ADVERTISEMENT
home / Care
Food For Hair Growth In Marathi

दाट केस हवे असतील तर फॉलो करा हे डाएट – Food For Hair Growth In Marathi

आपल्याआसपास असणारं प्रदूषण, बदलतं हवामान आणि केसांवर केल्या जाणाऱ्या ट्रीटमेंट्स या आपल्या केसांच्या आरोग्यासाठी घातक आहेत. याशिवाय काही शारीरिक समस्यांमुळेही केसांच्या वाढीवर आणि दाटपणावर प्रभाव पडतो. केस काळेभोर आणि सुंदर दिसण्यासाठी आपण किती प्रयत्न करतो. केस काळे करण्यासाठी आयुर्वेदिक औषध शोधतो, जेणेकरून दुष्परिणाम होण्याची रिस्क नसते. सलून मध्ये जातो सर्व काही करतो. अशाचप्रकारे याच कारणांमुळे आपले केस निरोगी आणि सुंदर ठेवणं हे आजच्या घडीला चॅलेंज झालं आहे. पण घाबरू नका हे चॅलेंज तुम्ही सहज स्वीकारू शकता आणि जिंकूही शकता. यासाठी तुम्हाला मदत करेल तुमचा पौष्टिक आहार. कारण तुमचा आहार जर केसांसाठी पोषक असेल तर त्यांच्या सौंदर्यात कधीच बाधा येणार नाही. मग चला जाणून घेऊया POPxoMarathi च्या या लेखात आहाराच्या मदतीने केस कशाने वाढतात त्याच प्रमाणे तुम्हाला कसं मिळवता येतील निरोगी, मऊ, मुलायम आणि दाट केस. खाली आम्ही शेअर करत आहोत असे पदार्थ आणि फळं जी तुमच्या निरोगी केसांसाठीच्या डाएटमध्ये असणं आवश्यक आहे (food for hair growth in marathi).

दूधाने मिळेल केसांना पोषण

कमी चरबीयुक्त डेअरी उत्पादनात आवश्यक प्रोटीन आणि कॅल्शियमचं प्रमाण पुरेसं असतं. ही दोन्ही तत्त्वं केसांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण पाया तयार करतात. खासकरून दूध हे कॅल्शियम, आर्यन, प्रोटीन आणि व्हिटॅमीन ए चा चांगला स्त्रोत आहे. यामुळे केसांच्या विकासासाठी हे आदर्श मानले जाते. प्रोटीन आणि आर्यन केसांच्या गळती रोखते सोबतच त्यांच्या विकासालाही चालना देते. तर कॅल्शियम केसांना निरोगी ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावतं. खासकरून महिलांमध्ये कॅल्शिअमचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे महिलांनी रोज एक ग्लास दूध पिणं आवश्यक आहे.

वाचा – केस गळतीवर घरगुती उपाय

अंड्याच्या सेवनाने केस वाढवा लवकर

Hair Growth Foods In Marathi

Hair Growth Foods In Marathi

ADVERTISEMENT

अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि बायोटिन असतात. ही दोन्ही पोषक तत्त्वं तुमच्या केसांच्या दाटपणासाठी सहाय्यक असतात. खरंतर प्रोटीने हे असं तत्त्व आहे, ज्यामुळे केसांची निर्मिती होते. तसंच बायोटिनच्या मदतीने तुमच्या केसांच्या गळतीची समस्या दूर होऊ शकते. याशिवाय अंड्यात व्हिटॅमीन बी-12 आणि डी सुद्धा असतं. शरीरामध्ये बी-12 पुरेश्या प्रमाणात असेल तर केसगळती थांबण्यास मदत होते. त्यामुळे अंड्याचं सेवन केल्यास केस दाटही होतात आणि पांढरेही होत नाहीत. अंड्यातील व्हिटॅमीन बी-5 मुळे केस मजबूत होतात आणि निरोगी राहतात. अंड्यामधील प्रोटीन केसांना चमकदार ठेवतं आणि स्प्लीट एंड्सही होऊ देत नाही.

केसांच्या विकासासाठी बेरीज

बेरीज म्हणजे बोरांचे विविध प्रकार हे केसांच्या विकासासाठी उपयुक्त ठरतात. त्यामुळे जर तुम्हाला ही फळं आवडत असतील तर यांचा आहारात नक्की समावेश करा. तसंच तुम्ही ब्लूबेरीचा रस आणि ऑलिव्ह ऑईल मिक्स करून केसांच्या मुळांशी लावल्यास केस जलद वाढतील आणि दाट व काळे होतील.

चमकदार केसांसाठी हिरव्या भाज्या

हिरव्या भाज्या या फॉलेटचा उत्तम स्त्रोत मानल्या जातात. त्यामुळे केस निरोगी आणि चमकदार होतात. फॉलेट केस पांढरे होण्यापासूनही वाचवतं. याशिवाय हिरव्या भाज्यांमध्ये व्हिटॅमीन ए, सी आणि आर्यनही असतं. व्हिटॅमीन ए मुळे केसांना चमकदारपणा येते. तसंच कोरड्या केसांना योग्य ओलावा मिळतो. पण लक्षात घ्या जास्त प्रमाणात ए व्हिटमीन हे केसगळतीसाठी कारणीभूत असतं. केसांच्या गळती रोखण्यासाठी कारल्याचा रस पिण्याचे फायदेही अनेक आहेत.

वाचा – लांबसडक आणि घनदाट केसांच्या वाढीसाठी घरगुती उपाय

ADVERTISEMENT

कोथिंबीर खा दाट केस मिळवा

कोथिंबीर खा दाट केस मिळवा

कोथिंबीर खा दाट केस मिळवा – Food For Hair Growth In Marathi

कोथिंबीर ही आपल्याकडे प्रत्येक पदार्थात हमखास वरून घातली जातेच. कारण कोथिंबीरीची पानं ही प्रोटीन, आर्यन, व्हिटॅमीन ए आणि व्हिटॅमीन सी चा उत्तम स्त्रोत आहेत. यामुळे केसांच्या आरोग्यासाठी कोथिंबीर खाल्लीच पाहिजे. व्हिटॅमीन सी केसांना फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसान जसं केस पांढरे होणे आणि केस गळणे यापासून वाचवतात. याशिवाय व्हिटॅमीन सी आर्यन शोषून केसगळती थांबवतं.

शतावरीने थांबेल केसगळती

शतावरीचं सेवन हे निरोगी केसांच्या डाएटमध्ये महत्त्वपूर्ण आहे. शतावरीमध्ये फॉलेट, व्हिटॅमीन के, सी, ए, ई, बी आणि आर्यनने भरपूर असतं. यातील व्हिटॅमीन ई, फॉलेट आणि आर्यन केसांसाठी आवश्यक आहे. व्हिटॅमीन ई केसांना निरोगी ठेवण्यास मदत करत. तर फॉलेट केसांना चमकदार बनवतं. याशिवाय आर्यन केसगळती रोखून त्यांची वाढ करण्यास मदत करतं.

अळशीने केस वाढतील झटपट

अळशीच्या बियांमध्ये फक्त आर्यनच नाहीतर ओमेगा-3 सुद्धा भरपूर प्रमाणात असते. एकीकडे आर्यन केसांच्या वाढीत मदत करते तर दुसरीकडे ओमेगा फॅटी एसिड स्कॅल्प संबंधित समस्या दूर करतं. ज्यामुळे केसांचा विकास होण्यास मदत होते. ओमेगा फॅटी एसिडच्या मदतीने सोरायसिसचा धोकाही टळतो. तसंच अळशीच्या बियांमध्ये व्हिटॅमीन ई हा केसांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण असणारा घटकही असतो. त्यामुळे तुमच्या दैनंदिन आहारात अळशीच्या बियांचा समावेश नक्की करा.

ADVERTISEMENT

सुकामेवा खा सुंदर केस मिळवा

सुकामेवा खा सुंदर केस मिळवा

सुकामेवा खा सुंदर केस मिळवा – Food For Hair Growth In Marathi

सुकामेव्यांमध्ये टोकोट्रिएनोल्स असतं जे शरीरामध्ये अँटीऑक्सीडंट्सचं काम करतं. या घटकाच्या मदतीने एलोपेसिया या केस गळण्याच्या समस्येपासून सुटका होते. याशिवाय सुकामेव्यात भरपूर प्रोटीन्स असतात. जे केसांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. असं म्हणतात की, सुकामेवा खाल्ल्याने एखाद्या व्यक्तीला टक्कल पडत असल्यास ते टाळता येईल. सुकामेव्यामध्ये बदाम, काजू, शेंगदाणे, मनुका आणि अंजीर इत्यादींचा समावेश आहे.

केसांच्या वाढीसाठी रताळं

आपल्याकडे मुख्यतः रताळं उपावासाच्या दिवशी खाल्लं जातं. यातील अँटीऑक्सीडंट आणि बीटा कॅरटीन शरीराला फ्री रॅडीकल्स आणि इतर दुष्परिणामापासून वाचवतं. तसंच रताळी केसांच्या वाढीतही मदत करतात. त्यामुळे फक्त उपवासाच्या दिवशीच नाहीतर इतरवेळीही रताळ्यांचं सेवन केलं पाहिजे.

केसांच्या निर्मितीसाठी फरसबी

निरोगी केसांच्या डाएटमध्ये फरसबीचा समावेश असलाच पाहिजे. कारण हा प्रोटीनचा उत्तम स्त्रोत आहे. त्यामुळे जे शाकाहारी असतील त्यांच्या आहारात फरसबी नक्की असावी. वर सांगितल्यानुसार प्रोटीनमुळे केसांची निर्मिती होते. त्यामुळे शरीरासोबतच केसांसाठीही प्रोटीन आवश्यक आहे. याशिवाय फरसबीमध्ये व्हिटॅमीन बी, ई, आर्यन, झिंक आणि मॅग्नेशियमही असतं. हे सर्व पोषक तत्त्व आपल्या केसांसाठी आवश्यक आहेत. फरसबीचा समावेश तुम्ही भाजी, सलाड, सूप किंवा पुलाव यात वापरून आहारात करू शकता.

ADVERTISEMENT

लिंबू, संत्र, मोसंबी ही फळं केसांसाठी पोषक

लिंबू, संत्र, मोसंबी ही फळं केसांसाठी पोषक

लिंबू, संत्र, मोसंबी ही फळं केसांसाठी पोषक – Food For Hair Growth In Marathi

आर्यन शोषून घेण्यासाठी शरीराला व्हिटॅमीन सी ची गरज असते. त्यामुळे तुमच्या आहारात सिट्रस म्हणजेच आंबट फळांचा समावेश करणं आवश्यक आहे. तुम्ही जर रोजच्या आहारात लिंबाचा समावेश केला तर तुम्हाला पुरेश्या प्रमाणात व्हिटॅमीन सी मिळते. जे केसांच्या मजबूतीसाठी आवश्यक असतं. लिंबूसोबतच संत्र आणि मोसंबीसारख्या फळांचा ज्यूसही तुम्ही घेऊ शकता. या फळातून मिळालेल्या व्हिटॅमीन सी ने कोलाजनची निर्मिती होते जे केसांच्या कोशिका बनवण्यात उपयुक्त ठरतं. ज्यामुळे केस मुळापासून मजबूत होतात.

वाचा – Kes Saral Karnyasathi Upay

केसगळती रोखतं सोयाबीन

सोयाबीनचा तुम्ही आहारात समावेश केल्यास केस चमकदार होतात. तसंच केसांची गळतीही कमी होते. सोयाबीनचा आहारात समावेश करण्यासोबतच तुम्ही सोयाबीन तेलाचा वापर थेट केसांवरही करू शकता. यामुळे केसांची वाढ चांगली होते आणि भविष्यातील नुकसानापासून केसांचं संरक्षण होतं.

ADVERTISEMENT

मऊ-मुलायम केसांसाठी अवकॅडो

तुम्ही केसांच्या डाएटबाबत सर्च केल्यास अवकॅडोचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. अवकॅडोमधील व्हिटॅमीन ई हे केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक असतं. तसंच यामध्ये असलेलं ओमेगा फॅटी एसिडही केसांना दाटपणा देत. अवकॅडो आहारात सामील करण्यासोबतच तुम्ही त्याचा हेअर मास्क म्हणूनही वापर करू शकता. अवकॅडोच्या क्रिमी टेक्श्चर आणि फॅटी एसिडने केस मऊ आणि मुलायम होण्यास मदत होते.

लांबसडक केसांसाठी उत्तम फिश ऑईल

लांबसडक केसांसाठी उत्तम फिश ऑईल

लांबसडक केसांसाठी उत्तम फिश ऑईल – Food For Hair Growth In Marathi

जर तुम्ही मासांहारी असाल तर तुमच्या डाएटमध्ये मासे असलेच पाहिजेत. माश्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ओमेगा-3 फॅटी एसिड आणि प्रोटीन असतं. ही दोन्ही पोषक तत्त्व केसांच्या वाढीसाठी मदत करतात. खासकरून ओमेगा-3 हे केसांचा दाटपणा वाढवण्यासोबतच केसांतील टेलोजन या अवस्थेला कमी करतं. टेलोजनमुळे केस गळतात. याशिवाय माश्यांमध्ये व्हिटॅमीन बी-12 आढळतं. जे केसांच्या गळती रोखतं. त्यामुळे जर तुम्ही मासे खात नसाल तर पर्याय म्हणून माश्यांच्या तेलापासून बनवलेल्या टॅबलेट्सच सेवन करू शकता. ज्यामुळे तुमच्या केसांचं आरोग्य नक्कीच वाढेल.

ओट्सने केस होतील दाट

ओट्स हे आरोग्यासाठी पोषक आहार आहे. तसंच केसांसाठीही ओट्स हा उत्तम आहार आहे. ओट्समध्ये प्रोटीन, फॅटी एसिड, व्हिटॅमीन ई, फॉलेट, झिंक, आर्यन, सेलेनियमसारखे अमिनो एसिड्स असतात. ही सर्व तत्त्वं केसांचा दाटपणा, केस जलद वाढणे आणि मुलायम केस होण्यास मदत करतात. हे लक्षात ठेवा की, ही सर्व पोषक तत्त्वं थेट खाद्यपदार्थातून घेणं आवश्यक आहे. तेव्हाच त्याचा जास्त फायदा होतो. तसंच तुम्ही ओट्सचा वापर हेअर मास्क म्हणूनही करू शकता.

ADVERTISEMENT

केस वाढण्यासाठी खा कडधान्यं

कडधान्याचं सेवन केसांच्या वाढीसाठी अद्भूत मानलं जातं. कडधान्यांमध्ये प्रोटीन, व्हिटॅमीन ए व सी, कॅल्शियम, झिंक फॉलेट आणि आर्यन भरपूर असतं. शाकाहारी लोकांनी ज्यांना मासे खाणं शक्य नाही त्यांनी कडधान्यांचं सेवन केलंच पाहिजे. खासकरून मोड आलेली कडधान्यं जसं मूग, काळे चणे आणि वाटाणे यांना सॅलड स्वरूपात खावं.

सुंदर केसांचं रहस्य दडलंय कढीपत्त्यात

सुंदर केसांचं रहस्य दडलंय कढीपत्त्यात

सुंदर केसांचं रहस्य दडलंय कढीपत्त्यात – Food For Hair Growth In Marathi

आपण प्रत्येकवेळी फोडणी करताना कडीपत्ता किंवा कढीपत्त्याचा वापर करतो. पण तुम्हाला माहीत आहे का कढीपत्ता हा प्रोटीन आणि आर्यनचा उत्तम स्त्रोत आहे. हा केसांच्या वाढीसाठी मदत करतो. केस जलद वाढणे आणि मुख्यतः पांढऱ्या केसांवर कडीपत्ता गुणकारी आहे. तुम्ही आहारात चटणी किंवा ज्यूसच्या रूपात याचा समावेश करू शकता. सोबतचा कढीपत्त्याचा हेअर मास्कही थेट केसांवर वापरू शकता.

आंबा खा पांढरे केस टाळा

उन्हाळ्यात येणारा आंबा हे फळ प्रत्येकाच्याच आवडीचं आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, आंबा हे फळ तुमच्या केसांसाठीही चांगल आहे. आंब्यातील व्हिटॅमीन ए, सी आणि ई हे केसांच्या वाढीला चालना देतं आणि केसगळतीही रोखतं. तसंच केस पांढरेही होऊन देत नाही. त्यामुळे उन्हाळ्यात येणारे आंबे मनसोक्त खा आणि केसांचं सौंदर्य वाढवा.

ADVERTISEMENT

लक्षात घ्या जर तुमचा आहार किंवा डाएट हे केसांसाठी पोषक नसेल तर केसांवर लावलेल्या शँपू किंवा कंडिशनरचा पूर्णतः परिणाम दिसणार नाही. त्यामुळे जर तुम्हाला काळे आणि दाट केस हवे असतील, तसंच तुम्हाला झटपट केस वाढविण्यासाठी योग्य उपाय जाणून घ्यायचे असतील तर आहारात वरील घटकांचा समावेश नक्की करा. जेवढा तुमचा आहार चांगला असेल तेवढे सुंदर तुमचे केस दिसतील. केसांबाबत तुमच्या अजून काही शंका असतील तर आम्हाला नक्की विचारा.

20 Mar 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT