काही खास समारंभासाठी ज्यावेळी जायचं असतं त्यावेळी इतर दिवसांपेक्षा थोडी हेअर स्टाईल करायला आपल्या सगळ्यांनाच आवडते. अंबाडा हेयर स्टाइल ही सध्या जास्तच ट्रेंडमध्ये आहे. अप डू प्रकारातील ही हेअरस्टाईल तुम्ही विचार करत असलेल्या टीपिकल पद्धतीने केली जात नाही तर आता यामध्ये इतके वेगळे प्रकार आहेत की, तुम्हाला या अंबाडा हेयर स्टाइल नक्की आवडतील आणि एकदा तरी करायव्याशा वाटतील. आज आपण साधा अंबाडा, लहान केसांचा अंबाडा अशा काही हेअरस्टाईल पाहणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया अशाच काही अंबाडा हेयर स्टाइल
जसं आम्ही म्हटलं की, अंबाडा हेयर स्टाइलचे वेगवेगळे प्रकार आहेत. यातीलच काही आंबाड्याचे प्रकार आपण आज पाहणार आहोत. अगदी पारंपरिक खोप्यापासून ते आताच्या स्टायलिश हेअरस्टाईलपर्यंत वेगवेगळे प्रकार आपण पाहणार आहोत. यातील काही हेअरस्टाईल तुम्ही अगदी घरीसुद्धा ट्राय करु शकता. यासाठी तुम्हाला थोड्या प्रॅक्टीसची गरज लागेल. अजून काही नाही. मग पाहुया या काही हेअरस्टाईल
अशी करा लहान केसांची हेअर स्टाईल - Hairstyles For Short Hair
महाराष्ट्रीयन पद्धतीमध्ये अगदी हमखास केली जाणारी हेअरस्टाईल म्हणजे ‘खोपा’ पारंपरिक नऊवारी साडीवर अगदी हमखास ही हेअरस्टाईल केली जाते. केसांचा खोपा बांधणे फारच सोपे असते. हा खोपा कसा बांधला जातो ते पाहुया.
अंबाडा बांधण्यासाठी लागणारे साहित्य: केसांच्या पीन, केसांच काटा, रेडिमेड अंबाडा वेणी, रबर बँड, गुलाबाची फुलं
असा बांधा आंबाडा:
कधी करता येईल हेअरस्टाईल: खोपा हेअर स्टाईल ही अगदी पारंपरिक अशी हेअरस्टाईल आहे. ही हेअरस्टाईल तुम्हाला नऊवारी साडीवर छानच खुलून दिसेल. तुम्हाला सहावारी पण काठापदराच्या साडीवरही ही अशाप्रकारची हेअरस्टाईल करता येईल.
मॉर्डन आंबाड्यामध्ये जाणारा हा प्रकारही आता आपल्याला नवीन राहिला नाही. तुमचे केस लहान असो किंवा मोठे अगदी कोणालाही ही हेअरस्टाईल करता येते विशेष म्हणजे ही हेअरस्टाईल कोणतीही मेहनत न घेता घरच्या घरी करता येते.
आंबाडा बांधण्यासाठी लागणारे साहित्य: पीना,हेअर बड्स, वेणी, गजरा (आवश्यकतेनुसार)
असा बांधा आंबाडा:
कधी करता येईल हेअरस्टाईल: फ्रेंच रोल तुम्हाला अगदी ऑफिसलाही करता येतो. पण लग्नसमारंभात तो अधिक खुलून दिसतो. एखाद्या पार्टीला तुम्ही छान वेस्टर्न साडी नेसली असेल तरी ही हेअरस्टाईल तुम्हाला चांगली दिसते.
वाचा - महाराष्ट्रीयन नववधूवर खुलून दिसतील या '15' हेअरस्टाईल्स
तुमचे काम वाचवणारी अशी ही सिंपल अंबाडा हेयर स्टाइल आहे. यामध्ये एका विशिष्ट डोनटचा वापर केला जातो . त्यामुळे तुमचे केस लहान किंवा विरळ असले तरी ते छान भरगच्च दिसतात.
आंबाडा बांधण्यासाठी लागणारे साहित्य: केसांटा डोनट (काळ्या रंगाचा बन), केसांची जाळी, पीना, यु पीन, गजरा किंवा तत्सम डेकोरेशनचे साहित्य
असा बांधा आंबाडा:
कधी करता येईल हेअरस्टाईल: डोनट हेअरस्टाईल तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने करता येईल. तुम्ही लग्नासाठी एखाद्या छोट्या पार्टीसाठी ही हेअरस्टाईल करु शकता.
आता तुम्हाला थोडा ट्विस्ट देऊन हेअरस्टाईल करायची असेल तर तुम्ही हेअर ट्विस्ट आंबांडा ही हेअरस्टाईल करु शकता. हा आंबाडा तुम्हाला लहान केसांना करता येणार नाही. या साठी तुमचे केस थोडे मोठे लागतील.
आंबाडा बांधण्यासाठी लागणारे साहित्य: केसांच्या हेअर पीन्स, रबर बँड, हेअर डेकोरेशन पीन्स
असा बांधा आंबाडा:
कधी करता येईल ही हेअरस्टाल: आता ही आंबाडा हेअरस्टाईल थोडी फॅन्सी वाटत असली तरी लग्न समारंभासाठी ही हेअरस्टाईल अगदी परफेक्ट आहे.
आता आपण फ्रेंट ट्विस्ट किंवा फ्रेंच रोल ही हेअरस्टाईल पाहिली आहे. आता जर तुम्हाला यामध्ये थोडासा ट्विस्ट हवा असेल तर तुम्ही ही हेअरस्टाईल नक्की करुन पाहा. ही हेअरस्टाईल तुम्हाला नक्कीच आवडेल. ही हेअरस्टाईल तुम्हाला लहान केसांवरही करता येईल. आता ही हेअरस्टाईल कशी करायची ते पाहुया.
आंबाडा बांधण्यासाठी लागणारे साहित्य: केसांच्या पीना, हेअर अॅसेसरीज आवडीनुसार
असा बांधा आंबाडा:
कधी करता येईल ही हेअरस्टाईल: ही हेअरस्टाईल पार्टीसाठी अगदी योग्य आहे. त्यामुळे तुम्ही मस्त ही हेअरस्टाईल करा. तुमच्या गाऊनवर हा फ्रेंच रोल अगदी छान शोभून दिसेल.
जर तुम्हाला समोर केस चपटे आवडत नसतील तर तुम्हाला हा फॅन्सी बन आंबाडा हेअरस्टाईल करता येईल.आता हा फॅन्सी बन कसा बांधायचा ते आता पाहुया.
आंबाडा बांधण्यासाठी लागणारे साहित्य: केसांच्या पीना, रबर, यु पीन, हेअर पफसाठी रेडिमेड मिळणारे साहित्य
असा बांधा आंबाडा:
कधी करता येईल ती हेअरस्टाईल: ही हेअरस्टाईल करायला फारच सोपी आहे. तुम्ही लग्न समारंभासाठी अशी हेअरस्टाईल करु शकता.
डोनटचा वापर कसा करायचा हे तुम्हाला आता पर्यंत कळालेच असेल. आता याचाच थोडासा वेगळा आणि अॅडव्हान्स प्रकार म्हणजे ही डोनट झिग झॅक आंबाडा आता हा आंबाडा कसा बांधायचा ते बघूया.
आंबाडा बांधण्यासाठी लागणारे साहित्य: पीन, यु पीन, हेअर रबर
असा बांधा आंबाडा:
कधी करता येईल हेअरस्टाईल: तुम्ही एखाद्या खास कार्यक्रमासाठी ही हेअरस्टाईल नक्की करा खूप छान आणि उठून दिसेल.
हा अंबाडा थोडा फॅन्सी आहे बरं. तुम्हाला ही हेअरस्टाईल अगदी घरच्या घरी आणि सोप्या पद्धतीने करता येईल. या आंबाड्याला तुम्ही तुमच्या पद्धतीने डेकोरेट करु शकता. आता हा रोज अंबाडा कसा बांधायचा ते बघूया.
आंबाडा बांधण्यासाठी लागणारे साहित्य: यु पीन, पीन आवश्यक असल्यास हेअर स्प्रे
असा बांधा आंबाडा:
कधी करता येईल हेअरस्टाईल: हा थोडा फॅन्सी बन आहे तुम्ही कोणत्याही कार्यक्रमात करु शकता. तुम्हाला तुमच्या वेस्टर्न वेअर गाऊनवरही ही हेअरस्टाईल करता येईल.
मेसी बन आंबाडाची सध्या फॅशन आहे. हा मेसी बन बांधणे खूपच कठीण असते. पण थोड्या प्रयत्नांनी तुम्हाला हा बन बांधता येईल. कुरळ्या केसांवर ही हेअरस्टाईल अगदी सहज करता येते. पण सरळ केस असलेल्यांना थोडी मेहनत घ्यावी लागते. आता सोप्या पद्धतीने हा बन कसा बांधायचा ते जाणून घेऊया.
आंबाडा बांधण्यासाठी लागणारे साहित्य: यु पीन, पीन, टेल कोंब, हेअर स्प्रे, केसांचा टाँग
असा बांधा आंबाडा:
कधी करता येईल हेअरस्टाईल: तुम्हाला साडीपासून पार्टीवेअर पर्यंत अशाप्रकारचा अंबाडा बांधता येतो. त्यामुळे तुम्ही अगदी कधीही ही हेअरस्टाईल करु शकता.
हल्ली तुम्ही अनेक सेलिब्रिटींना असा लो नेक अंबाडा हेअरस्टाईल करताना पाहिले असेल. अगदी मानेकडे हा अंबाडा येतो. पण याला ट्विस्ट देण्यासाठी तुम्ही थोडी व्हरायटी आणू शकता. कसा बांधायचा हा लो नेक आंबाडा ते पाहुया.
आंबाडा बांधण्यासाठी लागणारे साहित्य: पीना, रबर, फॅन्सी पीन्स
असा बांधा आंबाडा:
कधी कराल ही हेअरस्टाईल: तुम्हाला कोणत्याही प्रसंगी असा बन करता येईल. पण एखाद्या लाँग गाऊनवर ही हेअरस्टाईल छान उठून दिसेल.
1. छोट्या केसांसाठी आंबाड्याची बेस्ट डिझाईन कोणती?
छोट्या केसांचा बन किंवा लहान केसांचा आंबाडा बांधणे थोडे कठीणच असते. जर तुमचे केस लहान असतील तर तुम्ही गंगावनचा उपयोग करुन कोणताही आंबाडा बांधू शकता. पण तुमच्यासाठी बांधायला आणि डिझाईन टिकवून ठेवायला आंबाडा हेअरस्टाईलचा बेस्ट प्रकार म्हणजे फ्रेंच रोल. कारण लहान केसांचा फ्रेंच रोल चांगला बांधला जातो. तो फार जडही होत नाही आणि दिसायला एकदम छान दिसतो.
2. आंबाडा टिकून राहण्यासाठी हेअर स्प्रे वापरण्याची गरज असते का?
हल्ली कोणतीही हेअरस्टाईल करायची असेल आणि ती टिकवायची असेल तर हमखास हेअर स्प्रे वापरला जातो. जर तुम्हाला काही खास समारंभासाठी ही हेअरस्टाईल करायची असेल तुमचा खूप वेळ त्या कामामध्ये जाणार असेल तर तुम्ही हेअर स्प्रे वापरायला हवा. पण हा हेअर स्प्रे वापरल्यानंतर तुम्हाला तुमच्या केसांची काळजी घेणेही तितकेच गरजेचे असते.
3. आंबाडा हेअरस्टाईल करण्याआधी केसांना क्रिम्मिंग करण्याची गरज असते क?
ज्यावेळी लग्नासाठी किंवा काही खास समारंभासाठी अंबाडा हेअरस्टाईल केली जाते. त्यावेळी तुमचे केस क्रिम्प केले जातात. तुम्हाला केसांना पर्म केल्यावर केस कसे दिसतील हे जर माहीत असेल तर अगदी तसेच तुमचे केस क्रिम्पिंग केल्यावर दिसतात. जर तुमचे केस सिल्की असतील तर अशा केसांवर आंबाडा पीन, आंबाडा बन राहात नाही. अशावेळी तुमच्या केसांना ड्राय करण्यासाठी क्रिम्पिंग केले जाते. आता तुम्ही कोणती हेअरस्टाईल निवडली त्यानुसार हे क्रिम्पिंग केले जाते. म्हणजे काहींना फक्त पुढच्या भागात तर काहींच्या सबंध केसांना क्रिम्पिंग केले जाते.
आता तुम्ही ही लग्नाला किंवा खास समारंभाला जाणार असाल तर नक्की ट्राय करा या आंबाडा हेअर स्टाईल
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.