शेड्युल सेक्स माहीत आहे का, याचे आहेत असे फायदे

शेड्युल सेक्स माहीत आहे का, याचे आहेत असे फायदे

सेक्स केवळ प्रेम करणाऱ्या जोड्यांना अर्थात कपल्सना (couple) एकत्र ठेवत नाही तर याचे आरोग्याला अनेक फायदेदेखील आहेत. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार सेक्स केल्याने तुम्ही निरोगी राहता. बऱ्याचदा सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात तुम्हाला सेक्स करायलाही वेळ मिळत नाही. सकाळी लवकर उठायचंय किंवा इतर काही कारणाने सेक्स करण्याकडेही दुर्लक्ष केले जाते. याचा परिणाम तुमच्या नात्यावर होतो. पण हल्ली आपल्या व्यग्र आयुष्यातून सेक्स लाईफचा भरपूर आनंद घेण्यासाठी आता बरेच जण सेक्स कॉन्सेप्ट फॉलो करू लागले आहेत. शेड्युल सेक्स हे ऐकायलाही थोडं विचित्र वाटतं आहे ना? पण याचे अनेक फायदे आहेत. शेड्युल सेक्स, तुमच्या व्यग्र लाईफस्टाईलला अधिक स्पाईसी बनवते. जाणून घेऊया शेड्युल सेक्स आपल्या आयुष्यात अधिक रोमांच कसा आणते आणि याचे नक्की फायदे काय आहेत. याचे फायदे जाणून घेतल्यानंतर तुम्हालाही याचं महत्त्व पटेल आणि तुम्हीदेखील तुमच्या व्यस्त आयुष्यातून नक्कीच शेड्युल सेक्ससाठी वेळ काढू शकाल. 

अशी बनवा शेड्युल सेक्सची योजना

Shutterstock

तुम्ही जर लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये (Long Distance Relationship) असाल तर तुम्ही शेड्युल सेक्स हे नक्कीच ऐकलं असेल. सेक्स करण्यासाठी तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर एक अशी वेळ निवडा जेव्हा तुम्ही दोघेही व्यस्त नसाल. पण ही वेळ तुम्ही एकमेकांसाठी राखून ठेवलीच पाहिजे. यावेळी कोणतेही काम अथवा अन्य गोष्ट दोघांपैकी कोणीही करणं योग्य नाही. तुम्ही हा वेळ एकमेकांबरोबर सेक्स करण्यासाठी आणि एकमेकांच्या अधिक जवळ येण्यासाठीच राखून ठेवायला हवा. एकमेकांसाठी वेळ काढणं हा नात्याचा पाया आहे. त्यामुळे अशाप्रकारे योजना करून तुम्ही सेक्स करा. त्यातूनच तुमच्या नात्यात अधिक रोमांच येईल. 

सेक्स करताना सर्वात पहिले फिलिंग जाणवतं ते स्तनांना

शेड्युल सेक्स कॅलेंडरमध्ये लिहा

तुम्ही सेक्सची तारीख आणि वेळ जर शेड्युल करत असाल तर केवळ तोंडी नको ती तारीख आणि वेळ ही तुम्ही तुमच्या कॅलेंडरमध्ये निश्चित करा. म्हणजे अशावेळी कोणतीही महत्त्वाची कामे अथवा मीटिंग तुम्ही न ठेवता सहसा ती वेळ टाळण्याचा प्रयत्न करा. तुम्ही सेक्ससाठी जो वेळ शेड्युल केला आहे तो वेळ सेक्स आणि तुमच्या जोडीदारासाठीच राखीव ठेवा. यावेळी कोणताही कामाचा विचार तुमच्या मनात ठेवू नका. 

‘या’ नुकसानांपासून वाचायचं असेल तर करा प्राचीन नियमानुसार सेक्स

एकमेकांबरोबर दर्जात्मक वेळ घालवा

Shutterstock

टेक्नॉलॉजीच्या  या काळात सगळंच व्हर्च्युअल होऊ लागलं आहे. प्रेमाचे दोन शब्द एकमेकांशी बोलायलाही लोकांजवळ वेळ नाही. पण असं करू नका. पण असं असताना तुम्ही जर शेड्युल सेक्स केले तर तुम्ही एकमेकांना नक्कीच दर्जात्मक वेळ देऊ शकाल. अशावेळी फक्त तुम्ही दोघेच असाल आणि त्यामुळे तुम्ही एकमेकांवर तुम्हाला हवं तसं प्रेम करू शकाल. सेक्स करताना त्यामध्ये अधिक रोमँटिकपणा आणि सरप्राईज आणण्याचाही प्रयत्न करा. खूप दिवसांनी सेक्स करताना आपला जोडीदार आपल्याला अजून हवाहवासा वाटत असतो त्यामुळे अशावेळी सरप्राईज प्लॅन करण्यात अधिक मजा येते. शेड्युल सेक्समध्ये तुम्ही अधिक चांगले सरप्राईज प्लॅन करू शकता. 

सेक्स करण्याचे नक्की फायदे काय

सेक्सची वेळ असते फिक्स

सेक्स शेड्युलचा सर्वात मोठा फायदा हा आहे की,  तुम्ही सेक्सकडे दुर्लक्ष करू शकत नाही. कारण तुम्हाला माहीत असतं सेक्स करायचं आहे. त्यामुळे तुमच्यावर कोणत्याही प्रकारे कामाचा ताण नसतो.  सेक्स करायचं हे माहीत असल्याने तुम्ही वेगवेगळ्या पोझिशन्सचा अधिक विचार करून एकमेकांना कसे शारीरिक सुख अधिक द्यायचे याचा योग्य विचार करू शकता. त्याशिवाय तुम्हाला तयारीसाठीही खूप वेळ मिळतो. त्यामुळे तुम्हाला तुमची सेक्स लाईफ अधिक रोमांचित आणि स्पाईसी होऊ शकते.  

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.