाली उतरवल्यावर त्यात दोन चमचे बदामाचं तेल घालून ते व्यवस्थित मिक्स करा आणि हे मिश्रण थंड होऊ द्या
  थंड मिश्रण केसांना लावा आणि सुकेपर्यंत तसंच ठेवा
 • सुकल्यानंतर थंड पाण्याने केस धुवा
 • असे चार आठवडे केल्यास, तुमचे केस दाट, काळे, चमकदार आणि घनदाट होतील. त्याशिवाय तुमच्या  केसांना नैसर्गिक सुंदर रंगही मिळेल

केसांसाठी करताय मेंदीचा उपयोग, तर जाणून घ्या कशी करावी मिक्स

केस अधिक सुंदर करण्यासाठी काही टिप्स

केस तुम्हाला अधिक सुंदर आणि घनदाट करायचे असतील तर तुम्हाला घरच्या घरी काही उपाय करता येतात. त्यासाठी तुम्ही सोप्या पद्धतीचा वापर करा

 • तिळाचे तेल तुम्ही केसांना लावा अथवा त्याचे सेवन करा. तुम्ही तुमच्या आहारामध्ये तिळाच्या तेलाचा वापर केल्यास, तुमचे केस जास्त काळांसाठी काळेभोर राहतात
 • केस धुताना माईल्ड शँपू अथवा नैसर्गिक शिकेकाईचा वापर करा
 • केस धुण्याआधी एक कप चहाचे पाणी गरम करून त्यात एक चमचा मीठ मिक्स करून नीट ढवळा. हे मिश्रण केसांना केस धुण्याआधी एक तास लावा आणि मग केस धुवा.  यामुळे केस काळे राहण्यास मदत मिळते. मेंदीमध्येही तुम्ही चहाचे पाणी मिक्स करून लावू शकता
 • आलं कुटून त्यामध्ये मध घाला आणि पेस्ट तयार करा. ही पेस्ट डोक्याला लावा. यामुळे पांढरे केस काळे होतील

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.