ADVERTISEMENT
home / Fitness
सुकलेलं लसूण फेकण्याआधी हे वाचा.. तुम्हालाही बसेल धक्का

सुकलेलं लसूण फेकण्याआधी हे वाचा.. तुम्हालाही बसेल धक्का

किचनमध्ये अशा अनेक वस्तू असतात ज्या कधी कधी आपण न वापरताच फेकून देतो. जुन्या झालेल्या वस्तू काय कामाच्या म्हणत आपण फ्रिजमधील भाज्या,फळं आपण अनेकदा न खाताच फेकून देतो. घरात फोडणीसाठी वापरल्या जाणाऱ्या लसूणाच्या बाबतीत तुम्ही असे करत असाल तर मग थोडं थांबा. कारण सुकलेलं लसूण हे फारच फायद्याचे आहे. त्याचे फायदे वाचाल तर मग तुम्ही सुकलेल्या लसूणाचा वापर सुरु आजपासूनच सुरु कराल. चला तर मग जाणून घेऊया या सुकलेल्या लसूणाचे आश्चर्यकारक फायदे

पायांवर पाय ठेवून बसण्याची सवय मग तुम्ही हे वाचायलाच हवे

शरीराला पुरवते लोह

ओल्या लसणीचे जसे फायदे आहेत तसेच सुक्या लसूणचे सुद्धा आहे. शरीराला आवश्यक असलेले लोह पुरवण्याचे काम सुकलेले लसूण करते. तुमच्या शरीरातील उर्जा वाढवण्यासाठी सुकलेले लसूण कामी येते. लसूण तुमच्या शरीराला ऑक्सिजन पुरवण्याचे काम करते यामुळे तुमची पचनशक्ती सुधारते. तुमच्या शरीराला आवश्यक असलेले लोह तुम्हाला मिळाले की, तुमचा थकवा निघून जातो. संशोधनातून असे समोर आले आहे की, जर तुम्ही एक ते दोन सुकलेले लसूण खाल्ले तर तुम्हाला त्यामुळे ताकद मिळू शकते.

फक्त ब्रेस्ट साईज वाढवायचं असेल तर खा हे सुपरफूड्स

ADVERTISEMENT

मज्जासंस्था करते मजबूत

सुकलेले लसूण

shutterstock

तुमच्या शरीराला आवश्यक असणारे लोह तुम्हाला सुकलेले लसूण देते. पण त्यासोबतच त्याच्या सेवनामुळे तुमची मज्जासंस्था निरोगी राहते. साधारण तीन ते चार लसूणच्या पाकळ्या तुम्हाला 190 मायक्रोग्रॅम इतके कॉपर पुरवतात. त्यामुळे तुमची मज्जासंस्था अगदी योग्यपद्धतीने कार्यरत राहते . शिवाय तुमच्या मेंदुसाठी आवश्यक असणाऱ्या फॅटी अॅसिड, मेलिन या घटकांनी निर्मितीही अगदी योग्य प्रमाणात करते. जर तुम्हाला फोडणीला लसूण घालणे शक्य असेल तर तुम्ही या सुकलेल्या लसूणाचा उपयोग करु शकता.

मॅगनीजचा योग्य पुरवठा

सुकलेल्या लसूणमध्ये मॅगनीज असते. मॅग्नीज तुमच्या हाडांना बळकटी आणण्याचे काम करते. सुक्या लसूणच्या सेवनामुळे तुम्हाला Glycosytransferases नावाचे एन्झाईम मिळते. ज्यामुळेच तुमच्या हाडांची मजबूती टिकून राहते. लहानमुलांमध्ये  हाडांची योग्य वाढ होते. याशिवाय तुमच्या त्वचेसाठीही लसूण फारच फायद्याचे आहे कारण यामुळे कोलॅजन निर्मितीचे प्रमाण वाढते. त्यामुळे तुमच्या त्वचेच्या समस्या दूर होण्यास आपल्याला मदत मिळते. जर तुम्हाला काही जखमा असतील तर त्यादेखील भरुन निघतात.

ADVERTISEMENT

मूत्रपिंड ठेवते निरोगी

निरोगी मूत्रपिंड

shutterstock

सुकलेल्या लसूणमध्ये योग्य प्रमाणात फॉस्फरस असते. आपल्या शरीरासाठी ते एक उत्तम मिनरल आहे. फॉस्फरस तुमच्या मूत्रपिंडाचे काम सुरळीत ठेवण्यास मदत करते. त्यामुळे मूत्रपिंडाचे काम सुरळीत सुरु राहते. तुमच्या दाताचे आरोग्य चांगले राहण्यासाठी फॉस्फरस उपयोगी पडते.  दोन चमचे सुके लसूण तुम्ही खाल्ले तरी तुम्हाला त्याचा फायदा होईल. 

लसूण सुकल्यानंतर त्याचा रंग बदलतो.त्याचा तीव्र दर्प कमी होतो. त्यामुळे ते खाताना त्याचा वास जाणवत नाही. आता तुम्ही सुकलेलं लसूण अजिबात फेकू देऊ नका. ते नुसते खा किंवा त्याचा उपयोग तुम्ही फोडणीतही अगदी आारामात करा.

ADVERTISEMENT

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे  20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

17 Mar 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT