केसांचा वॉल्युम वाढवतील या हेअर ट्रिटमेंट्स, जाणून घ्या या ट्रिटमेंट्स

केसांचा वॉल्युम वाढवतील या हेअर ट्रिटमेंट्स, जाणून घ्या या ट्रिटमेंट्स

केस चांगले तेव्हाच दिसतात जेव्हा केस घनदाट असतात. केसांचा वॉल्युम जास्त असेल तर तुम्ही केलेली कोणतीही हेअरस्टाईल चांगली दिसते. केसांचा वॉल्युम एका रात्रीच वाढवता येणे शक्य नाही. पण जर तुम्ही हेअर ट्रिटमेंटसची मदत घेणार असाल तर तुम्हाला तुमच्या केसांच्या वॉल्युममध्ये वाढ झालेली दिसेल आणि तुमचे केस अधिक चांगलेही झालेले दिसतील. आता बजेटच्या बाबतीत म्हणाल तर तुमच्या केसांच्या लांबीवर ते अवलंबून असतात. जाणून घेऊया केसांचा वॉल्युम वाढवण्याच्या या काही खास हेअर ट्रिटमेंट्स

स्ट्रेटनिंगला म्हणा नाही आणि करा केरेटीन

Instagram

एकेकाळी स्ट्रेटनिंगच फॅड होतं पण आता अनेक अॅडव्हान्स ट्रिटमेंट आल्या आहेत. स्ट्रेटनिंग केल्यामुळे तुमचे केस गळू लागले असतील तर मग तुमच्यासाठी केरेटीन ट्रिटमेंट उत्तम आहे. या ट्रिटमेंटमुळे तुमचे केस सरळ होत नाहीत. तर तुमच्या केसांना एक प्रकारे वॉल्युम मिळते. तुमचे केस अधिक चांगले दिसू लागतात. आता या केसांचा वॉल्युम अधिक काळ टिकवायचा असेल तर तुम्हाला केसांसाठी दिलेले प्रोडक्ट वापरणे फारच गरजेचे असते.  त्यामुळेच तुमच्या केसांचा वॉल्युम टिकून जास्त काळासाठी  टिकून राहतो.

 केरेटीन ट्रिटमेंट म्हणजे काय हे तुम्हाला माहीत नसेल तर या लिंकवर क्लिक करा.

साधारण खर्च : 5  ते 7 हजार

रुट बुस्ट ट्रिटमेंट

Instagram

 तुमच्या केसांची मूळ कमजोर झाली की, तुमचे केस गळू लागतात. तुमच्या केसांचा वॉल्युम त्यामुळे कमी होऊ लागतो. त्यामुळे तुमच्या केसांची मूळं  तुम्हाला सगळ्यात आधी मजबूत करायची असतात. हल्ली तुम्हाला रुट बुस्ट ट्रिटमेंटही करुन मिळतात. या ट्रिटमेंटमध्ये तुमच्या केसांच्या मुळांना हेअर रुट घट्ट करणारे सोल्युशन लावले जाते. तुमच्या केसांना मसाज केला जातो.तुमच्या केसांच्या नसांना मोकळे केले जाते. त्यामुळे केसांच्या वाढीला अधिक प्रेरणा मिळते. जर तुम्हाला अशा प्रकारचा मसाज करुन तुमच्या केसांचे वॉल्युम वाढवायचे असेल तर तुम्ही या ट्रिटमेंट करु शकता. अनेक सलोनमध्ये मोरक्कन ऑईल वापरण्यात येते 

साधारण खर्च : 4 ते 5 हजार

केसांसाठी केरेटीन (keratin) करण्याच्या विचार करताय.. तर मग वाचा

हेअर स्पा ट्रिटमेंट

Instagram

तुमचे केस चांगले राहावे यासाठी हेअर स्पा करण्याचाही सल्ला दिला जातो. जर तुम्ही तुमच्या केसांसाठी योग्य असलेला हेअर स्पा केला तर तुम्हला त्याचा त्रास होणार नाही. हेअर स्पामुळे तुमच्या केसांमधील घाण निघून जाते. केसांचे पोअर्समध्ये अडकलेली घाण निघाल्यामुळे तुमच्या केसांच्या वाढीला चालना मिळते. त्यामुळे तुम्ही योग्य सल्ला घेऊन हेअर स्पा ट्रिटमेंट करा तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. पण महिन्यातून एकदा तरी तुम्ही स्पा करायला हवा.

साधारण खर्च : 1 हजार रुपयांपासून पुढे

आता जर तुम्हाला केसांचे वॉल्युम वाढवायचे असेल तर तुम्ही या काही ट्रिटमेंट करु शकता.

तुमच्या केसांसाठी हा हेअर स्पा ठरु शकतो वरदान


2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे  20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.