ADVERTISEMENT
home / Diet
Keto Diet Plan In Marathi

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे ‘किटो डाएट’ (Benefits Of Keto Diet Plan In Marathi)

आजकाल फिटनेस आणि डाएट बाबत सर्वत्र जागरूकता निर्माण झालेली आहे. ज्यामुळे निरनिराळी डाएट करण्याकडे सर्वांचा कल असतो. किटोजेनिक डाएट (Ketogenic diet) ची चर्चा मोठ्या प्रमाणावर होत आहे. अगदी सेलिब्रेटीजपासून आहारतज्ञ्जांपर्यंत सर्वच या डाएटचा सल्ला देतात. या डाएटला किटो डाएट असंही म्हटलं जातं. या डाएटमध्ये लो कार्ब फॅटचा समावेश असल्यामुळे वजन आणि चरबी मोठ्या प्रमाणावर कमी होते. आहारात विशेष बदल करूनदेखील या डाएटमुळे तुमच्या शारीरिक ऊर्जेवर काहीच परिणाम होत नाही. त्यामुळे तुम्ही डाएटवर असूनही दिवसभर उत्साही आणि तजेलदार दिसता.  म्हणूनच या डाएटविषयी सर्वकाही अवश्य जाणून घ्या. 

Benefits Of Keto Diet In Marathi

Shutterstock

किटो डाएटमुळे असा होतो तुमच्या आरोग्यात बदल (Health Benefits Of Keto Diet In Marathi)

किटो डाएटचा तुमच्या आहारावर काय परिणाम होतो हे प्रत्येकाला माहीत असायला हवं. कारण या किटो डाएट आरोग्यावर अनेक चांगले परिणाम होतात. 

ADVERTISEMENT

मधुमेंहीना वजन कमी करण्याठी फायदेशीर (Beneficial For Weight Loss In Diabetes)

किटो डाएटमुळे तुमच्या शरीरातील मॅटाबॉलिझमचा स्तर सुधारतो. ज्यामुळे शरीरातील जास्तीत जास्त फॅट्स बर्न होतात. सहाजिकच यामुळे तुमच्या शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते आणि तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटते. किटो डाएटची विशेष गोष्ट म्हणजे यामुळे तुमच्या शरीरातील इन्सूलिनदेखील नियंत्रणात राहण्यास चांगली मदत होते. म्हणूनच जर तुम्ही मधुमेही असाल तर किटो डाएट तुमच्यासाठी वरदान ठरते

ह्रदयाचे कार्य सुधारते (Improves Heart Functions)

ह्रदयाच्या उत्तम आरोग्यासाठी शरीरातील कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण असणं फारच महत्त्वाचं आहे. किटो डाएटमुळे शरीरातील गुड कोलेस्ट्रॉल वाढते आणि बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. याचा तुमच्या संपूर्ण आरोग्यावर आणि ह्रदयावर चांगला परिणाम होतो. यासाठी जर तुम्हाला ह्रदयाचे विकार असतील अथवा ह्रदय निरोगी राहावे असे वाटत असेल तर किटो डाएटचा तुमच्या जीवनशैलीत जरूर समावेश करा.

रक्तदाब नियंत्रणात राहतो (Keeps Blood Pressure Under Control)

ह्रदयाच्या आरोग्यासाठी शरीराचा रक्तदाब नियंत्रित असणं फार गरजेचं आहे. मात्र आजकालच्या धावपळीच्या काळात अनेकांना रक्तदाबाच्या समस्या जाणवतात. हायपरटेंशन अथवा अती रक्तदाबामुळे ह्रदय विकार निर्माण होतात. यासाठी परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधीच किटो डाएट करून तुमच्या रक्तदाबावर नियंत्रण मिळवा. 

मेंदूचे कार्य सुरळीत चालते (Brain Functions Smoothly)

किटो डाएटमुळे स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते. शिवाय या डाएटमुळे तीव्र डोकेदुखी, अॅसिडिटी, मायग्रेन अशा समस्यादेखील कमी होऊ शकतात. काही संशोधनानुसार वयस्कर लोकांना होणाऱ्या Parkinson आणि Alzheimer विकारांच्या रूग्णांमध्ये किटो डाएटमुळे चांगला फरक दिसून येतो. यासाठी अशा समस्या होण्याआधीच किटो डाएट घेण्यास सुरूवात करण्यास काहीच हरकत नाही. 

ADVERTISEMENT

पीसीओडीच्या समस्या कमी होतात (PCOD Problems Are Minimized)

पीसीओडीवर अथवा महिलांच्या काही आरोग्य समस्यांवर किटो डाएट घेण्याचा सल्ला देण्यात येतो. कारण या डाएटमध्ये साखर आणि साखरेचे पदार्थ घेण्यास पूर्णपणे बंदी आहे. कोणत्याही हॉर्मोनल समस्येसाठी हा उपाय सर्वात उत्तम आहे. म्हणूनच जर तुम्हाला पीसीओडीची समस्या असेल तर किटो डाएट केल्यामुळे चांगला फायदा होऊ शकतो. काही संशोधनामध्ये किटो डाएटमुळे वंधत्व कमी होण्यास मदत होते. 

एक्नेच्या समस्या कमी होतात (Acne Problem Subsides)

तुम्ही जे काही खाता त्याचा परिणाम तुमच्या त्वचेवर पर्यायाने चेहऱ्यावर होत असतो. किटो डाएटमुळे तुमच्या त्वचेत अनेक चांगले बदल दिसून येतात. त्वचा उजळ आणि तजेलदार हवी असेल तर किटो डाएट घेण्यास त्वरीत सुरूवात करा. किटो डाएटमध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी असल्यामुळे तुमच्या एक्नेच्या जखमा भरून निघण्यास मदत होते. ज्यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स हळू हळू कमी होतात

काही प्रकारच्या कर्करोगापासून संरक्षण होते (Protects Against Some Kinds Of Cancer)

संशोधनानुसार किटो डाएटचा काही कर्करोगापासून संरक्षण मिळण्यासाठी फायदा होऊ शकतो. यासाठी निरोगी आणि सुरक्षित आरोग्यासाठी जीवनशैलीमध्ये किटो डाएटचा समावेश करण्याची टाळाटाळ मुळीच करू नका. कारण त्याचा तुम्हाला आणि तुमच्या कुटुबियांना नक्कीच फायदा होऊ शकतो. 

किटो डाएटमध्ये कोणते खाद्यपदार्थ टाळावेत

ADVERTISEMENT

Shutterstock

किटो डाएटसाठी या खाद्यपदार्थांचा करा आहारात समावेश (Food To Eat In Keto Diet In Marathi)

किटो डाएट समजून घेणं थोडंसं त्रासदायक असल्याने काही जणांना ते फॉलो करणं कठीण जाण्याची शक्यता आहे. मात्र एकदा तुम्हाला त्याचे फायदे आणि पद्धत व्यवस्थित समजली की तुमचा फायदाच फायदा होऊ शकतो. यासाठी आधी तुम्हाला या डाएटमध्ये नेमके कोणते पदार्थ खावे हे माहीत असणं गरजेचं आहे. ज्यामुळे या पदार्थांचा वापर करून तुम्ही तुमच्या आवडत्या रेसिपीज तयार करू शकता.   

  • स्टार्च नसलेल्या भाज्या
  • दूधाचे पदार्थ (दूध,चीज,पनीर, बटर आणि क्रीम)
  • प्रोटिनयुक्त पदार्थ – भाज्या आणि निरनिराळ्या डाळींचे प्रकार
  • सुकामेवा आणि सीड्स ( बदाम, अक्रोड, अळशी, भोपळ्याच्या बिया) 
  • अॅवोकॅडो , स्टॉबेरी सारखी फळे
  • मांसाहारी पदार्थ ( रेडमीट, चिकन, मटण)
  • मासे (सुरमई आणि टूना मासा)
  • ऑलिव्ह ऑईल, अॅवोकॅडो ऑईल, नारळाचे तेल
  • अंडी 
  • मीठ, काळीमिरी आणि चवीपुरते तिखट

कोणते पदार्थ किटो डाएटमध्ये टाळावेत (Food To Avoid In The Keto Diet)

किटो डाएट करण्यासाठी काही खाद्यपदार्थ खाणे टाळणे गरजेचं आहे. यासाठी जाणून घ्या कोणते खाद्यपदार्थ किटो डाएटमध्ये मुळीच नसावेत. 

  • प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ (चिप्स, फरसाण, बिस्किटे)
  • गोड पदार्थ (सोडा, फळांचा रस, स्मूदी, केक, आईसक्रीम, चॉकलेट)
  • तृणधान्य (भात, चपाती, पास्ता)
  • कार्बोहायड्रेट असलेली फळे (स्टॉबेरीजसारख्या बेरीज सोडून सर्व प्रकारची फळे )
  • साखर आणि साखरेपासून तयार केलेले गोड पदार्थ
  • कंदमुळे (बटाटा, रताळी, गाजर)

किटो डाएट करताना या गोष्टींची घ्या काळजी

ADVERTISEMENT

Shutterstock

किटो डाएटचे दुष्परिणाम (Side Effects Of Keto)

किटो डाएटचे जसे शरीरावर फायदे होतात तसेच काही प्रमाणात दुषपरिणामदेखील होण्याची शक्यता असते. यासाठी कोणतेही डाएट सुरू करण्यापूर्वी आहारतज्ञ्जांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घेणं फार गरजेचं आहे. कारण ते तुमच्या शरीरप्रकृतीनुसार तुम्हाला कोणते डाएट करणं गरजेचं आहे हे नक्कीच सांगू शकतात. 

डायरिया

जर हे डाएट केल्यामुळे तुम्हाला वारंवार जुलाबाचा त्रास होत असेल तर तुम्हाला नक्कीच काळजी करण्याची गरज आहे. कारण किटो डाएटमुळे काही जणांना जुलाब अथवा डायरियाचा त्रास होऊ शकतो. कारण या डाएटमुळे तुमच्या शरीरात फायबर्स कमी गेल्यामुळे अथवा तुम्हाला दूधाच्या पदार्थांची अॅलर्जी असल्यामुळे असे होऊ शकते. 

मधुमेहींना असू शकतो धोका

जर तुम्ही टाईप 2 मधुमेही असाल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे डाएट नाही करू शकत. कारण जर या डाएटचा चुकीचा परिणाम तुमच्या शरीरावर झाला तर तुमच्या किडनी अथवा यकृतावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. 

ADVERTISEMENT

वजन वाढण्याची शक्यता

किटो डाएटमध्ये काही गोष्टींचे काटेकोरपणे पालन करावे लागत असल्यामुळे तुम्ही ते फार करणं कठीण आहे. मात्र काही संशोधनानुसार जर तुम्ही किटो डाएट अर्ध्यावरच सोडून दिले तर तुमचे कमी झालेले वजन दुपट्टीने वाढण्याची शक्यता आहे. 

किटो फ्लू

किटो डाएट करताना जाणवणारा सर्वात मोठा दुष्परिणाम म्हणजे किटो फ्लू. या डाएटमुळे तुमच्या रोगप्रतिकार शक्तीवर मोठा ताण पडतो ज्यामुळे तुम्हाला अशक्तपणा आणि ताप येण्याची शक्यता असते. 

बद्धकोष्ठता

बऱ्याचदा जेव्हा तुम्ही एखादे नवे डाएट सुरू करता तेव्हा शरीरावर त्याचा अचानक परिणाम दिसण्यास सुरूवात होते. कारण तुमच्या जीवनशैली आणि आहारानुसार तुमची पचनसंस्था कार्य करत असते. मात्र अचानक झालेला आहारातील बदल पचनसंस्थेला समजण्यास वेळ लागतो. ज्यामुळे तुम्हाला काही दिवस बद्धकोष्ठतेचा त्रास होण्याची शक्यता असू शकते. 

किटो डाएटचे दुष्परिणाम

ADVERTISEMENT

Shutterstock

किटो डाएट बद्दल मनात असणारे काही निवडक प्रश्न (FAQ’s)

1. किटो डाएट हेल्दी डाएट आहे का ?

 

वास्तविक कोणतेही डाएट हेल्दी अथवा चुकीचे असे मुळीच नसते. तुमची शरीरप्रकृती आणि जीवनशैलीनुसार ते ठरत असते. जर तुमच्या जीवनशैलीला आणि शरीरप्रकृतीला किटो डाएट योग्य असेल तर ते नक्कीच हेल्दी आहे. 

2. किटो डाएटचा टाईप 2 मधुमेंहीना काय फायदा होतो ?

 

किटो डाएटमध्ये साखरेचे प्रमाण नगण्य असल्यामुळे मधुमेही आणि टाईप 2 मधुमेहींसाठी ते नक्कीच फायदेशीर आहे. मात्र कोणीही हे डाएट सुरू करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. 

3. किटो डाएटमुळे तुमचे वजन कसे कमी होते ?

 

किटो डाएटमुळे तुमच्या शरीरातील फॅट्स नैसर्गिक पद्धतीने बर्न होतात. ज्यामुळे शरीरात अतिरिक्त फॅट्स निर्माण होत नाहीत आणि तुमचे वजन कमी होण्यास मदत होते. 

ADVERTISEMENT

 

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

अधिक वाचा –

जाणून घ्या झटपट वजन वाढवण्यासाठी काय खावे (Diet For Weight Gain In Marathi)

केटो सोपच्या वापराबाबत माहिती

ADVERTISEMENT

स्टॅमिना वाढवण्यासाठी आपल्या जेवणात समाविष्ट करा ‘हा’ आहार 

परफेक्ट फिगरसाठी करा ‘हा’ परफेक्ट डाएट आणि पाहा तुमच्यातील बदल 

Weight Loss Foods in Hindi

 

23 Mar 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT