ADVERTISEMENT
home / Diet
नागीण रोग घरगुती उपाय

‘नागीण’ रोग का होतो? नागीण रोग घरगुती उपाय (Home Remedies For Nagin Disease In Marathi)

आपल्या देशात असे अनेक आजार आहेत ज्यांच्यासंदर्भात अनेक समज- गैरसमज आहेत. त्यापैकीच एक आजार आहे तो म्हणजे ‘नागीण’. त्वचेसंदर्भातील हा आजार असून याला इंग्रजीमध्ये herpes zoster असे म्हणतात. आपल्याकडे या आजाराला घाबरले जाते याचे कारण असे की, जर त्वचेवर आलेल्या पुळ्याचा विळखा पूर्ण झाला तर माणूस मरु शकतो असे म्हटले जाते. पण या त्वचारोगावर योग्य पद्धतीने इलाज केला तर तो बरा होऊ शकतो. म्हणून आज आपण नागीण आजार (nagin disease in marathi), नागीण उपचार या विषयी माहिती घेणार आहोत.

नागीण म्हणजे काय? (What Is Nagin Disease In Marathi)

अशा दिसतात नागीणच्या पुळ्या

shutterstock

 

सगळ्यात आधी नागीण म्हणजे काय ते आपण जाणून घेऊया. नागीण आजार (nagin rog in marathi) कांजिण्यांच्या विषाणूमुळे होते. कांजिण्या होऊन गेल्यानंतर काही जणांच्या शरीरात हे विषाणू तसेच राहतात.काही वर्षांनी हे विषाणू  नसेमार्फत पसरल्यामुळे त्वचेवर विशिष्ट फोड येतात. हे फोड आल्यानंतर अगदी तीन ते चार दिवसांत त्वचा लाल दिू लागते. ज्या ठिकाणी या पुळ्या येतात. त्या ठिकाणी त्या एकापाठोपाठ आणि पाण्याने भरलेल्या अगदी स्पष्ट दिसून येतात. साधारणपणे हा आजार बरगड्यांमधील चेतातंतूच्या रेषेवर दिसतो. कधीकधी चेहरा किंवा हातांमधील चेतांवरही त्याचा परिणाम दिसतो. नागीण हा तसा त्रासदायक आजार नाही. याचे परिणाम फार गंभीर नसतात. पण या पुळ्या जर डोळ्यात आल्या तर त्याचा परिणाम दृष्टीवर होऊ शकतो. पण असे असले तरी योग्यवेळी याचे निदान झाले तर बऱ्याच गोष्टी नियंत्रणात आणता येतात. डोळ्यांचे आजार दुर्लक्षित करणे हे मुळीच चांगले नाही. कारण त्याचे दीर्घ परिणाम जाणवतात.

ADVERTISEMENT

वाचा – त्वचा विकार आणि त्यावर आयुर्वेदिक उपाय

 

नागीण रोगाची कारणं कोणती ? (Nagin Disease Causes In Marathi)

ही आहेत अॅसिडीटी होण्याची कारणे

shutterstock

ADVERTISEMENT

 

नागीण रोग (nagin rog) होण्यामागे ही काही कारणं असतात. ही कारणं नेमकी कोणती ती सगळ्यात आधी जाणून घेऊया.

1. रात्री सतत जागरण करणे

 

नागीण (herpes zoster) होण्याच्या कारणांमध्ये हल्लीच्या लाईफ स्टाईलमुळे लागलेल्या चुकीच्या सवयी कारणीभूत आहेत. अपूर्ण झोपेमुळे तुमच्या शरीरावर अनेक परिणाम होऊ शकतात. नागीण होण्यामागे जरी कांजिण्यांचे विषाणू कारणीभूत असले तरी अपूर्ण झोप याला चालना देऊ शकते.

2. पित्तवर्धक आहार घेणे

 

पित्तवर्धक आहार हा देखील तुमच्या आरोग्यासाठी घातक आहे. तुमच्या शरीरातील पित्त वाढल्यामुळेही तुम्हाला नागीणचा त्रास होऊ शकत. किंवा याला खतपाणी मिळू शकते. त्यामुळे पित्तवर्धक आहार घेणे टाळा.

3. अवेळी खाणे

 

अवेळी खाण्याची सवय अनेकांना असते. खरंतरं अवेळी खाण्यामुळेच तुम्हाला अनेक आजारांना सामोरे जावे लागते. त्यापैकीच एक आहे ते म्हणजे नागीण. आता तुम्हाला वाटेल चुकीच्या वेळी काही खाल्ल्यामुळे तुम्हाला हा त्रास कसा होऊ शकतो तर याचे कारण आहे शरीरात वाढणारे पित्त. जर तुम्ही असे अवेळी खात असाल तर तुम्हाला हा त्रास होऊ शकतो.

ADVERTISEMENT

4. प्रतिकार शक्ती कमी होणे

 

प्रतिकारशक्ती कमी झाली तरी तुम्हाला आजारांची लागण अगदी पटकन होते. नागीणच नाही तर प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे तुम्हाला इतर आजारांची लागण ही होऊ शकते. जर कांजिण्याचे विषाणू तुमच्या शरीरातून पूर्णत: जायला हवे असतील तर तुम्ही तुमची प्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे आहे. 

जाणून घ्या इसब त्वचारोग वर घरगुती उपाय

5. पित्त दुर्लक्षित करणे

 

काही जणांना अॅसिडीची खूप त्रास असतो. काही जण रोजचा त्रास समजून याकडे दुर्लक्ष करतात. पण जर तुम्ही याकडे दुर्लक्ष करत असाल तर तुम्हाला नागीण सारखा गंभार आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला जर अॅसिडीटीचा त्रास असेल तर तुम्ही त्यावर योग्य इलाज करुन घ्या.

वाचा – चामखीळ घालवण्यासाठी घरगुती उपाय

ADVERTISEMENT

नागीण रोगाची लक्षणे (Symptoms Of Nagin Disease In Marathi)

अंगावर येतात लाल पुळ्या

Shutterstock

नागीण रोगाची जशी काही कारणे आहेत. तशीच ती झाल्याची काही लक्षणं सुद्धा आहेत ही लक्षणं कोणती ते आधी जाणून घेऊया.

1. खाज येणे

नागीण झाल्यानंतर तुमच्या शरीरावर विशिष्ट पद्धतीच्या पुळ्या येतात. या पुळ्या पाणीदार असल्यामुळे त्यांना खाजसुद्धा येते. त्यामुळे तुम्हाला आलेल्या पुळ्यांमधून जर सतत खाज येत असेल तर नागीण झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. नागीणच्या पुळ्या एका विशिष्ट पद्धतीने येतात. एका मागोमाग एक अशा या पुळ्या येतात. त्या एखाद्या नागाच्या आकाराप्रमाणे वाटतात.

ADVERTISEMENT

2. लघवीला त्रास होणे

नागीणचा त्रास सुरु झाल्यानंतर तुमच्या शरीराची उष्णता अचानक वाढते. त्यामुळे तुमच्या शरीरात इतरही बदल तुम्हाला जाणवायला लागतात. त्यापैकीच एक त्रास म्हणजे लघवीला त्रास होणे. लघवीला होताना तुमची लघवीची जागा दुखू लागते. हा त्रास इतका वाढतो की, तुम्हाला लघवीचा त्रास असह्य होऊन जातो. 

3. ताप येणे

कांजिण्या आल्यानंतर जसा ताप येणं अगदी स्वाभाविक असतं अगदी तसेच नागीण झाल्यानंतर ताप येतो. ताप आल्यामुळे तुम्हाला थकवा येतो. तोंडाची चव निघून जाते. काहीही खाण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे नागीणच्या लक्षणामध्ये ताप येणे हे देखील एक लक्षण आहे. जर तुम्हाला अशा पुळ्या आल्या असतील आणि ताप आला असेल तर ते कांजिण्या किंवा नागीणचे लक्षण आहे.

4. तोंड येणे

शरीरातील उष्णता वाढल्यामुळे होणारा आणखी एक त्रास म्हणजे तोंड येणे. तापात औषधं घेतल्यामुळे तोंड येण्याचा त्रास होते. तोंडाला फोड येतात. नागीणचा आजार असे पर्यंत हे तोंडाचे फोड जात नाही. इतर वेळच्या तुलनेत हा त्रास नागीणच्यावेळी थोडा जास्त असतो.

5. लाल पुरळ येणे

नागीण होण्याचे पहिले लक्षण म्हणजे लाल पुरळ येणे. नागीणची सुरुवात ही पुरळ दिसण्यापासून होत असते. एका विशिष्ट प्रकारच्या पुळ्या तुमच्या शरीरावर येऊ लागतात. या पुळ्यांमध्ये कांजिण्यांच्या पुळ्याप्रमाणे पाणी असते. त्यामुळे जर तुमच्या शरीरावर लाल रंगाच्या पुळ्या आल्या असतील तर तुम्हाला नागीणचा त्रास असू शकतो. 

ADVERTISEMENT

नागीण आजारावर घरगुती उपाय (Naagin Disease Home Remedies In Marathi)

थंड पाण्याचा करा वापर

shutterstock

नागीणवर अनेक घरगुती उपाय आहेत. बहुतेकवेळा नागीण या आजारावर घरीच इलाज केला जातो. नागीणवर रितसर डॉक्टरी इलाज करुन झाल्यानंतर तुम्हाला त्याचा दाह काही काळ जाणवत राहतो त्यामुळे घरच्या घरी काळजी घेण्यासाठी नागीण उपचार जाणून घेऊया.

1. इसेन्शिअल ऑईल

अनेक गोष्टींसाठी इसेंन्शिअल ऑईलचा उपयोग केला जातो. त्वचेच्या अनेक त्रासावर हे तेल रामबाण उपाय असते. तुम्हाला होणारी जळजळ कमी करण्यासाठी तेलाचा उपयोग होतो. पुरळ आलेल्या ठिकाणी इसेन्शिअल ऑईल लावा. तुम्हाला आराम मिळेल. शिवाय ही तेल नैसर्गिक घटकांपासून बनलेली असल्यामुळे तुम्हाला इतर कोणताही त्रास होत नाही.

ADVERTISEMENT

2. थंड पाण्याचा वापर

नागीणमुळे तुमच्या शरीराचा दाह होत असतो. तो दाह कमी करण्यासाठी थंड पाण्याच्या पट्ट्या करुन तुम्ही तुमच्या पुरळांवर ठेवू शकता. त्यामुळे तुम्हाला आराम मिळतो. शिवाय तुमचे पुरळ सुकण्यासही मदत होते. त्यामुळे शक्य असेल तेव्हा नागीण झाल्यानंतर थंड गार पाण्यात पट्ट्या बुडवून तुमच्या पुरळ आलेल्या ठिकाणी ठेवा तुम्हाला नक्कीच आराम मिळेल.

3. होमिओपॅथी गोळ्यांचा डोस

नागीण आल्यानंतर अनेकदा ताप, तोंड फुटणे असे त्रास होतात. अशा त्रासांकडे दुर्लक्ष करुन चालत नाही. अशावेळी तुम्ही होमिओपॅथ डॉक्टरांकडून काही गोळ्यासुद्धा घेऊ शकता. या गोळ्यांनीही तुम्हाला आराम मिळू शकतो.

4. ओटमिल मास्क

त्वचेच्या अनेक समस्यांसाठी ओट्स लावण्याचा सल्ला दिला जातो. तुम्हाला जर जळजळ थांबवायची असेल तर तुम्ही ओट्सचा मास्क तयार करुन पुळ्यांना लावू शकता तुम्हाला आराम मिळेल. जर तुम्ही मास्क काही काळासाठी लावून ठेवला तरी देखील तुम्हाला बरे वाटेल.

5. कॅमोमाईल आणि स्टार्च

कॅमोमाईल तेल आणि स्टार्च यांचा उपयोगही तुम्ही तुमचा दाह कमी करण्यासाठी करु शकता. हल्ली कॅमोमाईल तेल सहज मिळते. त्यामुळे नागीणचा त्रास कमी करण्यासाठी याचा वापर तुम्हाला करता येईल. शिवाय तुमच्या पुळ्या लवकर सुकण्यासाठीही याचा उपयोग होतो.

ADVERTISEMENT

6. थंड पाण्याची आंघोळ

जर तुम्हाला नागीण झाली असेल तर या काळात तुम्ही थंड पाण्याची आंघोळ करणे टाळा कारण त्यामुळे तुम्हाला अधिक जळजळ होऊ शकते. या सगळ्या कालावधीत तुम्ही थंड पाण्याची आंघोळ करा. थंड पाण्यामुळे तुम्हाला थोडा आराम मिळेल. शिवाय तुमच्या पुळ्यांची जळजळ थांबेल.

7. खाण्याचे योग्य नियोजन

नागीण लवकरात लवकर बरी व्हावी असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला तुमचा आहारही योग्य ठेवण्याची गरज असते.अॅसिडीटी वाढेल असे पदार्थ तुम्ही खाऊ शकत नाही. तम्हाला तुमचा आहार अगदी सात्विक ठेवावा लागता. डाळ, भात, भाजी, पोळी, भाकरी असे पदार्थ तुम्ही या कालावधीथ खाऊ शकता. पण तुम्हाला तेलकट पदार्थ खाण्याची अजिबात परवानगी नसते. त्यामुळे तुम्ही जितके चांगले आणि हलके फुलके पदार्थ खा.

8. व्हिटॅमिन्स सप्लिमेंट

कोणताही आजार झाल्यानंतर तुमच्या शरीराती व्हिटॅमिन्सचे प्रमाण कमी झालेले असते. शरीराला आवश्यक असलेले व्हिटॅमिन्स तुम्हाला मिळावे असे वाटत असेल तर तुम्ही व्हिटॅमिन्स सप्लिमेंट घेऊ शकता. पण डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय तुम्ही व्हिटॅमिन्स घेऊ नका. कारण त्यामुळे तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो.

9. प्रतिकार शक्ती वाढवा

प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुम्हाला चांगला आहार आणि चांगल्या दिनचर्येची गरज असते. जर तुम्हाला प्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर तुम्ही चांगल्या आहाराचे सेवन करा. योग्यवेळी झोपा. आठ तासांची झोप पूर्ण करा. शरीराला आवश्यक असलेला व्यायाम करा. त्यामुळे तुम्हाला हलकेही वाटेल. त्यामुळे तुमची उर्जा टिकून राहील.

ADVERTISEMENT

10. औषधांचे करा सेवन

केमिस्टमध्ये तुम्हाला अशी काही औषध मिळतील ज्यामुळे तुम्हाला झालेल्या नागीणचा त्रास कमी होऊ शकतो. अनेक ठिकाणी acyclovir या गोळीचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. यासारखीच अनेक औषधं बाजारात मिळतात. पण तुम्ही डॉक्टरांचा योग्य सल्ला घेऊन याचे सेवन करु शकता.

तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)

नागीणचा विषाणू

shutterstock

1- नागीण रोग बरा होऊ शकतो का?
हो, नागीण हा आजार अगदी100% बरा होऊ शकतो. पण हा आजार बरा होण्याचा प्रत्येकाचा कालावधी हा वेगळा असू शकतो. नागीणच्या पुळ्या कमी झाल्यानंतरही त्यांचा दाह काही काळ जाणवत राहतो. त्यामुळे तुम्हाला साधारण पुढील वर्षभर कळजी घेणे गरजेचे असते.  त्यामुळे नागीण बरा न होण्याबाबत जर तुमच्या मनात काही गैरसमज असतील तर ते दूर करा. कारण योग्य औषधांचा वापर करुन तुम्ही नागीणवर उपचार करु शकता

ADVERTISEMENT

2- नागीण शारिरीक संबधांमुळे पसरु शकतो का?
एका अभ्यासानुसार नागीण ही शारिरीक संबंधांमुळे पसरत नाही हे सिद्ध झाले आहे. पण कुटुंबात कोणाला नागीण झाली असेल तर हा पसरण्याची शक्यता असते. लहान मुलांना याची लागण झाली तर त्यांना कांजिण्या होण्याची शक्यता असते. म्हणून कुटुंबात असताना याची योग्य काळजी घेणे गरजेचे असते. 

3- नागीण होण्याचे महत्वाचे कारण काय आहे?
लहान वयात सगळ्यांनाच कांजिण्यांचा त्रास होतो. कांजिण्या पूर्ण बऱ्या झाल्या नाहीत तर पुढे जाऊन तुम्हाला नागीणचा त्रास होऊ शकतो कांजिण्या आणि नागीण होण्यामागे एकच जीवाणू असतो. तुमच्या पाठीच्या कण्यामध्ये हा जीवाणू असतो. त्यामुळे याचे मुख्य कारण हा जीवाणू आहे. त्यालाच हर्पस असे म्हटले जाते. 

आता जर तुम्हाला अशा प्रकारचा त्रास होत असेल तर तुम्ही अशी काळजी घेऊ शकता. 

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे  20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

ADVERTISEMENT
12 Mar 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT