चैत्र नवरात्रीचे महत्त्व आणि पूजा विधी, जाणून घ्या घटस्थापनेचा शुभमुहूर्त

चैत्र नवरात्रीचे महत्त्व आणि पूजा विधी, जाणून घ्या घटस्थापनेचा शुभमुहूर्त

भारतामध्ये नवरात्रीचा उत्सव नेहमीच मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. नवरात्री या वर्षातून चार वेळा येतात. चैत्र, आषाढ, अश्विन आणि माघ. सध्या कोरोना व्हायरसमुळे गर्दी टाळायची आहे. पण तरीही चैत्र महिन्यात येणारी नवरात्री ही घराघरात केली जाते.  यामध्ये पूजाअर्चेला जास्त महत्त्व देण्यात येते. चैत्र आणि अश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्रीला जास्त प्रमाणात पूजाअर्जा केली जाते आणि या दोन्ही नवरात्रीला महानवरात्र मानण्यात येते. गुढीपाडव्यानंतर नवरात्री सुरू होते. यावर्षी ही चैत्र नवरात्री 25  मार्चपासून चालू होत आहे. पण बऱ्याच जणांना याचा मुहूर्त आणि याच्या पूजेच्या विधीबाबत माहिती नसते. याबद्दलच आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. यावर्षी घटस्थापना करण्याचा नक्की मुहूर्त कोणता आहे हे आपण जाणून घेऊया. त्याचप्रमाणे घटस्थापनेचे महत्त्व आणि याची पूजा विधीही आपण जाणून घेऊया.

घटस्थापनेचे महत्त्व

नवरात्रीच्या सुरूवातीलाच घटस्थापना करण्यात येते. असं म्हटलं जातं की, घटस्थापना करण्याने कुटुंबामध्ये सकारात्मकता राहते आणि जीवनामध्ये आनंद येतो. घटस्थापनेनंतर नऊ दिवस अखंड दिवा देवासमोर लावण्यात  येतो. या काळात या दिव्याची ज्योत घरात सतत तेवत ठेवली जाते. ही घटस्थापना करताना अन्नधान्य आणि कडधान्याचा वापरही केला जातो. याचा संबंध शेतकऱ्यांच्या जीवनाशीही आहे. चैत्र नवरात्रीपासून शेतात धान्य पेरली जातात आणि मग लवकरच येणारा पावसाळा शेतकऱ्यांना सुखाचा काळ दाखवतो. हेच घटस्थापनेचे खरे महत्त्व आहे. सर्व काही सकारात्मक होण्यासाठी ही घटस्थापना करण्यात येते.

2020 चा घटस्थापनेचा मुहूर्त 

दिवस - 25 मार्च, बुधवार

शुभमुहूर्त - सकाळी 6 वाजून 19 मिनिट्सपासून ते सकाळी 7 वाजून 17 मिनिट्सपर्यंत 

नवरात्रीत करा आरोग्यदायी 'हादग्याची भाजी'

घटस्थापनेची पूजा विधी

View this post on Instagram

#chaitragauri puja

A post shared by Suprita SJ (@suprita.1986) on

घटस्थापनेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान आणि इत्यादी प्रातःर्विधी आवरून घ्यावे. त्यानंतर स्वच्छ कपडे घालून घराची साफसफाई करावी. देवघराची साफसफाई करून त्यावर गंगेचे पाणी अथवा गोमूत्र शिंपडावे. एका भांड्यात माती घाला आणि त्यामध्ये गहू, ज्वारी, तांदूळ असे धान्य तुम्ही घाला. देवघरात देवीची प्रतिमा स्थापन करून त्याची पूजा करा. तसेच या धान्याची बिजांची पूजाही नऊ दिवस करायची असते. कलशाची स्थापना करून त्यावर स्वस्तिक काढा आणि या कलशामध्ये पाणी, अक्षता, रोली, सुपारी, रूपया ठेवा आणि हा कलश एका लाल कपड्याने झाका. नऊ दिवस या सगळ्याची पूजा केली जाते. जे धान्य पहिल्या दिवशी आपण मातीत लावतो ते नऊ दिवसात अंकुरते आणि त्याचीही नऊ दिवस पूजा केली जाते. त्यानंतर ते धान्य शेतात लावले जाते. रोज कांदा आणि लसूण न घालता देवाला नैवेद्य दाखवण्यात येतो. 

नवरात्रीच्या उपवासाचे 9 फायदे घ्या जाणून, शरीर राहतं निरोगी

चैत्र नवरात्रीचे महत्त्व

View this post on Instagram

Sometimes all you need is a strong will to accomplish challenging tasks. One such task was putting up this meal on a very short notice. Like always I had almost forgotten that it's Akshay Tritiya , my moms birthday (based on birth star /janamtithi) and my last chance to celebrate Chaitra Gauri. As soon as I was reminded about these important events by my MIL I decided to cook a few of my favourite things and call my friends over( so grateful to have my gang of girls who always agree to join me , even its on short notice) So glad I could celebrate all these important occasions by cooking and feasting on a few summer favourite recipes. On my plate : ⚜ Karichi Amti (Raw mango curry) ⚜ Kheer (vermicelli pudding ) ⚜ Bhindi chi bhaji (okra stir fry) ⚜ Batataychi bhaji (potato stir fry) ⚜ Karchi vatli daal (ground raw mango and split Bengal gram ) ⚜ Gajrachi koshimbir ( carrot salad) ⚜ Kairicha takku ( raw mango pickle) ⚜ Poli ⚜ Bhaat Ani goda Varan ( rice and lentils) Also a very happy Akshaya Tritiya to all those who are celebrating it !! Which is your most favourite recipe from this platter ? Preeti @myukkitchen so glad to put up and contribute one more #marathithali to the series 💕 . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . #homecooking#chaitragauri#akshyatritiya#plantbased#vegan#vegetarian#glutenfree#blancedmeal#humpday#thali#traditionalfood#indianfood#desifood#freshfood#foodblogfeed#takku#eeeeeats#eattheworld#trellingfood#huffposttaste#f52grams#gharkakhana#foodandwine#foodtalkindia#nutrition#plantpower#foodgawker#healthychoices#goodfoodindia# @ndtv_food @walkwithindia @food_network_india @foodnetwork @bbcgoodfoodshow @savfooddiary @vegandaily1 @veggiedise @fbci_official @marathi_food_lover @maharashtra_ig @buzzfeedindia @buzzfeedtasty

A post shared by Niketa |nikfoodamour| (@nikfoodamour) on

प्रचलित मान्यतेनुसार चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गा मातेचा जन्म झाला होता आणि दुर्गेच्या सांगण्यावरून ब्रम्हदेवाने या सृष्टीचे निर्माण केले होते. त्यामुळे चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून हिंदू नववर्ष सुरू होते. तसेच भगवान विष्णू यांचा आठवा अवतार रामाचा जन्मही याच नवरात्रीच्या नवमीला झाला होता. त्यामुळे चैत्र नवरात्रीचे महत्त्व अधिक मानले जाते. तसेच या काळात आलेली अनेक संक्रमण दूर होतात असेही मानले जाते. त्यामुळे या काळाला खूपच अधिक महत्त्व देण्यात आले आहे. 

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.