आता जेल पॉलिश काढण्यासाठी सलोनला जाण्याची नाही गरज

आता जेल पॉलिश काढण्यासाठी सलोनला जाण्याची नाही गरज

हल्ली नेलपेंटमध्ये जेलपॉलिशचा ट्रेंड आहे. जास्त काळ टिकते म्हणून अनेक जण अगदी आवर्जून जेल पॉलिश लावतात. पण ही जेल पॉलिश काढणे म्हणजे आणखी पैसे घालवणे. जर तुम्हाला जेलपॉलिश काढण्यासाठी घालावे लागणारे पैसे वाचवायचे असतील तर आज आम्ही तुम्हाला एक सोपी ट्रिक दाखवणार आहोत. जेणेकरुन तुमच्या नखांवरील जेल पॉलिश तुम्ही अगदी सहज काढू शकता आणि पैसे वाचवू शकता. मग करुया सुरुवात

केसांसाठी केरेटीन (keratin) करण्याच्या विचार करताय.. तर मग वाचा

जेल पॉलिश काढण्याची योग्य वेळ

shutterstock

पायांच्या नखांच्या तुलनेत हाताची नखं पटकन वाढतात. त्यामुळे जेलपॉलिश लावल्यानंतर अगदी दोन आठवडयांच्या आत तुमची जेल पॉलिश पुढे सरकते. तुमच्या नखांच्या मध्यापर्यंत जेल पॉलिश आली असेल तर तुम्हाला जेलपॉलिश काढण्याची गरज आहे, असे समजावे. तुम्ही जेल पॉलिश लावले असेल तर तुम्ही तुमचे नख तपासून घ्या. तुमच्या नखांची वाढ झाली असेल तर तुम्ही जेल पॉलिश काढू शकता. 

जेल पॉलिश काढण्यासाठी लागणारे साहित्य

shutterstock

 • अॅसिटोन: चांगल्या प्रतीचे अॅसिटोन घेतले तर तुम्हाला त्याचा फरक लवकर जाणवेल.
 • कापूस: ब्युटी शॉपमध्ये तुम्हाला वेगळे कापूस मिळतात. त्याचा वापर तुम्ही यासाठी करु शकता. 
 • अॅल्युमिनिअम फॉईल:हल्ली सगळ्यांच्याच किचनमध्ये अॅल्युमिनिअल फॉईल असते.
 • नेल स्क्रॅपर: जर तुम्हाला जेल पॉलिश काढायची असेल तर तुम्हाला नेल स्क्रॅपरही चांगल्या प्रकारातील हवा. कारण जेल पॉलिश थोडे कडक असते ते काढायला  तुम्हाला मजबूत स्क्रॅपर आहे.
 • नेल फायलर : नेल फायलरच्या बाबतीतही अगदी तसेच आहे. त्यामुळे तुम्ही नेल फायलर निवडतानाही चांगला फायलर निवडा.

चेहऱ्यावरील पिंपल्स गेले पण डागांचे काय, करा हे घरगुती उपाय (Home Remedies For Acne Scars In Marathi)

असे काढा जेलपॉलिश

shutterstock

 • सगळ्यात आधी तुम्हाला चांगल्या नेलफायलरचा उपयोग करुन नख फाईल करायला घ्यायची आहेत. त्यामुळे तुमची जेलपॉलिश निघण्यास मदत होते. 
 • कापसाचे लहान लहान बोळे करुन त्यावर अॅसिटोन घ्यायचे आहे. प्रत्येक नखावर कापासाचा गोळा घट्ट लावायचा आहे.
 • अॅल्युमिनिअल फॉईलचे बोटांना गुंडाळता येईल इतक्या आकाराचे तुकडे करुन कापसांवर ते गुंडाळून ठेवायचे आहेत. 
 • अॅल्युमिनअम फॉईलमध्ये तुम्हाला तुमची बोट किमान 15 ते 20 मिनिटांसाठी ठेवून द्यायची आहेत.  
 • अॅसिटोन आणि अॅल्युमिनिअम फॉईलमुळे जेलपॉलिश निघते. पण तरीही ती इतर नेल पॉलिशसारखी निघत नाही. 
 • तुम्हाला ती काढण्यासाठी नेल स्क्रॅपर वापरावा लागतो. नखांच्या वरील बाजूने तुम्ही ते काढायला घ्या. . हळूहळू ती जेलपॉलिश निघून येईल.
 • आता फायनल फिनिशिंग देण्यासाठी पुन्हा एकदा थोडे फाईल करुन त्यावर अॅसिटोन लावायचे आहे. 
  तुमची बोट जेल पॉलिश मुक्त झाली आहेत. 
 • पण नखांना मॉश्चरायझर लावायला अजिबात विसरु नका.

तुम्ही या सोप्यापद्धतीने जेल पॉलिश काढा. सगळ्यात आधी तुम्हाला थोडी अडचण येईल पण तुम्ही अगदी आरामात ही जेलपॉलिश काढू शकाल. यामुळे तुमच्या 500 रुपयांची तरी नक्की बचत होईल. त्यात तुम्ही नवी जेलपॉलिश लावू शकाल.

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे  20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

देखील वाचा - 

अॅक्रेलिक नखं काढल्यानंतर नखांची काळजी कशी घ्यावी (How to Heal Nails After Acrylics)