नोटांच्या वापरामुळे होते का कोरोनाची लागण, जाणून घ्या

नोटांच्या वापरामुळे होते का कोरोनाची लागण, जाणून घ्या

कोरोना व्हायरसचा थोका दिवसेंदिवस वाढतोच आहे. यातील रोज नवनवीन पैलू आपल्यासमोर येत आहेत. अशावेळी आवश्यक आहे की, आपण विशेष काळजी घेऊन आपल्या आणि कुटुंबियांना सुरक्षित ठेवणं. आजही खरेदी करताना अनेकजण रोख रक्कम देऊन देवाणं-घेवाण करतात. पण कोरोना व्हायरसचा संसर्ग पाहता यामुळे तुम्ही धोक्यात येऊ शकता.

काय आहे रिजर्व्ह बँकेचा नवा नियम

रिजर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या नव्या गाईडलाईन्स या कोरोना व्हायरसच्या संसर्गाला रोखण्यासठी महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचं म्हटलं जातंय. हे नवा नियम रोख व्यवहारांबाबत आहे. जाणून घेऊया हा नवा नियम. आरबीआय आणि डॉक्टरांच्या मते कोरोना टाळायचा असल्यास रोख व्यवहार करणं टाळा. आरबीआयकडून लोकांना सध्याच्या वातावरणात डिजीटल पेमेंट्सचा वापर करण्याची विनंती करण्यात आली आहे. असं केल्याने कोरोना व्हायरस पसरण्याचा धोका काही मर्यादेपर्यंत कमी होईल.

यामागील नेमकं कारण काय?

या नव्या नियमामागील कारण आहे डब्ल्यूएचओ म्हणजे जागतिक आरोग्य संघटना यांनी जाहीर केलेली आरोग्य सूची. ज्यामध्ये सांगण्यात आलं आहे की, कोरोना व्हायरस हा पर्सन टू पर्सन पसरतो आणि रोख व्यवहार करताना आपण समोरच्या व्यक्तींपासून जास्त लांब नसतो. त्यामुळे अशावेळी कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे रोख व्यवहार टाळा आणि डिजीटल पेमेंट करा.

खरंच नोटांमुळे होऊ शकतो कोरोनाचा संसर्ग

हो..असं होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही समोरच्या व्यक्तीकडून नोटा घेतल्या आणमि त्या व्यक्तीला कोरोना संसर्ग झाला असेल किंवा सर्दी-खोकला असेल तर ती व्यक्ती त्याच शिंकलेल्या किंवा खोकल्याच्या हाताने तुम्हाला नोटा देईल. अशा व्यवहारानंतर जर सॅनिटाईजरने हात धुतले गेले नाहीत तर संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे प्रयत्न करा की, कोणत्याही दुकानदार किंवा व्यक्तीशी रोख व्यवहार करताना डिजीटल पेमेंट करा.

डिजीटल पेमेंट करण्यासाठी वापरा या एप्स

आता डिजीटल पेमेंट करणं खूपच सोपं झालं आहे कारण आजकाल प्रत्येक दुकानात किंवा दारावर येणाऱ्या डिलीव्हरी बॉयकडेही डिजीटल पेमेंटच्या एप्स असतात. जसं गुगल पे, फोन पे किंवा पेटीएम या एप्सने तुम्ही डिजीटल पेमेंट करू शकता. तुमच्या घरातील व्यक्तीकडून ते नक्की शिकून घ्या आणि त्याचा वापर करा. तसंच शक्य असेल तितकं गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा. ज्यामुळे कोणत्याही प्रकारे कोरोनाचा संसर्ग टाळता येईल.

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

देखील वाचा -

कोरोना व्हायरसवर गायिका मालिनी अवस्थीचं हे गाणं तुम्हालाही देईल ऊर्जा

कोरोनाच्या तणावातून बाहेर पडण्यासाठी हवी मनः शांती, मग असे करावे ध्यान