'या' कारणांसाठी खाल्लीच पाहिजे कोबीची भाजी

'या' कारणांसाठी खाल्लीच पाहिजे कोबीची भाजी

कोबीची भाजी डब्यात बघितल्यावर अनेकजण नाकं मुरडतात. पण कोबी ही अशी भाजी आहे जी बाजारात बारा महिने उपलब्ध असते. त्यामुळे महिलांसमोर ही भाजी घेण्यावाचून पर्यायही नसतो. पण कितीही नावडती कोबीची भाजी असली तरी या भाजीमध्ये व्हिटॅमीन ए, बी1, बी2, बी6, ई, सी, के आणि कॅल्शियम, आर्यन, आयोडीन, पोटॅशियम, सल्फर आणि फॉलेटसारखे मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे कोबीच्या भाजीला सुपरफूड असं संबोधल्यास चुकीचं ठरणार नाही. जाणून घेऊया ही भाजी खाण्याचे महत्त्वपूर्ण फायदे. 

Shutterstock

त्वचा उजळण्यासाठी कोबी : व्हिटॅमीन सी शरीरातील उत्तम कोलेजनच्या निर्मितीला चालना देतं. हे डॅमेज झालेल्या त्वचेला नीट करण्यास मदत करतं. ज्यामुळे तुमच्या त्वचेवरचा गेलेला ग्लो परत येतो. यामुळे चेहऱ्यावरील डाग दूर होऊन त्वचा उजळलेली दिसते. 


वेटलॉसमध्ये होईल मदत : कोबी हा फायबरचा उत्तम स्त्रोत आहे. फायबरमुळे पोट जास्त वेळ भरल्यासारखं वाटतं ज्यामुळे भूक कमी लागते आणि वजन व फॅट कमी होण्यास मदत मिळते. 


यकृत आणि पोटासाठी आरोग्यदायी : कोबीच्या भाजीत इंडोल-3 कार्बोनाईल हे अँटीऑक्सीडंट असतं. जे तुमच्या यकृताला डिटॉक्सीफाय करण्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावतं. तसंच कोबीची भाजी पचन क्रिया सुरळीत ठेवण्यासही मदत करते. ज्यामुळे पचनासंबंधीच्या समस्या दूर होतात.

Shutterstock

शरीराच्या डिटॉक्ससाठी : या भाजीत व्हिटॅमीन सी आणि सल्फर असल्यामुळे शरीरातील विषारी घटकंही बाहेर फेकले जातात. ज्यामुळे शरीराच्या रोगप्रतिकारक क्षमतेला चालना मिळते आणि अनेक आजारांपासून आपलं संरक्षण होतं. 


हृदयरोगापासून बचाव : कोबी शरीरातील बीटा-कॅरटीन, ल्युटीन आणि हृदयाला सुरक्षित ठेवणाऱ्या अँटीऑक्सीडंट्स वाढवण्यात मदत करतो. हे वाईट कॉलेस्ट्रॉल कमी करण्यातही मदत करतं. जे हृदरोगाच्या धोक्यापासून आपला बचाव करतं.

Shutterstock

मग पुढच्या वेळी आईने डब्यात कोबीची भाजी दिल्यास नाक मुरडू नका. कारण तुम्हाला आता कोबी खाण्याचे फायदे कळले असतीलच. त्यामुळे बाजारात बारा महिने मिळणारा कोबी नक्की खा. जर तुम्हाला कोबीची भाजी आवडत नसल्यास पर्याय म्हणून तुम्ही कोबीचं सॅलड, कोबीची कोशिंबीर, कोबीचा पराठा किंवा कोबीची भजीही करून खाऊ शकता.

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.