लवंगतेलाचे आरोग्य आणि सौंदर्यावर होणारे फायदे

लवंगतेलाचे आरोग्य आणि सौंदर्यावर होणारे फायदे

भारतीय स्वयंपाकघरात मसाल्यांना फार महत्वाचं स्थान आहे. मसाल्यांमध्ये लवंगचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. लवंग खाद्यपदार्थाप्रमाणेच आरोग्य समस्या आणि सौंदर्य वाढवण्यासाठीदेखील उपयुक्त आहे. काही त्वचा समस्या, दातदुखी, खोकला, अस्थमा, ताणतणाव दूर करण्यासाठी लवंग फायदेशीर आहे. लवंगापासून लवंगाचं तेल काढलं जातं. लवंगतेलाचा वापर अनेक सौंदर्यप्रसाधने आणि औषधांमध्ये केला जातो. यासाठी जाणून घ्या लवंग तेलाचे फायदे आणि उपयोग कसा करावा.

Shutterstock

पिंपल्ससाठी उपयुक्त -

लवंग तेलामध्ये जीवजंतू मारण्याचे सामर्थ्य असते. यासाठीच पिंपल्स कमी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांमध्ये लवंगाचा वापर केला जातो. लवंग तेलामुळे त्वचेवरील पुरळ, अॅक्ने, काळे डाग, रॅशेस कमी करता येतात. 

कसा कराल उपयोग -

पिंपल्स कमी करण्यासाठी लवंग तेलाचे काही थेंब नारळाचे तेल, जोजोबा तेलात मिक्स करा. हे मिश्रण एकत्र करून कापसाच्या मदतीने तुमच्या पिंपल्सवर लावाय जर तुम्हाला एखाद्या तेलाची अॅलर्जी असेल तर तुम्ही मधातून लवंग तेल तुमच्या पिंपल्स कमी करण्यासाठी वापरू शकता. हे मिश्रण अर्धा तास चेहऱ्यावर ठेवून चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून टाका. 

Shutterstock

दातदुखी बरी करतो -

एका संशोधनानुसार लवंगामध्ये बॅक्टेरिया मारण्याचे गुणधर्म असतात. दाताला कीड लागल्यामुळे दातदुखी जाणवते. दातदुखी, तोंड येणं, हिरड्या आणि जीभेला होणाऱ्या दुखापती कमी करण्यासाठी लवंगतेलाचा वापर करण्यात येतो. लवंगतेलाचा वापर करून तुम्ही तुमची दातदुखी बरी करू शकता. 

कसा कराल वापर -

एक थेंब ऑलिव्ह ऑईल आणि दोन थेंब लवंग तेल कापसाच्या तुकड्यावर घ्या. कापसाचा तुकडा तुमच्या दुखण्यावर दातावर ठेवा. थोड्या वेळाने हे तेल तुमच्या दातांच्या किडलेल्या भागावर लागून इनफेक्शन कमी होते. दहा मिनीटांनी दातांची चुळ भरून टाका.  चुळ भरण्यासाठी गरम पाण्याचा वापर करा. 

पचनशक्ती सुधारण्यास मदत होते -

लवंगामुळे तुमची पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. जर तुम्हाला अयोग्य आहारामुळे अपचनाच्या समस्या होत असतील. अपचन, डायरिया, पोटात गोळा येणं, बद्धकोष्ठताच्या समस्या जाणवत असतील तर याचा तुमच्या समस्या दूर करण्यासाठी नक्कीच चांगला वापर होतो.

कसा कराल वापर -

काही थेंब लवंग तेल पोटाला लावा आणि हलक्या हाताने तुमच्या पोटावर मसाज करा. ज्यामुळे पोटातील गॅस बाहेर पडण्यास मदत होईल. 

Shutterstock

ताणतणाव कमी करण्यासाठी -

अती काम अथवा कामाची दगदग यामुळे तुम्हाला ताणतणाव जाणवू शकते. कधी कधी हा ताण कमी करण्यासाठी तुम्ही लवंग तेलाचा वापर करू शकता. लवंग तेलाला एक प्रकारचा सुंदर अॅरोमा येतो. ज्यामुळे तुमचा थकवा कमी होतो आणि फ्रेश वाटण्यास मदत होते. 

कसा कराल वापर -

नारळाच्या अथवा ऑलिव्ह ऑईलमध्ये लवंग तेलाचे काही थेंह टाका. या मिश्रणाने तुमच्या कपाळावर मसाज करा. ज्यामुळे काही वेळाने तुम्हाला ताण कमी झाल्याचे वाटू लागेल. 

सर्दी - खोकल्यावर गुणकारी -

लवंग तेलामध्ये थंडावा आणि दाह कमी करणारे गुणधर्म असतात. तुमचा श्वास मोकळा होण्यासाठी ते फारच उपयुक्त ठरते. सर्दी खोकल्यामुळे नाकपुड्या आणि श्वसनमार्गात अडथळे येतात. यासाठीच सर्दी, खोकला, अस्थमा, सायनस अशा आजारपणात लवंग तेल औषधाप्रमाणे काम करतं.

कसा कराल वापर -

एका भांड्यात अथवा स्टीमरमध्ये पाणी गरम करा. त्यात काही थेंब लवंगतेल टाका. या पाण्याने नाक आणि नाकाकडील भागावर वाफ द्या. ज्यामुळे तुमचा श्वसनमार्ग मोकळा होईल. 

फोटोसौजन्य - शटरस्टॉक

हे ही वाचा - 

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

अधिक वाचा -

जिऱ्याचे हे फायदे जाणून तुम्ही व्हाल आश्चर्यचकीत (Cumin Seeds Benefits In Marathi)

काळ्या तांदुळाचे फायदे, ठरतात आरोग्यासाठी फायदेशीर

आरोग्यासाठी स्वादानुसारच करा वेलचीचा वापर, अन्यथा होतील गंभीर परिणाम

वाफ घेतल्याने आपल्या चेहऱ्याला अनेक फायदे मिळतात