चेहऱ्यावर वाफ घेण्याचे हे आहेत अफलातून फायदे (Benefits Of Steaming Face In Marathi)

चेहऱ्यावर वाफ घेण्याचे हे आहेत अफलातून फायदे (Benefits Of Steaming Face In Marathi)

त्वचा सुंदर करण्यासाठी अनेक सौंदर्योपचार केले जातात. ज्यामध्ये चेहऱ्याची त्वचा स्वच्छ करणं, चेहऱ्यावर वाफ घेणं, चेहरा क्रीमने मॉश्चराईझ करणं, फेसपॅक लावणं अशा अनेक गोष्टींचा वापर केला जातो. या ब्युटी ट्रिटमेंटमधील चेहऱ्यावर वाफ घेण्याच्या प्रक्रियेचे देखील अनेक फायदे आहेत. चेहऱ्यावर वाफ घेतल्यामुळे तुमच्या त्वचेची रोमछिद्रे मोकळी होतात. आपल्या चेहऱ्यावर अनेक रोमछिद्रे असतात. धुळ, माती, प्रदूषण, मेकअप यामुळे हे पोअर्स ब्लॉक होतात. मात्र चेहऱ्यावर गरम पाण्याने वाफ घेतल्यामुळे हे पोअर्स मोकळे होतात आणि त्वचा मुळापासून स्वच्छ होते. यासाठीच ब्युटी ट्रिटमेंट करताना चेहऱ्यावर वाफ देण्याची पद्धत आहे. अगदी प्राचीन काळापासून या ब्युटी ट्रिटमेंटचा वापर केला जात आहे. यासाठीच जाणून घ्या चेहऱ्यावर वाफ घेण्याचे फायदे (benefits of steaming face) नेमके काय आहेत. 

Table of Contents

  त्वचा मुळापासून स्वच्छ होते

  चेहऱ्यावर गरम पाण्याची वाफ घेतल्यामुळे त्वचेवरील पोअर्स ओपन होतात. निरोगी त्वचेसाठी त्वचेखालील नैसर्गिक तेलांची (Sebum) ची निर्मिती होणं गरजेचं असतं. मात्र जर तुमच्या त्वचेची रोमछिद्रे धुळ, माती, प्रदूषण अथवा अती मेकअपमुळे बंद झाली असतील तर अशा त्वचेमध्ये नैसर्गिक तेलाची निर्मिती करण्यात अडचणी येतात. त्वचेची रोमछिद्रे बंद झाल्यामुळे त्वचेला पुरेसे ऑक्सिजनदेखील मिळत नाही. मात्र चेहऱ्यावर वाफ घेतल्यामुळे ही रोमछिद्रे मोकळी होतात आणि त्वचेमध्ये Sebumच्या निर्मितीतील अडथळा दूर होतो.

  Instagram

  चेहऱ्यावरील ब्लॅकडेडस् काढणं सोपे जाते

  जेव्हा तुम्ही त्वचेवर वाफ घेता तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरील रोमछिद्रे मोकळी होतात. ज्यामुळे त्वचेच्या रोमछिद्रांमध्ये अडकलेली धुळ, माती निघून जाण्यास मदत होते. सहाजिकच यामुळे तुमची त्वचा अगदी मुळापासून स्वच्छ होते. त्वचेच्या रोमछिद्रांमध्ये निर्माण झालेल्या अडथळ्यामुळे चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स निर्माण होत असतात. वाफ घेतल्यामुळे त्वचा मऊ होते ज्यामुळे ते काढणं सोपं जातं. चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स काढण्यासाठी चेहऱ्यावर वाफ घेणं हा एक सोपा मार्ग नक्कीच आहे. यासाठीच चेहऱ्यावर वाफ घेण्याचे फायदे नक्कीच वाचा

  त्वचा निर्जंतूक होते

  चेहऱ्यावर वाफ घेतल्यामुळे मोकळ्या झालेल्या रोमछिद्रांमुळे तुमच्या त्वचेवरील डेडस्कीन कमी होण्यास मदत होते. ज्यामुळे त्वचेखालील बॅक्टेरिया कमी होतात. त्वचेमधील अशुद्धता कमी झाल्यामुळे एक्नेची समस्या कमी होण्यास मदत होते. 

  त्वचा नितळ होते

  चेहऱ्यावर वाफ घेताना उष्णतेमुळे तुमच्या चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणावर घामाची निर्मिती होते. ज्याद्वारे त्वचेतील संपूर्ण अशुद्धता बाहेर टाकली जाते. चेहऱ्यावरील धुळ, मेकअपचे घटक, डेडस्कीन, अतिरिक्त तेल कमी झाल्यामुळे त्वचा नितळ आणि तजेलदार दिसू लागते. चेहऱ्यावर वाफ घेण्याचे फायदे जाणून घेणं यासाठी खूप महत्त्वाचं आहे.

  त्वचेचं रक्ताभिसरण सुधारते

  चेहऱ्यावर वाफ घेतल्यामुळे चेहऱ्याच्या त्वचेखालील पेशींचे रक्ताभिसरण योग्य पद्धतीने होते. ज्यामुळे त्वचेला ऑक्सिजनचा योग्य पुरवठा होतो. ज्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक आणि इंन्स्टंट ग्लो दिसायला सुरूवात होते. 

  Instagram

  सौंदर्यप्रसाधनांचा चांगला परिणाम होतो

  चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही अनेक स्कीन केअर प्रोडक्टचा वापर करत असता. मात्र जर तुमच्या चेहऱ्याचे पोअर्स बंद असतील तर त्याचा कोणताच परिणाम होत नाही. म्हणूनच ब्युटी ट्रिटमेंट देताना चेहऱ्यावर वाफ दिली जाते. ज्यामुळे तुम्ही वापरत असलेली सौंदर्य प्रसाधने त्वचेत व्यवस्थित मुरतात. यासाठीच चेहऱ्यावर वाफ घेण्याचे फायदे अवश्य वाचा. 

  डेडस्कीन निघून जाते

  जर त्वचेवर डेडस्कीनचा थर जमा होऊ लागला तर तुमची त्वचा निस्तेज आणि थकलेली दिसते. ज्यामुळे तुम्ही तुमच्या वयापेक्षा अधिक वयस्कर दिसता.  चेहऱ्यावर वाफ घेण्याचा फायदा हा आहे की यामुळे तुमच्या त्वचेवरील डेडस्कीन निघून जाण्यास मदत होते आणि तुम्ही तरूण दिसू लागता. 

  Instagram

  पिंपल्स पासून तुमचे संरक्षण होते

  आजकाल अनेकींना सतत पिंपल्स येण्याचा त्रास होत असतो. चेहऱ्यावर पिंपल्स येण्यामागे अनेक कारणे असू शकतात. मात्र याचे महत्त्वाचे कारण चेहऱ्यावरील तेलकटपणा असू शकतो. मात्र चेहऱ्यावर वाफ घेण्याचा फायदा असा की तुमचे पिंपल्सपासून संरक्षण होते. 

  त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते

  चेहऱ्यावर जर ओलावा नसेल तर त्वचा लवकर निस्तेज आणि सुरकुतलेली दिसते. ज्यामुळे चेहऱ्यावर एजिंगच्या खुणा दिसण्यास सुरूवात होते. मात्र जर तुम्ही चेहऱ्यावर वाफ घेतली तर तुमच्या  त्वचेला पुरेसा ओलावा मिळतो. चेहऱ्या नैसर्गिक पद्धतीने मॉश्चराईझ ठेवण्यासाठी चेहऱ्यावर वाफ घेणे फायद्याचे ठरते. 

  मेकअप काढण्यासाठी उपयोगी

  आजकाल ऑफिस आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये उठून दिसण्यासाठी थोडाफार मेकअप करणं ही गोष्ट गरजेची झालेली आहे. ज्यामुळे कॉम्पॅक्ट, लिपस्टिक, काजळ, आयलायनरचा वापर करणं नित्याचंच झालेलं आहे. मात्र तुम्ही कितीही चांगल्या प्रकारचं मेकअप रिमूव्हर वापरलं तरी त्वचेवरील मेकअप पूर्णपणे नक्कीच निघून जात नाही. मेकअपचे काही घटक तुमच्या त्वचेत खोलवर मुरतात. मेकअपचे हे घटक काढून टाकण्यासाठी चेहऱ्यावर वाफ घेण्याचा फायदा नक्कीच होऊ शकतो. 

  सैल पडलेली त्वचा घट्ट होते

  चेहऱ्याच्या त्वचेवरील रक्ताभिसरण सुधारण्यासाठी त्वचेतील collagen आणि elastin च्या निर्मितीची फार गरज असते. चेहऱ्यावर वाफ घेण्यामुळे या दोन घटकांच्या निर्मितीला प्रोत्साहन मिळते. ज्यामुळे तुमची सैल पडलेली त्वचा पुन्हा घट्ट होण्यास मदत होऊ शकते. 

  त्वचेला पुरेसा आराम मिळतो

  दिवसभराची दगदग, कामाची चिंता याचा परिणाम तुमच्या त्वचेवर आणि परिणामी चेहऱ्यावर दिसू लागतो. मात्र जेव्हा तुम्ही चेहऱ्यावर वाफ घेता तेव्हा तुमची त्वचा रिलॅक्स होते. चेहऱ्यावर वाफ घेताना त्यामध्ये अरोमा असलेली इसेन्शिअल ऑईल्स मिसळल्यामुळे तुमचा थकवा दूर होण्यास मदत होऊ शकते. 

  अॅलर्जीपासून रक्षण होते

  बऱ्याचदा  सर्दी, खोकला अथवा घशाच्या इनफेक्शवर तज्ञ्ज तुम्हाला चेहऱ्यावर वाफ घेण्याचा सल्ला देतात ज्यामुळे तुम्हाला नक्कीच आराम मिळतो आणि अॅलर्जीपासून तुमचे रक्षण होते. 

  सायनसपासून आराम मिळतो

  सायनसचा त्रास असेल तर तुमचे वारंवार डोकं दुखण्याची शक्यता असते. मात्र अचानक एखाद्या मिटींगला जाण्याआधी अथवा महत्त्वाच्या कामाच्या वेळी तुम्हाला सायनसचा त्रास होऊ लागला तर तुम्ही चेहऱ्यावर वाफ घेऊन आराम मिळवू शकता. मात्र लक्षात ठेवा लवकरात लवकर तुमच्या सायनसच्या समस्येवर उपचार करा ज्यामुळे तुम्हाला कायमस्वरूपी या त्रासातून स्वतःला  वाचवता येईल. 

  चेहऱ्यावर वाफ घेण्याचे फायदे याबाबत मनात असलेले निवडक प्रश्न - FAQs

  1. चेहऱ्यावर वाफ घेणे त्वचेसाठी योग्य आहे का ?
  चेहऱ्यावर वाफ घेतल्यामुळे तुमची त्वचा  स्वच्छ होते, त्वचेखालील रक्ताभिसरण सुधारते शिवाय त्वचेवरील ब्लॅकहेडस काढणे सोपे जाते. त्यामुळे चेहऱ्यावर वाफ घेणे नक्कीच फायद्याचे आहे. मात्र अती प्रमाणात वाफ नक्कीच घेऊ नका. कारण त्याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात.

  2. चेहऱ्यावर वाफ किती मिनीटे घ्यावी ?
  कोणतीही गोष्ट नेहमीच प्रमाणात करणे गरजेचं आहे तरच तुम्हाला त्याचे चांगले परिणाम मिळू शकतात. चांगल्या परिणामांसाठी चेहऱ्यावर कमीत कमी 10 मिनीटे वाफ घ्यावी. शिवाय वाफ जास्त जवळून घेऊ नये नाहीतर तुमची त्वचा पोळण्याची शक्यता आहे. 

  3. कोरड्या त्वचेवर वाफ घेणं योग्य आहे का ?
  जर तुमची त्वचा अती प्रमाणात कोरडी असेल तर वाफ घेणे टाळलेलेच बर कारण त्यामुळे तुमच्या त्वचेमधील नैसर्गिक तेल कमी होऊ शकतं. मात्र तुम्ही तुमच्या ब्युटी तज्ञ्जांचा सल्ला घेऊन वाफ घेण्याचा निर्णय घेऊ शकता. 

  फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम

  हे ही वाचा -

  2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला

  अधिक वाचा -

  गरजेपेक्षा जास्त वेळा फेशियल केल्याचे दुष्परिणाम

  चेहरा कायम चमकदार राहण्यासाठी करा 'योग्य' व्यायाम

  Pimple-free चेहरा मिळवण्यासाठी करा घरगुती उपचार