नेहमी तरूण दिसण्यासाठी, नियमित प्या हे ज्युस

नेहमी तरूण दिसण्यासाठी, नियमित प्या हे ज्युस

नेहमी तरूण दिसावं असं कोणाला वाटत नाही? सर्वांनाच आपण नेहमी तरूण दिसावं असं वाटत असतं. पण वयानुसार आपली त्वचा अधिक वयस्क होत जाते. पण तरूण दिसण्यासाठी बाजारामध्ये अशी अनेक उत्पादनं अथवा क्रिम्स उपलब्ध आहेत. तर काही जण तरूण दिसण्यासाठी सर्जरीही करून घेतात. पण हे सर्व करायचं नसेल आणि नैसर्गिकरित्या नेहमी तरूण दिसायचं असेल अथवा त्वचा उजळ ठेवायची असेल तर तुम्ही नियमित काही ज्युसचा वापर करू शकता.  तुम्ही या ज्युसचं सेवन नियमित केलं तर तुमच्या शरीराला आणि त्वचेला खूपच फायदा मिळेल. रोज तुम्ही या ज्युसचा एक ग्लास प्यायल्यास, त्वचेसाठी फायदेशीर ठरतं. तसंच आपल्या शरीरातील काही आजार बरे करण्यसाठीही या ज्युसचा उपयोग होतो. ज्युस प्यायल्याने आपण नेहमीच आरोग्याच्या बाबतीतील फायदे जाणून घेतले आहेत. पण आता आपण नेहमी तरूण दिसण्यासाठी त्वचेसाठी नक्की ज्युसचे काय फायदे होतात ते पाहूया. 

संत्र्याचे ज्युस

Shutterstock

रोज संत्र्यांचं ज्युस पिणं हे केवळ तुमचा मूडच चांगला ठेवत नाही तर तुमच्या चेहऱ्यावरील अॅक्ने ठीक करण्यासाठी आणि तुमच्या चेहऱ्याची त्वचा आणि टेक्स्चर चांगले करण्यासाठीही फायदेशीर ठरते. संत्र्याच्या ज्युसमध्ये असणारे सायट्रिक अॅसिड हे त्वचेला हायड्रेट करून सनबर्नपासूनही सुटका मिळवून देतात. त्यामुळे त्वचेवर सुरकुत्या पडत नाहीत आणि त्वचा जास्तीत जास्त वेळ तरूण राहण्यासाठी फायदा मिळतो. 

मोसंबीचा ज्युस

Shutterstock

मोसंबीचा ज्युस तर सर्व ठिकाणी मिळतो. अगदी प्रत्येक नाक्याच्या कोपऱ्यावर मोसंबीचा ज्युस तुम्हाला पाहायला मिळत असेल. पण तो तुम्ही सकाळीच प्यायला देखील हवा.  यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि विटामिन सी त्वचेमध्ये इन्फेक्शन होण्यापासून रोखतात. तसंच हे ज्युस तुम्ही नियमित प्यायलात तर त्वचेवर कोणत्याही प्रकारे इन्फेक्शन होत नाही. तसंच या ज्युसमुळे रक्तही शुद्ध राहातं. ज्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येत नाहीत आणि अॅक्नेसारख्या समस्याही निर्माण होत नाहीत. 

वजन कमी करण्यासाठी घरीच तयार करा उत्कृष्ट डिटॉक्स ड्रिंक्स

डाळिंबीचा ज्युस

Shutterstock

डाळिंब खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होत असतात. त्याचप्रमाणे चेहऱ्यासाठीही याचा फायदा होतो. यामुळे त्वचा अधिक कसदार होते आणि चेहऱ्यावर नवे सेल्स बनवण्यात डाळिंबाच्या दाण्याची मदत होते. अर्थात त्वचेवरून म्हातारपण अर्थात एजिंग गायब करण्यात आणि तुम्हाला अधिक तरूण दाखवण्यात डाळिंबाच्या ज्युसचा फायदा अधिक होतो. 

फळाचे ज्युस सतत पिण्याची सवय पडू शकते महागात, वेळीच व्हा सावध

गाजराचा ज्युस

Shutterstock

गाजर हे ज्याप्रमाणे डोळ्यांसाठी अधिक चांगले आहे त्याचप्रमाणे त्याचा फायदा चेहऱ्यासाठीही होतो. याने ज्युस प्यायल्याने अॅक्ने, सुरकुत्या आणि पिगमेंटेशनपासून तुम्हाला सुटका मिळते. कारण गाजर हे रक्त शुद्ध करण्यासाठी फायदेशीर ठरते. ज्यामुळे चेहरा उजळण्यास मदत मिळते. गाजरामुळेही तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या  निघून जाण्यास मदत मिळते. त्यामुळे रोज या ज्युसचे सेवन केल्यास, तुमच्या त्वचेला अधिक फायदा मिळू शकतो. 

शरीरात विटामिन सी ची असेल कमतरता, नियमित प्या हे ज्युस

बीटाचा ज्युस

Shutterstock

बीटामध्ये अधिक प्रमाणात लोखंड अर्थात आयरन आणि पोटॅशियम असतं जे रक्त शुद्ध करण्यासाठी उपयुक्त ठरतं. यामुळे त्वचेवर मुरूमं येण्यापासून आणि अॅक्ने येण्यापासून त्रास  होत नाही. तसंच बीटामध्ये त्वचेवर अधिक उजळपणा आणण्याचं आणि तरूण राहण्यासाठी उपयुक्त गुणधर्म असतात. त्यामुळे बीटाचा ज्युस हा नेहमी प्यायला हवा. यामुळे रक्त शुद्ध झाल्याने त्वचा अधिक उजळते आणि त्वचेवर तरूणपणा अधिक झळकतो. 

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.