डबलचीन घालवण्यासाठी व्यायाम नाही तर वापरा या ट्रिक्स

डबलचीन घालवण्यासाठी व्यायाम नाही तर वापरा या ट्रिक्स

डबलचीन घालवण्यासाठी व्यायाम किती महत्वाचा आहे हे तुम्हाला आम्ही आधीही सांगितले आहे. घरी बसल्या बसल्या तुम्ही अगदी सहज हे व्यायामप्रकार करुन तुमची डबलचीन कमी करुन तुमची जॉ लाईन परफेक्ट करु शकता. पण आता काहींना व्यायामाचाही फार कंटाळा असतो. अशा आळशी लोकांसाठी आम्ही डबलचीन घालवण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स शोधून काढल्या आहेत. या ट्रिक्स तुम्हाला गुगलवरही सहज सापडतील. या ट्रिक्स करुन पाहिल्यानंतर त्याचा फरक पडतो हे आम्हाला जाणवले म्हणूनच आम्ही या ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर करत आहोत. करुया सुरुवात

चेहऱ्यावरील फॅट कमी करतील हे सोपे व्यायामप्रकार

टॅप ऑन अंडर चीन

Instagram

आता सगळ्यात आधी आपण सगळयात सोपी आणि इंटरेस्टिंग ट्रिक्स पाहुया ती म्हणजे टॅप ऑन अंडर चीन. एखादा टर्कीश टॉवेल घेऊन तुम्हाला त्याची उभी घडी घालून घ्यायची आहे. टॉवेलच्या दोन्ही बाजू हाताने पकडून तुमच्या हनुवटी खाली आलेल्या डबलचीनवर ते हळुहळू मारा. एक प्रकारे तुम्हाला तुमच्या डबलचीनवर टॅप करायचे आहे. साधारण 30वेळा तरी तुम्ही असे टॅप करा. साधारण महिनाभर तुम्ही असे करा. तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल.

हॉट टॉवेल ऑन चीन

GIPHY

तसं तर अनेक टेक्निक्समध्ये हॉट टॉवेल टेक्निकचा वापर केला जातो. तुमची डबलचीन घालवण्यासाठीही हॉट टॉवेलचा वापर तुम्हाला करता येईल. एक स्वच्छ चांगला टर्किश टॉवेल घेऊन त्याची घडी करा. गरम पाण्यात बुडवून अगदी सावकाश आणि काळजीपूर्वक टॉवेल पिळून घ्या.झोपून तुम्ही हा टॉवेल तुमच्या हनुवटीखाली पकडून ठेवा. यामुळे तुमच्या गालावरील आणि हनुवटीखालील अतिरिक्त फॅट कमी करण्यास मदत होईल. रोज रात्री झोपताना तुम्ही ही ट्रिक करुन पाहा.

55 मिनिटे खाण्याचा डॉ. दीक्षितांचा डाएट प्लॅन आहे तरी काय?

चघळा च्युईंगम

GIPHY

तुमची जॉ लाईन परफेक्ट दिसण्यासाठी आणखी एक सोपा पर्याय आहे तो म्हणजे च्युंगम चघळण्याचा. आता आम्ही तुम्हाला खरे च्युईंगम चघळा अस अजिबात सांगत नाही. तुम्ही च्युईंगम खाल्ल्यासारखे केले तरी चालेल. असे केल्यामुळे तुमच्या जबड्यांची हालचाल होते. उतरलेले गाल आणि हनुवटीखाली त्वचा घट्ट करण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही जेव्हा वेळ मिळेल तेव्हा असे करा.

दूधाचा मसाज

Instagram

थोडं काही वेगळं तुम्हाला करायचे असेल तर तुम्ही दुधाचा मसाज करु शकता. कच्चं दूधं असेल तर फारच उत्तम. तुम्ही दूध घेऊन तुमच्या मानेला आणि हनुवटीला लावून मसाज करा. दूधामुळे त्वचेची इलास्टिसिटी वाढते. दूधामधील अँटी -एजिंग गुणधर्म तुमची त्वचा सैल पडू देत नाही. अर्थात डबलचीन म्हणजे तुमची त्वचा सैल झालेली असते. ती सॅग होण्यापासून वाचवण्याचे कामच दूध करते. 

आता तुम्हाला डबलचीनचा त्रास असेल तर तुम्ही हे काही प्रयोग करुन पाहा तुम्हाला तुमच्या डबलचीनमध्ये झालेला फरक जाणवेल. त्यामुळे साधारण एक महिना तरी तुम्ही हा प्रयोग करुन पाहा. तुम्हाला नक्कीच फरक झालेला जाणवेल.

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.