ADVERTISEMENT
home / Styling
लहान केसांची हेअर स्टाईल

अशी करा लहान केसांची हेअर स्टाईल (Hairstyles For Short Hair)

 

आजकालच्या धावपळीच्या काळात केसांची निगा राखण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे केसांची उंची लहान ठेवणे. कारण केसांची निगा राखण्यासाठी त्यांना सतत हेअर ऑईल लावणं, दर दोन ते तीन दिवसांनी केस धुणे, केस विंचरणे अशा अनेक गोष्टी कराव्या लागतात. धावपळ आणि दगदगीच्या वेळी लांब केसांची निगा राखणं नक्कीच कठीण असतं. पण जर तुमच्या केसांची उंची कमी असेल तर त्यांची दररोज त्यांची योग्य निगा राखणं अतिशय सोपं जातं. घाईच्या वेळी अशा छोट्या केसांना स्टाईल करण्यासाठी काही हेअरस्टाईल्स अगदी परफेक्ट ठरू शकतात. यासाठीच लहान केसांची हेअर स्टाईलचे हे प्रकार नक्की ट्राय करा. 

बॉब हेअर कट आणि रेड हायलाईट्स

 

केसांची उंची लहान ठेवणं ही केसांची निगा राखण्याची एक सोपी पद्धत आहे. मात्र लहान केसांच्या हेअर स्टाईलसोबत तितकंच आकर्षक दिसण्याची गरज असते. हा हेअरकट करून तुम्ही लहान केसांमध्येही आकर्षक दिसू शकता. स्टायलिश बॉबकट आणि त्याला लाल अथवा बर्गंडी हेअर कलर करून तुमचा लुक तुम्ही अगदी हटके करू शकता. 

बॉब हेअर कट आणि रेड हायलाईट्स - Bob Hairstyle

Instagram

शोल्डर लेंथ स्ट्रेट हेअर स्टाईल

 

लहान केसांवर अशा अनेक सोपे हेअरस्टाईल्स कॅरी करता येऊ शकतात. अभिनेत्री श्रेया बुगडेचा हा लुक तिच्या या आकर्षक हेअरस्टाईलमुळे अगदी मस्त दिसत आहे. शोल्डर लेंथ ब्लंट हेअर कट साठी तुमचे केस मात्र स्ट्रेट असायला हवे. साडी अथवा एखाद्या एथनिक लुकवर ही हेअर स्टाईल अगदी उठून दिसेल.

ADVERTISEMENT
शोल्डर लेंथ स्ट्रेट हेअर स्टाईल - Shoulder Length Short Hairstyle

Instagram

नेक लेंथ कर्ली हेअर स्टाईल

 

काही लोकांचे केस मुळातच कुरळे असतात. अशा कुरळ्या केसांना उगाचच विनाकारण स्ट्रेट करून घेण्यापेक्षा ते आहेत तसेच कॅरी करणं उत्तम ठरेल. जर तुमचे केस कुरळे असतील तर त्यांची लांबी लहान ठेवून अशी मस्त हेअर स्टाईल तुम्ही करू शकता. अभिनेत्री ऊर्मिला निबांळकरची ही युनिक हेअर स्टाईल तिच्या लुकला आणखीनच बिनधास्त करत आहे. 

नेक लेंथ कर्ली हेअर स्टाईल - Neck Length Curly Hairstyle

Instagram

शॉर्ट बॉब हेअर स्टाईल

 

केस लहान असतील तर नवनवीन हेअर स्टाईल्स करण्याची हौस भागवता येत नाही. मात्र तुम्ही लहान केसांवरही काही हटके हेअरस्टाईल्स नक्कीच करता येतील. अगदी फार लहान केस असतील असा शॉर्ट बॉबकट आणि ब्लू हेअर कलर करून तुम्ही तुमचा लुक स्टायलिश करू शकता. फक्त तुमच्या स्वभावातदेखील तितकाच बोल्डनेस असायला हवा.

ADVERTISEMENT
शॉर्ट बॉब हेअर स्टाईल - Short Bob Hairstyle

Instagram

कर्ली बॉब

 

जर तुमचे केस अगदी लहान उंचीचे असतील तर ही स्टाईल करण्यास काहीच हरकत नाही. मानेपर्यंतचे केस अगदी सरळ असतील तर छान दिसतीलच असं नाही. म्हणूनच तुमच्या सरळ केसांना कर्लरने असं वळण द्या. शॉर्ट आणि कर्ली हेअर कट तुम्हाला अगदी परफेक्ट लुक देईल. एखाद्या ऑफिस मिटींग अथवा सेमिनारसाठी तयार होतात अगदी पटकन तुम्ही तुमच्या केसांना कर्ली करू शकता. 

कर्ली बॉब - Curly Bob

Instagram

मेसी हाफ बन

 

कधी कधी त्याच त्याच हेअरस्टाईलचा तुम्हाला कंटाळा येतो. अशावेळी काहीतरी वेगळी हेअर स्टाईल करावी असं तुमच्या नक्कीच मनात असतं. मात्र जर तुमचे केल लहान असतील तर तुमच्याकडे फार पर्याय उरत नाहीत. तुमच्या मानेपर्यंतच्या उंचीच्या केसांवर तुम्ही ही युनिक हेअर स्टाईल करू शकता. यासाठी तुमच्या डोक्याच्या वरच्या भागातील केसांचा एक मेसी बन बांधा आणि त्यांना बॉबी पिन्सनी क्लिप करा. अर्धे केस असेच मोकळे असू द्या. जर तुमचे केस लहान आहेत पण तुम्हाला तरी अशा काही वेस्टर्न हेअरस्टाईल करायच्या असतील तर तुम्ही त्याही ट्राय करु शकता

ADVERTISEMENT
मेसी हाफ बन - Messy Half Bun

Instagram

लूज साईड बन

 

लूज साईड बन ही देखील लहान केसांसाठी हेअर स्टाईल आहे. यासाठी तुमच्या केसांचा एक सैल बन तयार करा आणि डाव्या अथवा उजव्या बाजूला तो बॉबी पिन्सच्या मदतीने फिक्स करा. झटपट होणारी ही हेअर स्टाईल तुम्हाला कोणत्याही  कार्यक्रमासाठी अगदी परफेक्ट लुक देईल. तुम्ही ही हेअरस्टाईल साडी, एथनिक लुक अथवा एखाद्या वन पिसवर नक्कीच ट्राय करू शकता. 

केसतोड का होतो (Causes Of Hair Follicle Boils In Marathi)

लुज साईड बन - Loose Side Bun

Instagram

ADVERTISEMENT

पार्टी लुक हेअर स्टाईल

 

पार्टीला जाताना कसं तयार व्हावं हा एक मोठा गहन प्रश्न असतो. एकतर पार्टीचा बेत नेहमीच अचानक ठरतो अशा कमी वेळात लहान उंचीच्या केसांची हेअर स्टाईल करणं म्हणजे त्रासदायक काम आहे. मात्र जर तुमच्याकडे स्ट्रेटनर अथवा कर्लर असेल तर असा ग्लॅमरस लुक तुम्ही घरीदेखील तयार करू शकता. कर्ल केल्यावर केसांवर हेअर स्रे लावण्यास विसरू नका. ज्यामुळे तुमचे केस मुळीच खराब होणार नाहीत. 

पार्टी लुक हेअर स्टाईल - Party look hairstyle

Instagram

फ्लोरल अप डू हेअरस्टाईल

 

लग्न समारंभात साडी, लेहंगा अथवा एथनिक ड्रेसवर ही हेअर स्टाईल अगदी मस्त दिसेल. केसांमध्ये फुलं माळल्यावर हेअर स्टाईल अधिक सुंदर दिसते. यासाठी तुमच्या केसांना क्रिम्पिंग करून घ्या. मागच्या बाजूने लो बन प्रमाणे केस बॉबी पिन्सने फिक्स करा. त्यावर अशी फुलांची सजावट करा ज्यामुळे तुमचा अगदी मस्त लुक दिसेल. 

फ्लोरल अप डू हेअरस्टाईल - Floral Updo Hairstyle

Instagram

ADVERTISEMENT

हाफ अप हाफ डाऊन हेअर स्टाईल

 

जर तुम्हाला अगदी बबली लुक हवा असेल तर ही हेअर स्टाईल नक्कीच ट्राय करा. तुमच्या केसांमध्ये भांग पाडून केसांचे दोन भाग तयार करा. त्या दोन्ही भागांच्या वेण्या घालून त्या एकत्र करा आणि त्या वेणीचा एक बन तुमच्या डोक्यावर बॉबी पिन्सने फिक्स करा. 

हाफ अप हाफ डाऊन हेअर स्टाईल - Half Up Half Down Hairstyle

Instagram

पारंपरिक खोपा

नऊवारी साडी नेसल्यावर जर तुम्हाला पारंपरिक लुक हवा असेल तर केसांच्या लहान उंचीमुळे तुमच्याकडे हेअर स्टाईल्सचे खूपच कमी पर्याय उरतात. मात्र जर तुम्ही तुमच्या केसांना एक्स्टेंशन लावून असा खोपा घातला तर हेअरस्टाईल नवरीच्या लुकमध्ये पटकन बदल होऊ शकतो. शिवाय या खोप्यावर अनेक पारंपरिक दागदागिने घाला ज्यामुळे तुमचे लहान केस त्यात झाकले जातील. 

पारंपरिक खोपा - Traditional Bun

वेव्ही हेअरस्टाईल

आजकाल केसांना वेव्ही म्हणजेच लाटेप्रमाणे दिसणारा लुक करण्याची फॅशन आहे. तुम्ही तुमच्या केसांना असा लुक नक्कीच देऊ शकता. यासाठी थोड्यावेळासाठी केस ट्विस्ट करून वर बांधून ठेवा. ज्यामुळे मोकळे सोडल्यावर केस अशाप्रकारे दिसू लागतील.

ADVERTISEMENT
वेव्ही हेअरस्टाईल - Wavy Hairstyle

Instagram

Pixie हेअरस्टाईल

शॉर्ट केसांना अधिक सुंदर करण्यासाठी हेअर आर्टिस्ट नवनवीन हेअर स्टाईल्स शोधून काढत असतात. आजकाल हा हेअर कट ट्रेंडमध्ये आहे. याला pixi हेअर कट असं म्हणतात. ज्यामध्ये केसांच्या एकाबाजूची उंची जास्त आणि एकाबाजूची उंची कमी असते. ज्यामुळे या हेअरकट केल्यावर तुम्हाला स्टायलिश लुक नक्कीच मिळू शकतो.  

Pixie Hairstyle

Instagram

12 Mar 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT