मी इतकं सगळं करते पण तरीसुद्धा माझं वजन का वाढतयं? असा प्रश्न कायमच अनेकांना पडतो. तुम्ही खात असलेले पदार्थ, तुमचे लाईफस्टाईल या सगळ्यावर वजन वाढणे आणि कमी होणे अवलंबून असते. त्यातच अनेक जण वजन वाढवायचे नसेल तर काही गोष्टी खायला नको याची एक भली मोठी यादीच आपल्याला देऊन टाकतात. यामध्ये अनेकांच्या आवडीचा भात, चीझ, बटाटा आणि पाव आणि त्यापासून बनणारे पदार्थ असतात. अनेकदा वजन वाढीसाठी बेकरी फूड कारणीभूत असतात असे सांगितले जाते. बेकरीफूडमुळे तुमचे वजन वाढते की नाही? हे तुम्हाला माहीत नसेल तर आज आम्ही तुम्हाला बेकरी फूडचा नेमका तुमच्या वजनावर काय परिणाम होतो ते सांगणार आहोत.
आता सर्वसाधारणपणे बेकरीफूड म्हटले की त्यामध्ये पाव, ब्रेड, खारी, बिस्कीट, टोस्ट, पफ अशा काही गोष्टींचा समावेश असतो. याव्यतिरिक्तही बेकरीमध्ये काही खास पदार्थ बनवले जातात. हे सगळे पदार्थ मैद्यापासून तयार होतात आणि ते फुलवण्यासाठी त्यामध्ये सोडा, यीस्ट यासारख्या गोष्टी घातल्या जातात.
आता आज आपण ज्या विषयाची अधिक माहिती घेणार आहोत तो म्हणजे वजन वाढीचा विषय त्याविषयी जाणून घेऊया
आता काहींना बेकरी फूड खायला फारच आवडते. म्हणजे पाव किंवा इतर पदार्थ ते आवडीने खातात. जर तुम्हाला पावावाचून जमत नसेल तर ते खाण्यास काहीच हरकत नाही. पण पाव खाताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे तुम्ही कोणताही ब्रेड खा. पण दोन स्लाईसवर एकाचवेळी ब्रेड खाऊ नका. पफ किंवा बर्गर असे पदार्थ तुम्हाला खायचे असतील तर ते आठवड्यातून ते एकदा किंवा दोनदा खा. वजन नियंत्रणात ठेवायचे असतील तर तुम्हाला काही गोष्टींचे भान ठेवायला हवे.
आता वरील गोष्टींवरुन तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की, बेकरी फूड हे वाईट नाही. पण तुम्ही तुमच्या खाण्यावर थोडे निर्बंध ठेवायला हवेत. म्हणजे तुमचे वजन नियंत्रणात राहील.
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.