सतत नेलपेंट लावल्यामुळे नखांना होऊ शकतात हे त्रास

सतत नेलपेंट लावल्यामुळे नखांना होऊ शकतात हे त्रास

काही जणांना कायमच टिप टॉप राहायला आवडते. त्यांना त्यांच्या सगळ्या गोष्टी परफेक्ट लागतात. म्हणजे नखांचेच घ्या ना.क काहींना त्यांची नखं कायमच स्वच्छ हवी असतात. ती छान दिसावी म्हणून खूप जण नियमितपणे नेलपेंट लावण्याची सवय असते. एक रंग लावून झाला की, तो काढून दुसरा रंग किंवा वेगवेगळ्या बोटांना वेगवेगळा रंग असे नेलपेंटसोबत सतत प्रयोग करण्याची खूप जणांना सवय असते. तुम्हीही सतत नखांना नेलपेंट लावत असाल तर तुमच्या नखांचे आयुष्य कमी होण्याची शक्यता असते. सतत नेलपेंट लावणे तुमच्या नखांना काय त्रास देते हे आता आपण जाणून घेऊया.

तुमचीही सुंदर वाढवलेली नखं अचानक तुटतात, मग करा हे उपाय (Home Remedies For Weak Nails In Marathi)

नखांवरील इनॅमल करते कमी

shutterstock

तुम्ही तुमची नखं नीट निरखून पाहिली असतील तर तुम्हाला तुमच्या नखांवर एक वेगळीच चमक दिसेल ही नखांवरील चमक असते तुमच्या नखांवरील इनॅमल . तुम्ही नखांना सतत नेलपेंट लावत असाल तर तुमच्या नखांची चमक कमी होत जाते. नखांवरील कमी होत जाणारी चमक तुमची नखं अनाकर्षक करते. त्यामुळे नखांना नेलपेंट लावल्यानंतर ती साधारण आठवडाभर ठेवा. त्यानंतर ती काढा. आठवडाभर तरी तुम्ही नेलपेंट लावू नका.

नखांचा रंग करते पिवळा

आपली नखं छान गुलाबी असतात. या नखांचा रंग तुमच्या सतत नेलपेंट लावल्यामुळे बदलू शकतो. तुमची नखं पिवळी दिसू  लागतात. नखांवरील इनॅमल कमी होऊन त्यांना पिवळा रंग येतो. हा रंग जात नाही. जो पर्यंत तुमची नख वाढत नाहीत.तुम्हालाही नखांचा रंग पिवळसर वाटत असेल तर तुम्हाला नेलपेंट लावणे थांबवण्याची गरज आहे. 

सुंदर लांब, नखं आवडतात.. मग नक्की करुन पाहा nail extensions

नख लागतात तुटू

नखांवर सतत होणाऱ्या केलमकल्सच्या प्रयोगामुळे नख नाजूक होऊन जातात. तुम्ही अॅसिटोनचा उपयोग करुन नखांवरील नेलपेंट काढून जरी टाकली तरी अॅसिटोनमुळेही तुमची नखं नाजूक होतात. अशी नाजूक झालेली नखं तुटू लागतात. तुम्ही जर अजिबात ब्रेक न घेता नेलपेंट लावत असाल तर तुम्हाला असा त्रास होणे अत्यंत स्वाभाविक आहे. त्यामुळे तुम्ही नखांची थोडी काळजी घ्या. 

नख लागतात दुभंगू

shutterstock

तुम्ही काही जणांची नखं पाहिली असतील तर तुम्ही एक गोष्ट प्रकर्षाने पाहिली असेल ती म्हणजे काही जणांची नखं दुभंगू लागतात. नखं दुभंगणेही आरोग्यासाठी चांगले नाही. नखं दुभंगू लागली की, त्यांची वाढ होत नाही. ती पातळ वाटू लागतात. ती खरखरीत झाल्यामुळे तुम्हाला ती लागण्याची शक्यता जास्त असते. 

आठवडाभर द्या आराम

नखांनाही आरामाची गरज असते. तुम्ही जर सतत नेलपेंट लावत असाल तर नखांना श्वास घेण्याचीही संधी मिळत नाही. म्हणून एक आठवडा नेलपेंट लावू नका. त्या काळात नखं छान स्वच्छ ठेवा आणि वाढू द्या. 


आता तुम्हाला नखांना नेलपेंट लावायची सवय असेल तर ती आताच थांबवा थोडा ब्रेक घ्या आणि मग पुन्हा तुमची नखं नेलपेंट लावून सुंदर बनवा.


2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे  20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.