हे अन्न खाऊन रोगप्रतिकारकशक्ती वाढवा, कोरोनापासून दूर राहा

हे अन्न खाऊन रोगप्रतिकारकशक्ती वाढवा, कोरोनापासून दूर राहा

सध्या कोरोना व्हायरस (Corona Virus) ने संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातला आहे. पण हा रोग आपल्यापर्यंत पोहचू नये यासाठी आपण आपली रोगप्रतिकारकशक्ती जास्त वाढवणं अत्यंत गरजेचं आहे. पण रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी आपण आपल्या रोजच्या जेवणात नक्की कोणत्या अन्नाचा समावेश करायला हवा हे मात्र कळत नाही. आपण आपल्या आहारात विटामिन सी चे प्रमाण वाढवणं गरजेचं आहे. म्हणजे सतत संत्र अथवा लिंबू खायला हवं असं नाही. आपल्या रोगप्रतिकारक शक्तीचे नियंत्रण ठेवणे हा आजारांपासून दूर राहण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. याचा अर्थ असा नाही की आपण आजारी पडू शकणार नाही. पण आपल्याला संसर्ग झाला तरी आपण संक्रमित प्रतिकारशक्ती असलेल्या एखाद्या व्यक्तीपेक्षा संक्रमणास चांगला प्रतिकार करू शकतो.  यासाठी ‘POPxo मराठी’ने खास बातचीत केली डेलनाझ टी. चंदुवाडिया, मुख्य आहारतज्ज्ञ, जसलोक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर यांच्याशी. त्यांनी आपल्याला कोणत्या अन्नाचा आपल्या जेवणामध्ये समावेश करून घेतल्यानंतर प्रतिकारशक्ती वाढेल हे सांगितलं आहे. 

विटामिन सी:

Shuttterstock

विटामिन सी इम्यूनोन्यूट्रिशनच्या गेमेटमधील एक महत्त्वपूर्ण जीवनसत्व आहे. यामध्ये कार्ये करण्याची आणि मूलभूत संक्रमण रोखण्याची क्षमता आहे. विटामिन सी मध्ये सर्वात जास्त अँटिऑक्सिडंट्सचा गुणधर्म असतो. जो  आपल्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याचे काम करतो. तसंच पेशीसंबंधी नुकसान आणि रोगाच्या निर्मितीस प्रतिबंध करण्याचे कामही करते. त्यामुळे आपल्या आहारात रोज लिंबू, संत्री, पेरू, आवळा, मिरपूडचा वापर करणं गरजेचे आहे. 

कांद्याची पात खा आणि मिळवा अनेक आजारांपासून सुटका

विविध भाज्या:

Shutterstock

आपल्या जेवणामध्ये ताट जर वेगवेगळ्या रंगाच्या पदार्थांनी भरले असेल तर आपल्याला जेवायलाही मजा येते. रंगबेरंगी फळे आणि भाज्यांमध्ये अनेक रंगद्रव्य असतात ज्यामध्ये क्लोरोफिल, अस्टॅक्सॅन्थिन, बीटा कॅरोटीन या सर्वांमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचे काम करतात. हिरव्या भाज्या, पालेभाज्या, कोबी, ब्रोकोली, बेरी यांचा रोजच्या आहारात समावेश करून घ्या.

'या' कारणांसाठी खाल्लीच पाहिजे कोबीची भाजी

हळद :

Shutterstock

प्राचीन काळापासून भारतीय जीवनशैलीने या मसाल्याचा नेहमीच वापर करण्यात येतो. हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचे मजबूत रोगप्रतिकारक बूस्टर आहे. हे  अँटी-इन्फ्लेमेटरी, स्नायू शिथिल करणारण्यासाठी म्हणून काम करते. त्याचप्रमाणे संधिवात आणि ऑस्टियोआर्थरायटीससाठीही याचा चांगला उपयोग होतो. नियमित आपण जेवणामध्ये तर हळदीचा वापर करतोच. पण रोज रात्री झोपताना अथवा दिवसातून एकदा दुधातून हळद घालून पिणे कधीही चांगले. याने आपली प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत  मिळते.  

आले:

Shutterstock

आले हे आपण नेहमी आपल्या जेवणात वापरत असतो.  याचा स्वाद अगदीच वेगळा असून यामुळे पदार्थांचा स्वाद बदलण्यास मदत मिळते. पण आपल्या शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करून रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठीही याची मदत मिळते. त्यामुळे आपण रोजच्या जेवणात शक्यतो आल्याचा वापर करायलाच हवा. अगदी रोजच्या चहातून थोडे आले किसून पोटात गेले तरी खूप झाले. रोजच्या  भाजी अथवा आमटीत याचा समावेश करता येत नसेल तर अशा प्रकारे तुम्ही आले वापरू शकता. पण आले रोज प्रमाणात खावे. 

ब्लड ग्रुपनुसार डाएट फॉलो केल्यास आरोग्याला होतील फायदे

बेरी:

बेरी जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडेंट्सने भरलेली असतात. सर्व फळे आणि शाकाहारी पदार्थ मिळविण्यासाठी हंगामी फळे आणि भाज्यांचे सेवन करणे महत्वाचे आहे. अँटीऑक्सिडंट रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतात. त्यामुळे बेरींचाही आपल्या आहारामध्ये समावेश करून घ्यावा.

आपल्या रोजच्या आहारात या अन्नाचा समावेश केल्यानंतर रोगप्रतिकारकशक्ती वाढून तुम्हाला नक्कीच कोरोनाशी दोन हात करणं सोपं जाईल. 

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

देखील वाचा - 

ध्यान कसे करावे (How To Do Meditation In Marathi)

काढयामध्ये असलेले औषधी घटक आणि फायदे

प्रतिकार शक्ती कमी आहे हे ओळखण्याची लक्षणे (Signs Of A Weak Immune System In Marathi)