कमळाच्या फुलांनी बहरलेला तलाव सर्वांनाच आकर्षित करतो. कारण कमळ हे एक आकर्षक फुल आहे. लक्ष्मीमातेच्या पुजनासाठी कमळाच्या फुलाचा वापर आवर्जून केला जातो. कारण लक्ष्मी देवता कमळावर विराजमान असते असं म्हणतात. मात्र एवढंच नाही कमळाच्या मुळांचा स्वयंपाकासाठीदेखील केला जातो. कमळाच्या मुळांना मराठी भाषेत कमळ काकडी आणि हिंदी भाषेत कमल ककडी असं म्हणतात. कमळ काकडीत फायबर्स, पोटॅशियम, लोह, व्हिटॅमिन बी आणि सी असतं. ज्यामुळे तुमच्या शरीराला पुरेसे पोषकमुल्य मिळतात. यासाठीच जाणून घ्या कमळ काकडी खाण्याचा तुमच्या शरीराला नेमका काय फायदा होतो.
कमळकाकडीमध्ये कॅलरिज खूप कमी प्रमाणात असतात. यात फायबर्स खूप प्रमाणात असतात ज्यामुळे तुमचे पोट बराच काळ भरलेलं राहतं. कमळ काकडी खाण्यामुळे तुम्ही कमी प्रमाणात खाता. ज्यामुळे तुमच्या शरीरात फॅटस् प्रमाणात निर्माण होते. कमळकाकडी खाण्यामुळे पचन चांगलं होतं. सहाजिकच कमळ काकडी खाण्यामुळे तुमचं वजन कमी होतं.
कमळ काकडीत फायबर भरपूर प्रमाणात असल्यामुळे तुमची पचनसंस्था चांगली असते. कमळ काकडीचा आहारात समावेश करून तुम्ही तुमच्या अपचन, बदकोष्ठता, पोटाच्या समस्या कमी होतात. कमळ काकडीमुळे पाचक रस चांगल्या पद्धतीने निर्माण होतात. म्हणूनच अपचनाची समस्या दूर ठेवण्यासाठी कमक काकडीची भाजी जरूर खा.
कमळ काकडीमध्ये पोटॅशियमचे प्रमाण भरपूर प्रमाणात असतात. म्हणूनच कमळ काकडी खाण्यामुळे रक्तप्रवाह नियंत्रित राहण्यास मदत होते. कमळ काकडीचा आहारात समावेश केल्यामुळे तुमचा रक्त वाहिन्यांचे कार्य सुरळीत सुरू राहते. ज्यामुळे तुम्हाला ब्लड प्रेशरच्या समस्या कमी प्रमाणात होतात.
कमळ काकडीमध्ये व्हिटॅमिन बी कॉप्लेक्स असते. ज्यामुळे तुमच्या मेंदूला चांगला आराम मिळतो. कमळ काकडी खाण्यामुळे ताण कमी होण्यास मदत होते, चिडचिड आणि डोकेदुखी कमी होते. म्हणूनच ताण तणावात असताना कमळ काकडीपासून तयार केलेले खाद्यपदार्थ जरूर खा.
कमळ काकडी आरोग्याप्रमाणेच तुमच्या त्वचा आणि केसांसाठीदेखील फायदेशीर असते. कमळ काकडीमधील व्हिटॅमिन बी आणि सीमुळे तुमच्या त्वचा आणि केसांवर नैसर्गिक चमक येते. जर तुम्हाला चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो येण्यासाठी आणि केसांच्या मजबूतीसाठी कमळ काकडीचा आहारात जरूर समावेश करा.
कमळ काकडी खाण्यामुळे रक्तातील उष्णता कमी होते. पित्ताचा त्रास कमी होतो. युरिनच्या समस्या कमी होण्यासाठी कमळ काकडीची भाजी खाण्याचा सल्ला दिला जातो. स्तनपान देणाऱ्या मातेने कमळ काकडीची भाजी खाल्यास दूधाचे प्रमाण वाढते. भारतात कमळ काकडीपासून भाजी, भजी, चिप्स, सलाड असे अनेक पदार्थ केले जातात.
कमळ काकडीची भाजी करण्यासाठी सोपी पद्धत -
साहित्य -
कमळ काकडी, कांदा, लसूण, टोमॅटो, किसलेलं ओलं खोबरं, गरम मसाला, आलं, कोथिंबीर, धणे, लाल मिरच्या, मीठ
कृती -
कमळ काकडी स्वच्छ धुवून सोलून घ्यावी. कुकरमध्ये कमळ काकडीच्या फोडी उकडून घ्याव्यात. शिजताना त्यात थोडंसं मीठ घालवं. कांदा, लसूण, ओलं खोबरं, धने, लाल मिरच्या यांचा मसाला तयार करावा. तेलावर हा मसाला परतून घ्यावा. त्यात कमळ काकडी आणि टोमॅटो टाकावा. मीठ आणि कोथिंबीर पेरून वाफेवर भाजी शिजवावी.
फोटोसौजन्य - शटरस्टॉक
हे ही वाचा -
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.
अधिक वाचा -
म्हणून आहारात हमखास हवी शेपूची भाजी
भोगीच्या भाजीचे आरोग्यदायी महत्त्व
कोणत्याही भाजीचा स्वाद वाढवण्यासाठी सोप्या कुकिंग टिप्स