रंगामुळे त्वचा डॅमेज झाली असेल तर अशी घ्या काळजी

 रंगामुळे त्वचा डॅमेज झाली असेल तर अशी घ्या काळजी

धुळवडचा आनंद काल अनेकांनी घेतला असेल. तुम्ही कितीही कोरड्या रंगाने होळी खेळली असली तरी रंग तुमच्या चेहऱ्याच्या आतपर्यंत जाऊन राहतात. हे रंग जर योग्यवेळी त्वचेवरुन काढून टाकले नाही तर तुमची त्वचा डॅमेज होण्याची शक्यता जास्त असते. पिंपल्स, रॅशेस येऊन त्वचा निस्तेज दिसण्याची शक्यता असते. तुम्हीही होळीच्या शुभेच्छा आणि धुळवडीचा आनंद लुटला असेल तर तुम्ही तुमची त्वचा पूर्ववत करण्यासाठी सात दिवस तरी हे रुटीन फॉलो करा तुमची त्वचा पुन्हा सुंदर आणि नितळ दिसेल. मग करुया सुरुवात

रंगोत्सवाचा आनंद लुटताना त्वचा आणि केसांची घ्या विशेष काळजी

रोज करा मसाज

Instagram

तुमच्या त्वचेच्या पोअर्समध्ये अडकलेले रंगद्रव्य काढून टाकायचे असतील तर मसाज हा उत्तम पर्याय आहे. तुमच्या त्वचेला शोभणाऱ्या तेलाचा उपयोग तुम्ही यासाठी करु शकता. जर तुम्हाला त्वचेसाठी कोणते तेल वापरायचे हे कळत नसेल तर तुम्ही बेबी ऑईलचा उपयोग करु शकता. हातावर थोडे बेबी ऑईल घेऊन तुमच्या चेहऱ्याला लावा. अलगद हाताने तुमच्या चेहऱ्यावर मसाज करा. असे करताना कानांना मसाज करायला अजिबात विसरु नका. साधाऱण दोन मिनिटं मसाज करा. मसाज केल्यामुळे तुमचे पोअर्स उघडतात आणि त्यातील घाण बाहेर पडण्यास मदत होते. 

दिवसातून दोनदा करा फेसवॉश

Instagram

साधारणपणे आपण सगळेच दिवसातून दोन वेळी तरी फेसवॉश करतो. तिच पद्धत तुम्हाला इथे सुद्धा अवलंबायची आहे. चांगल्या फोम फेसवॉशने तुमचा चेहरा तुम्हाला धुवायचा आहे. पण चेहरा धुताना तुम्ही फेसवॉशचा चांगला फेस काढून मग कोमट पाण्याने चेहरा धुवायचा आहे. त्यामुळे तुमचा चेहरा स्वच्छ धुतला जातो आणि मॉश्चराईजदेखील होतो. 

गरजेपेक्षा जास्त वेळा फेशिअल केल्याचे दुष्परिणाम

हॉट टॉवेल मसाज

Instagram

जर तुमच्या नाकावर किंवा हनुवटीच्या पोअर्समध्ये रंग दिसत असेल तर तुम्हाला हॉट टॉवेल मसाज घेता येईल. टर्किश टॉवेल गरम पाण्यात बुडवून तो पिळून तुमच्या चेहऱ्यावर ठेवा. गरम पाण्यामुळे तुमच्या चेहऱ्याचे पोअर्स उघडतात. त्यानंतर तुम्ही त्याच टॉवेलने तुम्ही तुमचा चेहरा कोरडा करुन घ्या. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यामध्ये अडकलेले रंगाचे कण बाहेर पडण्यास मदत मिळते. शिवाय तुमच्या त्वचेला आलेला थकवाही त्यामुळे दूर होतो.

टाळा स्क्रब

Instagram

अनेकांना स्क्रब केल्यामुळे त्वचेमधील घाण निघून जाईल असे वाटते. हे खरे असले तरी अति स्क्रब करणे तुमच्या त्वचेच्या आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. कारण असे केल्यामुळे तुमच्या त्वचेवर रॅशेश येण्याची शक्यता असते. त्यामुळे जर तुम्हाला स्क्रब करायची इच्छा असेल तर मायक्रो आणि लाईट स्क्रबचा उपयोग करा. त्यामुळे तुमच्या त्वचेला त्याचा त्रास होणार नाही.

वाचाजाणून घ्या रंगपंचमीची सर्व माहिती

नाईट मास्क किंवा मॉश्चराईजचा करा वापर

Instagram

आता इतके सगळे केल्यानंतर तुमच्या त्वचेतील तजेला टिकून ठेवायचा असेल तर तुम्ही नाईट मास्क आणि मॉश्चराईजर लावायला विसरु नका.रात्री झोपताना लाईट नाईट मास्क लावायला विसरु नका. घराबाहेर पडताना सनस्क्रिन आणि मॉश्चरायझर लावा. कारण त्यामुळे तुमच्या रुक्ष त्वचेला तजेला मिळेल. रंगामुळे अनेकदा त्वचा रुक्ष होते. त्यामुळे तुम्ही ही गोष्ट अजिबात विसरु नका. 

आता किमान आठवडाभर तरी तुम्ही या गोष्टी करा तुम्हाला तुमच्या त्वचेमध्ये झालेला फरक जाणवेल आणि पुढच्या वर्षी रंगपंचमीच्या शुभेच्छा आणि होळी स्पेशल पदार्थांचा आनंद लुटायलाही हुरूप येईल. 

 

 


2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे  20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.