उन्हाळ्याच्या काहिलीने बेजार झाल्यावर नुसतं लालचुटूक, रशरशीत कलिंगड पाहूनच थंडगार वाटतं. कलिंगड हे सर्वात जास्त पाण्याचा घटक असलेलं एक फळ आहे. ज्यामुळे ते खाण्यामुळे उन्हाळ्यात तुमचं मन नक्कीच तृप्त होऊ शकतं. शिवाय कलिंगडामध्ये कॅलरिजचं प्रमाण कमी असल्यामुळे ते भरपूर जरी खाल्लं तरी तुमचं वजन नक्कीच वाढत नाही. कलिंगडामधील व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए मुळे तुमच्या शरीराला पोषक घटकही मिळतात. कलिंगडामधील फायबर्समुळे तुमच्या शरीरातील पचनसंस्था सुरळीत राहेत. केस आणि त्वचेसाठी कलिंगड एखाद्या वरदानाप्रमाणे काम करतं यासाठीच जाणून घ्या कलिंगड खाणं आरोग्यासाठी का फायदेशीर आहे आणि कलिंगड खाण्याचे फायदे (kalingad che fayde in marathi)
कलिंगडामध्ये कॅलरिज कमी असल्या तरी पोषक तत्त्वं मात्र भरपूर असतात. एक कप कलिंगडाच्या तुकड्यांमधून तुम्हाला 45 ते 50 कॅलरिज मिळतात. शिवाय इतर फळांच्या मानाने यातून शरीराला साखरेचे प्रमाणही कमी मिळते. कलिंगडात व्हिटॅमिन ए, सी, आणि बी, पोटॅशियम, मॅग्नेशियम असे अनेक पोषक घटक असतात. जाणून घ्या कलिंगडाच्या एका कापमध्ये अथवा एक कप कलिंगडामध्ये किती प्रमाणात पोषक मुल्ये असतात.
कलिंगड तुमच्या संपूर्ण आरोग्य, केस आणि त्वचेसाठी गुणकारी आहे. यासाठीच जाणून घ्या कलिंगड खाण्याचे फायदे.
उन्हाळ्यामध्ये सुर्याच्या प्रखरतेमुळे होणारी काहिली सहन करणं एक फार मोठं आव्हान असतं. या काळात वातावरणात उष्णतेचं प्रमाण वाढल्यामुळे शरीर आणि त्वचा लवकर डिहायड्रेट होते. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाण्याची गरज असते. घामावाटे शरीरातील सतत कमी होत असतं. जर तुम्हाला वारंवार पाणी पिण्याचा कंटाळा येत असेल तर कलिंगड खाणं हा त्यावर एक सोपा उपाय आहे. कारण कलिंगडामध्ये जवळजवळ नव्वद टक्के पाणी असतं. शिवाय उन्हाळ्यात तुम्हाला भुकही जास्त लागत नाही. अशा वेळी कलिंगड खाण्यामुळे तुमचं पोट बराच काळ भरलेलं राहतं. म्हणूनच उन्हाळात कलिंगड खाणं अत्यंत गरजेचं आहे. यासोबतच जाणून घ्या उन्हाळ्यात तुम्हाला हायड्रेट ठेवणारी 5 फळं.
एका संशोधनानुसार कलिंगडातील पोषक घटकांमुळे तुमचे कर्करोगापासून संरक्षण होऊ शकते. यासाठी दोन जेवणांच्या मधल्या वेळात नियमित कलिंगड खाण्याची सवय लावा. कलिंगडामध्ये भरपूर अॅंटि ऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन्स असतात ज्यामुळे कर्करोगासारख्या रोगापासून तुमचे संरक्षण होते. याचप्रमाणे कलिंगडामधील ग्लायकोजीनमुळे प्रोस्टेट कॅन्सरचा धोकादेखील कमी होतो. यासाठीच नियमित कलिंगड खायलाच हवे.
वाचा - कोकम सरबत पिण्याचे फायदे
आजकाल जगभरात ह्रदयाच्या समस्या आणि आजार वाढत आहेत. एका संशोधनानुसार जर आहारात कलिंगडाचा नियमित वापर केला तर कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यास मदत होते. ह्रदयाचे आरोग्य जपण्याचा हा एक अतिशय साधा आणि सोपा पर्याय आहे. कलिंगडातील गर हा त्यातील लायकोपेन या घटकद्रव्यामुळे लाल रंगाचा असतो. अनेक लाल रंगाच्या फळांमध्ये हा घटक असतो. मात्र एवढंच नाही. या लायकोपेनमुळे तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होते आणि त्यामुळे तुम्हाला ह्रदय विकारांचा धोका कमी होतो. एवढंच नाही तर कलिंगडाचा सर्व भाग ह्रदयासाठी गुणकारी असतो. कारण कलिंगडातील हिरव्या पिवळ्या भागाचे सेवन केल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.
काही गंभीर आरोग्य समस्यांमुळे आजकाल शरीराला दाह अथवा जळजळ जाणवते. शरीराचा दाह होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. ह्रदयविकार, मधुमेह, कर्करोग आणि इतर अनेक असे विकार आहेत ज्यामुळे तुमच्या शरीराचा दाह होऊ शकतो. मात्र शरीराचा दाह झाल्यामुळे त्या रोगावर मात करणं कठीण होऊन बसतं आणि रूग्णांचा त्रास अधिकच वाढतो. अंगाला होणारा हा दाह अथवा काहिली कमी करण्याचा सोपा मार्ग म्हणजे दररोज कलिंगड खाणे. आहारात जर नियमित कलिंगड असेल तर तुम्हाला उष्णता अथवा जळजळीचा त्रास कमी करता येतो.
कलिंगडामध्ये व्हिटॅमिन ए आणि सी भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे तुमच्या केस आणि त्वचेसाठी कलिंगड एक वरदान ठरू शकतं. व्हिटॅमिन सी मुळे तुमची त्वचा मऊ आणि केस मजबूत होतात. व्हिटॅमिन ए मुळे तुमच्या केस आणि त्वचेचं आरोग्य चांगलं राहतं. यासाठीच सौंदर्याची काळजी घेण्यासाठी नियमित कलिंगड खाणं तुमच्या नक्कीच फायद्याचं ठरू शकतं. यासोबतच जाणून त्वचेला तजेलदार करणारी फळं
कलिंगडामध्ये नव्वद टक्के पाणी आणि भरपूर फायबर्स असतात. ज्यामुळे कलिंगड खाणे तुमच्या शरीरासाठी फायदेशीर ठरते. आजकाल खाण्याच्या चुकीच्या वेळा, अपथ्यकारक पदार्थ आणि चुकीची जीवनशैली याचा परिणाम नकळत तुमच्या पचनशक्तीवर होत असतो. मात्र कलिंगड खाण्यामुळे हळू हळू तुमची पचनशक्ती सुधारू शकते. जर तुम्हाला सतत पचनाच्या समस्या, अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर नियमित कलिंगड खा.
मधुमेहींनी फळं खावी की नाही खावी याबाबत अनेक समज गैरसमज आहेत. फळांमधील नैसर्गिक साखर बऱ्याचदा बाधक नसते. शिवाय कलिंगडामध्ये दोन प्रकारचे अमिनो अॅसिड असतात. या दोन्ही अमिनो अॅसिडमुळे तुमचे मधुमेहापासून संरक्षण होते. थोडक्यात सांगायचे झाल्यास मधुमेहापासून संरक्षण मिळवण्यासाठी दररोज एक कप कलिंगड खाणे तुमच्या फायद्याचे ठरू शकते. शिवाय जे लोक मधुमेही आहेत त्यांनीदेखील मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी कलिंगड खाण्यास काहीच हरकत नाही.
निरोगी राहण्यासाठी वजन नियंत्रित ठेवण्याची गरज असते. मात्र वाढतं वजन ही आज अनेकांची एक डोकेदुखी झालेली आहे. कारण अनेक प्रयत्न करूनही अनेकांना वजन कमी करण्यात यश मिळत नाही. योग्य डाएट, नियमित व्यायाम आणि जीवनशैलीत बदल करून वजन कमी करणे सहज शक्य आहे. नियमित कलिंगड खाण्याचाही तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. कलिंगडामध्ये भरपूर पाणी अणि फायबर्स असतात. ज्यामुळे तुम्हाला दिवसभरात जास्त भुक लागत नाही. शिवाय यातील पोषक घटकांमुळे तुमचे योग्य पोषणही होते. ज्याचा परिणाम तुमच्या वाढणाऱ्या वजनावर होतो आणि तुमचे वजन कमी होते. यासाठीच वजन कमी करण्यासाठी नियमित कलिंगड खाणे फायद्याचे ठरते. वजन कमी करण्यासाठी आणि त्वचेवर ग्लो येण्यासाठी ही फळं आहारात असायलाच हवी.
नियमित कलिंगड खाण्यामुळे तुमच्या दातांचे आरोग्यदेखील सुधारू शकते. सध्या जगभरातील जास्तीत लोकांना दातांच्या समस्या असल्याचे आढळून येत आहे. दात पडणे, दात किडणे, दातांचे इनफेक्शन आणि तोंडाच्या समस्यांमुळे तोंडाचे आरोग्य तर बिघडतेच पण यामुळे शरीरावरही वाईट परिणाम होतो. म्हणूनच दातांचे आरोग्य राखणे ही काळाची गरज झाली आहे. कलिंगडामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते. ज्यामुळे तुमच्या दातांच्या अनेक समस्या कमी होतात. यासाठीच प्रत्येकाने नियमित कलिंगड खाणे गरजेचे आहे.
मानवी शरीरात अन्न, पाणी आणि नाकाद्वारे घेतली जाणारी हवा अशा अनेक माध्यमातून विषद्रव्ये प्रवेश करत असतात. शरीरात जमा होणारी ही विषद्रव्ये वेगळ्या वेळी बाहेर टाकणं गरजेचं असते. टॉक्सिन्स अथवा विषद्रव्यांचा योग्य निचरा करण्याचे काम किडनी अथवा मूत्रपिंड करत असते. किडनीचे कार्य सुरळीत सुरू राहण्यासाठी शरीराला पुरेशा पाण्याची गरज असते. जर तुम्ही नियमित कलिंगड खात असाल अथवा कलिंगडाचा रस पित असाल तर त्या माध्यमातून शरीराला पुरेसे पाणी आणि पोषण दोन्ही मिळते. कलिंगडातील कॅल्शिअम आणि पोटॅशिअम किडनीचे कार्य सुधारण्यास मदत करतात. ज्यामुळे शरीरातील टॉक्सिन्सचा योग्य निचरा होतो.
कलिंगड खाण्याची योग्य वेळ म्हणजे सकाळी नास्ता करताना ते खाणे. कलिंगडामध्ये कमी कॅलरिज आणि भरपूर पाणी, फायबर्स असल्यामुळे कलिंगड खाण्यामुळे तुम्हाला दिवसभर पोट भरल्यासारखे आणि उत्साही वाटते. म्हणूनच उन्हाळी दिवसाची सुरूवात तुम्ही कलिंगड खाऊन करू शकता.
कलिंगडामध्ये नव्वद टक्के पाणी असते. ज्यामुळे तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित राहते. शिवाय यामधील कॅल्शिअम आणि पोटॅशिअममुळे किडनीचे कार्य सुधारते आणि शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते.
कलिंगडामधील नैसर्गिक साखर शरीरासाठी अपायकारक नाही. त्यामुळे मधुमेहीदेखील बिनधास्त कलिंगड खाऊ शकतात. कलिंगड खाण्यामुळे रक्तातील साखर वाढत नाहीच पण शरीराला योग्य प्रमाणात उर्जा मिळते.