ADVERTISEMENT
home / आरोग्य
सुरक्षित राहायचं असेल तर घरातील ‘या’ गोष्टी त्वरीत करा सॅनिटाईझ

सुरक्षित राहायचं असेल तर घरातील ‘या’ गोष्टी त्वरीत करा सॅनिटाईझ

कोरोना व्हायरसच्या संक्रमणाच्या भितीने जगभरात भितीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी प्रत्येकाला घरात राहणं बंधनकारक आहे. मात्र घरात राहताना देखील काही गोष्टींची काळजी घेणं फारच गरजेचं आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाकडून सतत हात स्वच्छ धुण्याचा आणि सॅनिटायझरचा वापर करण्याच्या सूचना केल्या जात आहेत. मात्र घरात देखील अशा अनेक गोष्टीं असतात ज्या निर्जंतूक करणं फार गरजेचं आहे. या काळात सर्वांना वर्क फ्रॉम होम करावं लागत असल्यामुळे ऑफिसच्या कामासाठी सतत लॅपटॉप, मोबाईलचा वापर केला जात आहे. त्यासोबतच विरंगुळ्याच्या साधनांसाठी घरातील टेलिव्हिजन आणि इतर मनोरंजनाच्या गोष्टी वारंवार हाताळल्या जात आहेत. म्हणूनच सुरक्षित राहण्यासाठी या सर्व वस्तू योग्य पद्धतीने निर्जंतूक करणंदेखील तितकंच गरजेचं आहे. यासाठी तुमच्या घरातील या गोष्टी दररोज निर्जंतूक करण्यास मुळीच विसरू नका.

Shutterstock

मोबाईल फोन –

तुमच्या मोबाईलला तुम्ही दिवसभरात हजारवेळा स्पर्श करत असता. घराबाहेर जाणं बंद झालं असलं तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वजण एकमेकांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे क्षणाक्षणाला जगात नेमकं काय काय घडत आहे हे सोशल मीडियावरून व्हायरल होत आहे. शिवाय नातेवाईक, जवळची मित्रमंडळी यांच्या संपर्कात राहण्याचा मोबाईल फोन हा एकमेव मार्ग सध्या उरला आहे. मात्र त्यामुळेच मोबाईल फोन दररोज स्वच्छ करणं गरजेचं आहे. बाजारातून भाजी अथवा दूध आणल्यानंतर, सकाळी वापरण्याआधी अथवा रात्री झोपण्यापूर्वी  तुमचा मोबाईल निर्जंतूक करण्यास मुळीच विसरू नका. कारण एका संशोधनानुसार टॉयलेटच्या सीटपेक्षा जास्त जीवजंतू तुमच्या मोबाईल फोनवर असू शकतात. यासाठी सर्वात आधी तुमचे हात स्वच्छ करा. त्यानंतर अॅंटिबॅक्टेरिअल फायक्रो फायबर कापडाने आणि स्प्रे क्लिंझरच्या मदतीने तुमचा मोबाईल स्वच्छ करा. 

ADVERTISEMENT

लॅपटॉप आणि कंप्युटर की- बोर्ड –

वर्क फ्रॉम होम करत असल्यामुळे ऑफिसचे काम करण्यासाठी तुम्ही  दिवसभर तुमचा लॅपटॉप वापरता. मात्र या काळात त्याची दररोज स्वच्छता करणं फार गरजेचं आहे. लॅपटॉप, कंप्युटरच्या की- बोर्डला सतत धुळ आणि प्रदूषणाचा संपर्क होत असतो. यासाठी ऑफिसचे काम  झाल्यावर तुमचा लॅपटॉप बंद करा आणि त्याला सॅनिटाईझ करा. काळजीपूर्वक स्वच्छ कापड अथवा छोट्या ब्रशने आधी की-बोर्ड स्वच्छ करा. त्यानंतर अॅटिबॅक्टेरिअल लिक्विड स्प्रे आणि कापडाने तो पुसून घ्या. मात्र लक्षात ठेवा स्वच्छता करण्यापूर्वी तुम्ही या वस्तूंचा वीजेसोबत असलेला संपर्क बंद करणं गरजेचं आहे. 

Shutterstock

दरवाज्याच्याचे लॉक्स आणि वीजेची बटणे –

घरात असल्यामुळे एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाण्यासाठी, टॉयलेटचा वापर करण्यासाठी तुम्ही सतत तुमच्या घरातील खोली आणि टॉयलेटचे  दरवाजे उघडबंद करत असता. हे करताना अनेकदा तुम्हाला तुमच्या घरातील खोल्यांचे दरवाजे आणि त्यांच्या कडीकुलूपांना हाताळावं लागतं. वीजेचा वापर करण्यासाठी अनेकदा वीजेच्या बटणांना स्पर्श करावा लागतो. या सर्व गोष्टी तुम्ही आता वारंवार वापरत असल्यामुळे त्यांची नीट स्वच्छता करणे गरजेचं आहे. यासाठी दररोज काळजीपूर्वक या गोष्टी स्वच्छ करा. 

ADVERTISEMENT

Shutterstock

किचन आणि किचनमधील साहित्य –

कोरोना व्हायरसपासून सुरक्षित राहण्यासाठी सर्वत्र  घरकामांसाठी येणाऱ्या बाई आणि कूक यांना सुट्टी देण्यात आलेली आहे. सहाजिकच प्रत्येकाला आता स्वतःच स्वयंपाक घरात काम करावं लागतं आहे. कुटुंबातील सर्व माणसं घरात असल्यामुळे नाश्ता, चहा, स्वयंपाकासाठी वारंवार स्वयंपाकघराचा वापर होत आहे.  स्वयंपाक करण्यासोबत स्वयंपाकघराची स्वच्छता हा एक मोठा गहन प्रश्न निर्माण झाला आहे. कारण जर तुमचं स्वयंपाकघर स्वच्छ असेल तरच तुमचे आरोग्य चांगलं राहू शकतं. यासाठी कुटुंबातील सर्वांनी मिळून स्वयंपाक आणि स्वयंपाकघरातील स्वच्छता ही कामे वाटून घ्या. 

घरातील ब्लॅकेट्स आणि रजई

घरात राहणं म्हणजे मस्तपैकी लोळत पडणं ही अनेकांच्या आवडीची गोष्ट असते. मात्र त्यामुळे तुमच्या बेडवरील बेटशीट, अंगावरील पांघरूणे, ब्लॅंकेट्स, रझई यांचा वापर आता दिवसभर केला जात  आहे. ज्यामुळे त्या एक दिवस आड अथवा दररोज धुणे गरजेचं आहे. कारण सतत वापरल्यामुळे, घामामुळे या गोष्टी अस्वच्छ होत असतात. अशा अस्वच्छ वस्तूंवर जीवजंतूंचे चांगले पोषण होऊ शकते. यासाठीच या गोष्टी वेळच्या वेळीच स्वच्छ करा. 

ADVERTISEMENT

Shutterstock

राईंटिंग टेबल –

घरातून काम करणं हा या काळात एक खूप मोठा टास्क झाला आहे. कारण या लॉकडाऊनमुळे काही जणांची ऑफिसची कामे आणि घरातील कामे दोन्ही वाढली आहेत.  सतत ऑफिसचे काम करण्यासाठी राईटिंग टेबलचा वापर केला जात आहे. ऑफिसमध्ये तुमचे डेस्क सफाई कामगार सतत स्वच्छ करत असतात. मात्र आता ते काम तुमचे तुम्हालाच करायचे आहे. तेव्हा सकाळी कामाला सुरूवात करण्यापूर्वी तुमचे राईटिंग टेबल नीट स्वच्छ करून घ्या. 

टीव्ही रिमोट आणि घरातील इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे रिमोट –

सर्वांनी घरात राहायचे म्हणजे सध्याचे विरंगुळ्याचे एकमेव साधन म्हणजे टेलिव्हिजन आहे.  तुम्ही जरी नेटफ्लिक्स आणि इतर गोष्टींसाठी तुमच्या मोबाईलचाच वापर करत असला तरी घरातील वृद्ध आणि लहान मंडळी अजूनही टिव्ही पाहण्यातच खूश असतात. त्यामुळे सतत टिव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तूंचे रिमोट वापरले जात आहेत. तेव्हा स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी दररोज ते स्वच्छ आणि निर्जंतूक करण्यास मुळीच टाळाटाळ करू नका. 

ADVERTISEMENT

 

 

Shutterstock

ADVERTISEMENT

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

हे ही वाचा –

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला

अधिक वाचा –

ADVERTISEMENT

जाणून घ्या किचन साफसफाईची योग्य पद्धत

अस्वच्छ किचन सिंक स्वच्छ करायचे आहे.. मग सोप्या टीप्स येतील कामी

बेकिंग सोड्याचा उपयोग करा सफाईसाठी, महागड्या उत्पादनांपेक्षा उत्तम सफाई

 

ADVERTISEMENT
26 Mar 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT