गुढीपाडव्यासाठी करा घरच्या घरी सोप्या पद्धतीने श्रीखंड

गुढीपाडव्यासाठी करा घरच्या घरी सोप्या पद्धतीने श्रीखंड

गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्ष आरंभ. आपल्याकडे गुढीपाडव्याच महत्त्व फार असतं. या दिवशी घरोघरी पक्वान्नाचा बेत असतो.  सर्वात जास्त गोड पदार्थ या दिवशी बनवण्यात येतो तो म्हणजे श्रीखंड. पण श्रीखंडासाठी घालायला लागणारा घाट आपल्याला नको असतो. बऱ्याच जणांना वाटतं श्रीखंड हे घरात बनवता येतच नाही. आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात तर श्रीखंड विकतच घ्यायला प्राधान्य दिलं जातं.  श्रीखंडामध्येही आता अनेक व्हरायटी आल्या आहेत. केसर पिस्ता, केसर वेलची, राजभोग, मँगो अशी अनेक चवीची श्रीखंड आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध आहेत. पण सोप्या पद्धतीने आपण हे श्रीखंड घरीही बनवू शकतो असं सांगितलं तर पटेल का तुम्हाला? तर आम्ही तुम्हाला याची पद्धत सांगणार आहोत आणि या गुढीपाडव्याला तुम्हीही तयार करा घरच्या घरी चविष्ट श्रीखंड. आम्ही तुम्हाला इथे तीन चविष्ट श्रीखंडाची रेसिपी देणार आहोत. त्यापैकी तुम्हाला जे आवडेल ते  तुम्ही घरी बनवू शकता. चला तर लागा तयारीला. त्यासाठी सर्वात पहिले चक्का कसा घरी तयार करायचा हे जाणून घेऊया. 

दह्याचा चक्का बनवण्याची पद्धत -

घरी लावलेले दही एका सुती कापडात घट्ट बांधू घ्या. त्यानंतर दह्यातील सर्व पाणी निघून जाईपर्यंत ही सुती कापडाची पुरचुंडी तशीच बांधून ठेवा. साधारण 7-8 तास हे दही तसंच राहू द्या. म्हणजे तुम्ही रात्री दही बांधून ठेवा आणि सकाळी त्याचा श्रीखंड बनवण्यासाठी उपयोग करा. याचा मस्त चक्का तयार होतो. त्यासाठी तुम्हाला बाजारातून तयार चक्का आणायचीही गरज नाही.  काही जणांना हे दही आंबट होईल असं वाटतं. पण असं होत नाही. हे नीट आणि स्वच्छ सुती कापडामध्ये तुम्ही बांधले तर या दह्यावर अजिबातच परिणाम होत नाही.  

गुढीपाडव्याचा झटपट तयार होणारा महाराष्ट्रीयन खास मेनू

मँगो श्रीखंड

Instagram

लहान मुलांना मँगो फ्लेवर असणारे श्रीखंड खूपच आवडते. त्यामुळे तुम्ही हे घरीच तयार करू शकता. 

साहित्य - चक्का 250 ग्रॅम, पिठी साखर 250 ग्रॅम, आंब्याचा रस, थोडीशी वेलची पावडर, 3-4 चमचे दूध, जायफळाची पावडर, हव्या असल्यास ताज्या आंब्याची फोडी,  तुम्हाला हवं असेल तर केशर

कृती - घरी बनवलेला चक्का (वर रेसिपी दिली आहे) तुम्ही एका बाऊलमध्ये काढा आणि नीट फेटून घ्या. त्यामधील सर्व गुठळ्या काढा आणि त्यात पिठीसाखर मिक्स करा. त्यानंतर त्यामध्ये 3-4 चमचे दूध मिक्स करा पुन्हा फेटा. मग परत त्यात आंब्याचा रस मिक्स करा. पूर्ण फेटून झालं की त्यात वेलची पावडर आणि जायफळ पावडर मिक्स करा आणि पुन्हा फेटा. हे सर्व मिश्रण फेटून झालं की दुसऱ्या पातेल्यात सुती कापडा बांधून त्यावर घासून घ्यावे. यातून येणारे फेटलेले आणि स्मूथ श्रीखंड बाऊलमध्ये काढावे आणि त्यात आंब्याच्या फोडी मिक्स कराव्या अथवा तुम्हाला हवे असल्यास ड्रायफ्रूट्स मिक्स करावे. तुम्हाला हवं असेल तर केशर दुधात भिजवून त्यामध्ये फेटताना तुम्ही मिक्स करू शकता. 

उन्हाळ्यात घरीच तयार करा हे होममेड आईस्क्रिमचे '10' प्रकार

केशर वेलची श्रीखंड

Instagram

केशर वेलची श्रीखंडाचा खप हा सर्रास होत असतो. बाजारातून सर्वात जास्त विकत घेतलं जाणारं हे श्रीखंड आहे. तुम्ही हे घरीही तयार करू शकता.  

साहित्य - अर्धा किलो दह्याचा चक्का, 10-12 वेलची, 150 ग्रॅम पिठी साखर, रंगासाठी केशर 

कृती - वर दिल्याप्रमाणे आधी दह्याचा चक्का बनवून घ्यावा. वेलचीची बारीक पूड करून घ्या. बाऊलमध्ये चक्का घाला त्यात पिठीसाखर मिक्स करा. पिठीसारख विरघळेपर्यंत तुम्ही हे मिश्रण फेटा. त्यानंतर त्यात वेलची पूड आणि केशर घाला. दुधात केशर घालून आधीच तयार करून ठेवा.  यामुळे श्रीखंडाचा रंग बदलतो आणि श्रीखंड चवीला अधिक चविष्ट लागते. केशराचा रंग आल्यानंतर तुमचे श्रीखंड तयार. गरमागरम पुऱ्यांबरोबर या श्रीखंडाची चव अधिक चविष्ट लागते हे काही वेगळं सांगायला नको नाही का? 

 

राजभोग श्रीखंड

Instagram

राजभोग श्रीखंडामध्ये सुका मेव्याचा अमाप मारा असतो.  त्यामुळे त्याला राजेशाही थाट येतो. म्हणूनच याला राजभोग श्रीखंड असं म्हटलं जाते.  

साहित्य - चक्का, एक कप दूध, केशर, सुकामेवा (काजू, बदाम, पिस्ते, चारोळी), पिठी साखर अथवा साखर, जायफळ पावडर 

कृती - दह्याचा चक्का बनवून घ्या. एक कप दुधात केशर टाकून साधारण एक तास तसेच ठेवा. काजू, बदाम, पिस्ते यांचे बारीक तुकडे करून घ्या. चक्का ठेवलेल्या भांड्यात साखर, सुकामेवा, जायफळ पावडर मिक्स करून घ्या. नंतर ते फेटा. मिश्रण नीट फेटून घेतल्यानंतर त्यामध्ये  केशरयुक्त दूध मिक्स करा. हे सर्व मिश्रण पातेल्याला सुती कपडा लावून त्यावर फेटून घ्या. तुमचे राजभोग श्रीखंड तयार. श्रीखंड बाऊलमधून देताना त्यावर काजू, बदाम, पिस्ते, चारोळी पेरून द्या. 

या गुढीपाडव्याला मनसोक्त श्रीखंड - पुरीचा आनंद घरच्या  घरी श्रीखंड बनवून लुटा. गुढीपाडव्याच्या आणि नववर्षाच्या ‘POPxo मराठी’ कडून मनापासून शुभेच्छा!

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.