ADVERTISEMENT
home / निरोगी जीवन
Hiradi Sujane Upay In Marathi

हिरड्यांना सूज असेल तर जाणून घ्या हिरडी सुजणे घरगुती उपाय (Hiradi Sujane Upay In Marathi)

दातांच्या समस्या या प्रत्येकाला कधी ना कधी त्रासदायक ठरतातच. त्यातल्या त्यात हिरड्या सूजणे ही समस्या तर खूपच त्रासदायक असते. जसं ब्रश करताना दातातून रक्त येणं किंवा हिरडी सुजणे असा त्रास असल्यास तुम्हाला हिरड्यांचे आजार जसं जिंजीवायटीस किंवा पेरिओडाँटायटिस ही दातांशी निगडीत समस्या होऊ शकते. ही समस्या किंवा रोग हा बरेचदा बॅक्टेरियाच्या संसर्गाने होतो. जर यावर वेळीच उपचार केले नाहीतर हे इंफेक्शन वाढून गंभीर परिणाम होऊ शकतात. कारण आपलं आरोग्य हे आपल्या डाएटवर अवलंबून आहे. जर दात निरोगी नसले तर त्याचा थेट परिणाम तुमच्या रोजच्या खाण्यापिण्यावर होऊ शकतो. त्यामुळे या समस्येची वेळीच काळजी घेतलेली कधीही चांगली ठरेल.

हिरडी सुजण्याची कारणे (Causes Of Swollen Gums)

 

हिरड्या सूजणे ही दातांबाबतची बहुतेकदा उद्भवणारी समस्या आहे. सर्वात आधी जाणून घेऊया हिरड्यांचे आजार या समस्येमागची कारणं

  • टार्टर किंवा प्लाक दातांवर जमल्याने हिरड्यांना सूज येते. ज्याला जिंजीवायटीस असं म्हणतात. 
  • जिंजीवायटीसचं इंफेक्शन वाढलं तर हिरड्यांना आलेली सूज वाढते. याला पेरिओडाँटायटिस असं म्हणतात. 
  • व्हायरल किंवा फंगल इंफेक्शन
  • दात किंवा कवळी लावल्यानंतर सूज येणे
  • गर्भावस्थेदरम्यान 
  • काही पदार्थ खाल्ल्यामुळे होणाऱ्या किंवा दातांच्या अलर्जीमुळे 
  • हिरड्यांच्या अलर्जीमुळे

Causes of Swollen Gum

हिरडी सुजण्याची लक्षणे (Symptoms Of Swollen Gums)

हिरड्यांना सूज आली आहे हे कसे ओळखावे. तर खालील लक्षणं आढळल्यास हिरड्यांचे आजार झालं असल्याचं खालील लक्षणांवरून समजेल.

ADVERTISEMENT
  • हिरड्यांमधून रक्त येणं
  • हिरड्या लाल होणं आणि सूज येणं
  • हिरड्यांमध्ये वेदना होणं
  • दातांच्यामध्ये फटी होणं
  • श्वासातून दुर्गंधी येणं

लवंग खाण्याचे फायदे काय आहे जाणून घ्या

हिरडी सुजणे घरगुती उपाय (Home Remedies For Swollen Gums)

समस्या कोणतीही असो आपण सुरूवातीला त्यावर घरगुती उपाय नक्कीच करून पाहतो. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी हिरडे सुजणे उपाय देत आहोत. ज्यामुळे तुमची सूजलेल्या हिरड्यांच्या समस्येपासून सुटका होईल.

Hiradi Sujane Upay In Marathi

मीठाचं पाणी

साहित्य – एक चमचा मीठ, एक ग्लास कोमट पाणी  

ADVERTISEMENT

कसा कराल वापर – कोमट पाण्यात मीठ घालून त्या पाण्याने गुळण्या करा. हा उपाय सकाळ आणि संध्याकाळ दोनदा करावा. याशिवाय तुम्ही जेवल्यानंतर काही वेळानेही हा उपाय करू शकता. 

असा होतो उपयोग – हा हिरड्यांना सूज आल्यावर करण्यात येणारा हमखास उपाय आहे. मीठाच्या पाण्याने तोंडाचा पीएच स्तर संतुलित होतो आणि हिरड्या सूजणे समस्येपासून आराम मिळतो. याशिवाय मीठातल्या अँटी इंफ्लमेट्ररी गुणांमुळे सूज कमी होण्यास मदत होते. पण लक्षात घ्या उपाय तात्पुरता आहे.

वाचा – सी सॉल्ट स्क्रबचे फायदे

लवंग तेल

साहित्य – दोन ते तीन थेंब लवंग तेल

ADVERTISEMENT

कसा कराल वापर – सूजलेल्या हिरड्यांवर लवंग तेल लावून हळूवार मसाज करा. काही वेळ तसंच ठेवा. हिरड्यांची सूज आणि वेदनेपासून आराम मिळेल. तुम्ही लवंग तेलासोबत काळ्या मिरीचाही वापर करू शकता. काही वेळा लवंग दाताखाली धरण्याचाही सल्ला दिला जातो. तुम्ही हा उपाय दिवसातून दोन ते तीन वेळा करू शकता. 

असा होतो उपयोग – हिरड्यांची सूज कमी होण्यासाठी वर्षानुवर्ष लवंग आणि लवंग तेलाचा वापर केला जात आहे. लवंगमधील अँटीमायक्रोबियल गुणांमुळे ते इंफेक्शनपासून हिरड्यांचा बचाव करतात. दातांच्या दुर्गंधीपासूनही लवंग दाताखाली धरल्याने फरक पडतो.

आलं

साहित्य – आल्याचा छोटा तुकडा, अर्धा चमचा मीठ

कसा कराल वापर – आलं किसून घ्या आणि त्यात मीठ घालून पेस्ट करा. ही पेस्ट सूज आलेल्या हिरड्यांवर लावा आणि 10-12 मिनिंट तसंच ठेवा. मग चूळ भरा. हा उपाय तुम्हाला दिवसातून दोन ते तीन वेळा करता येईल.  

ADVERTISEMENT

असा होतो उपयोग – आल्यातील अँटी इंफ्लेमेट्री आणि अँटी ऑक्सीडंट्स गुणांमुळे हिरड्यांची सूज कमी होण्यास मदत होते.

बेकिंग सोडा

साहित्य – एक चमचा बेकिंग सोडा , एक चिमूट हळद

कसा कराल वापर – हळद आणि बेकिंग सोडा मिक्स करून त्याने हिरड्यांना मालीश करा. मग चूळ भरा. बेकिंग सोड्याने ब्रश केल्यानेही हिरड्यांची सूज कमी होते. हा उपाय तुम्ही सकाळ आणि संध्याकाळी एकदा असा करू शकता. 

असा होतो उपयोग – हिरड्यांच्या समस्येपासून आराम मिळावा म्हणून अनेकजण बेकिंग सोड्याचा घरगुती उपचार म्हणून वापर करतात. यामधील अँटी बॅक्टेरियल आणि अँटीसेप्टीक गुणांमुळे हिरड्यांना झालेलं इंफेक्शन टाळता येतं. तसंच हिरड्यांची सूजही कमी होते.

ADVERTISEMENT

वाचा – बेकिंग सोड्याचे हे 8 फायदे

लिंबाचा रस

साहित्य – एक चमच लिंबाचा रस, एक ग्लास कोमट पाणी, दोन थेंब गुलाबपाणी

कसा कराल वापर – कोमट पाण्यात दोन्ही घटक मिक्स करा आणि त्या पाण्याने गुळण्या करा. जोपर्यंत आराम पडत नाही तोपर्यत रोज हा उपाय करू शकता. 

असा होतो उपयोग – लिंबातील अँटीमायक्रोबियल गुणांमुळे जे इंफेक्शन निर्माण करणारे किटाणु आहेत ते मारले जातात. जे तुमच्या हिरड्यांमध्ये सूज निर्माण करतात. याशिवाय या उपायाने तुमच्या तोंडाचा पीएच स्तरही संतुलित होतो.

ADVERTISEMENT

इसेंशियल ऑईल

साहित्य – दोन थेंब कॅमोमाईल इंसेशियल ऑईल, दोन थेंब टी-ट्री इंसेशियल ऑईल, दोन थेंब पेपरमिंट इंसेशियल ऑईल. 

कसा कराल वापर – सर्व तेल एका ग्लास पाण्यात मिक्स करा. हे पाणी तोंडात धरा आणि दोन-तीन मिनिटं तसंच ठेवा. मग पाणी तोंडातून बाहेर टाका आणि चूळ भरा. ब्रश करतानाही टूथपेस्टवर काही थेंब टी-ट्री ऑईल घेऊन ब्रश केल्यास हिरड्यांची सूज कमी होईल. याचा वापर तुम्ही माऊथवॉश म्हणूनही दिवसातून दोनदा करू शकता. 

असा होतो उपयोग – कॅमोमाईल, टी ट्री आणि पेपरमिंट तेलाने हिरड्यांची सूज आणि त्यामुळे होणाऱ्या वेदना कमी होतील. टी ट्री ऑईल आणि पेपरमिंट ऑईलमधील अँटीमायक्रोबियल गुण असतात आणि कॅमोमाईल हिरड्यांची सूज कमी करते. सूज आणि वेदना दोन्ही दूर होतात.

मेंदीची पानं

साहित्य – मेंदीची काही पानं, एक ग्लास पाणी 

ADVERTISEMENT

कसा कराल वापर – मेंदीची पानं 15 मिनिटं पाण्यात उकळून घ्या. हिरड्यांची सूज कमी होण्यासाठी या पाण्याने गुळण्या करा. हा उपाय दिवसातून दोनदा करा. 

असा होतो उपयोग – मेंदीच्या पानातील अँटीबायोटिक गुणांमुळे तोंडातील हानीकारक बॅक्टेरिया दूर होण्यास मदत होते.

कॅस्टर बिया तेल

साहित्य – एरंडेल तेल, एक कापूर वडी 

कसा कराल वापर – कापूर वाटून ते एरंडेल तेलात मिक्स करा आणि पेस्ट बनवून घ्या. या पेस्टने हिरड्यांना मालीश करा. ही पेस्ट हिरड्यांवर दोन ते तीन मिनिटं लावून ठेवा आणि मग कोमट पाण्याने तोंड स्वच्छ धुवा. हा उपाय दिवसातून एकदा करा. 

ADVERTISEMENT

असा होतो उपयोग – हा उपचार केल्याने हिरड्यांची सूज कमी होते. कापरातील एनाल्जेसिक गुणांमुळे वेदना कमी होतात. तर एरंडेल तेलातील अँटी-इंफ्लेमट्रीगुणामुळे सूज कमी होते.

बाभळीचं साल

साहित्य – बाभळीच्या सालीचा एक तुकडा, एक ग्लास पाणी 

कसा कराल वापर – बाभळीच्या सालीचा तुकडा पाण्यात किमात पाच ते सात मिनिटं उकळवा. हे पाणी तुम्ही माऊथवॉश म्हणूनही वापरू शकता. या पाण्याने तुम्ही दिवसातून तीन ते चार वेळा चूळ भरा. 

असा होतो उपयोग – हिरड्यांची सूज कमी व्हावी म्हणून हा उपाय अनेक वर्षांपासून वापरला जात आहे. आयुर्वेदानुसार दात मजबूत आणि निरोगी राहण्यासाठी बाभळीचं साल चावण्याचा उल्लेख आहे. बाभळीच्या सालात अँटीमायक्रोबियल गुण असतात. जे तोंडातील बॅक्टेरियांचा नाश करतात. हे हिरड्यांची सूज कमी करण्यातही मदत करतं.

ADVERTISEMENT

कोरफड जेल

साहित्य – कोरफडाचा गर 

कसा कराल वापर – कोरफडाचा गर हिरड्यांवर लावावा. जितका वेळ शक्य असेल तितका वेळ हा गर हिरड्यांवर राहू द्या. यामुळे तुम्हाला नक्कीच आराम मिळेल. तुम्ही कोरफड जेलने गुळण्याही करू शकता. हा उपाय दिवसातून दोनदा करता येईल. पण लक्षात घ्या कोरफड चवीला कडवट असते. 

असा होतो उपयोग – कोरफड हे बहुगुणी आहे. यातील अँटीबॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेट्री आणि अँटीऑक्सीडंट्स गुणामुळे हिरड्यांची सूज कमी होते आणि हानीकारक बॅक्टेरियाचा नाश होतो.

हळद

साहित्य – एक चमचा हळद पावडर, एक चमचा मीठ, एक चमचा मोहरीचं तेल. 

ADVERTISEMENT

कसा कराल वापर – हे सर्व मिक्स करून त्याची पेस्ट बनवा आणि ती हिरड्यांवर लावा. किमान 10-12 मिनिटं तसंच ठेवा आणि मग पाण्याने चूळ भरा. हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोनदा करू शकता. 

असा होतो उपयोग – हळदीतले अँटीमायक्रोबियल गुण सूज कमी करतात आणि हिरड्या लवकर बऱ्या करतात.

एपल सायडर व्हिनेगर

साहित्य – एपल सायडर व्हिनेगर एक चमचा, एक ग्लास पाणी

कसा कराल वापर – एक ग्लास पाण्यात एपल सायडर व्हिनेगर घाला आणि त्या पाण्याने चूळ भरा. ही प्रक्रिया दिवसातून दोन ते तीन वेळा करा. 

ADVERTISEMENT

असा होतो उपयोग – एपल सायडर व्हिनेगरमध्ये हलक्या प्रमाणात एसिड असतं जे तुमच्या तोंडाचा पीएच स्तर संतुलित करतं आणि हिरड्यांची सूज कमी करतं.

व्हॅनिला एक्स्ट्र्रॅक्ट

साहित्य – 1-2 चमचे व्हॅनिला एक्सट्रॅक्ट 

कसा कराल वापर – बोटाच्या मदतीने व्हॅनिला एक्सट्रॅक्ट हिरड्यांवर लावा. तसंच हिरड्यांवर लावून ठेवा. हा उपाय दिवसातून दोनदा करता येईल. 

असा होतो उपयोग – व्हॅनिला एक्सट्रॅक्टमध्ये अँटीसेप्टिक आणि एनाल्जेसिक गुण असतात. जे हिरड्या आणि दातांच्या वेदनेपासून मुक्ती देतात.

ADVERTISEMENT

सैंधव मीठ

साहित्य – सैंधव मीठ एक चमचा, एक ग्लास कोमट पाणी. 

कसा कराल वापर – सैंधव मीठ एक ग्लास पाण्यात घालून गुळण्या करा. रोज सकाळी आणि रात्री झोपण्याआधी हा उपाय तुम्ही करू शकता.  

असा होतो उपयोग – सैंधव मीठाने हिरड्यांचं दुखणं कमी होईल आणि सूजही कमी होण्यास मदत होईल. यामधील अँटीबॅक्टेरियल गुणांमुळे इंफेक्शनही वाढत नाही. फक्त लक्षात घ्या की, सैंधव मीठाचं पाणी पोटात जाता कामा नये.

वाचा – जाणून घ्या दात पांढरे करण्याचे उपाय

ADVERTISEMENT

हिरड्या मजबूत होण्यासाठी उपाय (Tips To Keep Your Gums Healthy)

Hiradi Sujane Upay In Marathi

जसं आपण दात दुखने घरगुती उपाय करतो. तसंच दात आणि हिरड्या निरोगी राहण्यासाठी तुम्ही पुढील काळजी घेतल्यास दातांच्या समस्या उद्भवणार नाहीत. तसंच तुमचं डेटींस्टकडे जाणंही वाचेल व तोंडावरील हास्यही कायम राहील. 

  • भरपूर पाणी प्या. कारण पाणी हे नैसर्गिक माऊथवॉश आहे. जे तुमचं तोंड वेळोवेळी स्वच्छ ठेवतं. तसंच यामुळे दातांवर चहा-कॉफी किंवा इतर पदार्थांचे डागही पडत नाहीत. 
  • आहारात करा फळांचा समावेश. फळांमधील एंजाईम आणि दुसरी आरोग्यदायी तत्त्वं यामुळे दात नैसर्गिक पद्धतीने स्वच्छ राहतात. खासकरून यामुळे पुरेश्या प्रमाणात व्हिटॅमीन सीसुद्धा मिळते. 
  • शुगर-फ्री च्युइंगमचा वापर करा. तुम्ही शुगर-फ्री च्युइंगम वापरल्यास जास्त लाळ तयार होऊल तोंडातील प्लाक एसिड स्वच्छ होण्याच काम होईल. शक्य असेल तेव्हा गोड पदार्थांचं सेवन कमी करा. 
  • स्ट्रॉ चा वापर करा. शक्य असल्यास पेय पदार्थ स्ट्रॉच्या मदतीने प्या. यामुळे दातांवर त्यांचा थेट परिणाम होणार नाही. 
  • योग्य ब्रशचा वापर करा. ब्रश करण्यासाठी नेहमी मऊ ब्रशचा वापर करा. ब्रश करतानासुद्धा हळूवार आणि हलक्या हाताने ब्रश करा. तसंच टंग क्लीनरचा वापर करून जीभही स्वच्छ ठेवा. कारण जीभेवर बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता असते. ज्यामुळे तोंडाला दुर्गंधी येऊ शकते. 

वाचा – तुमचे smile खुलवणाऱ्या या नव्या उपचारपद्धती

हिरड्यांच्या समस्यांबाबत विचारण्यात येणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरं (FAQ’s)

1. सूजलेल्या हिरड्यांसाठी सर्वोत्तम उपाय काय?

ADVERTISEMENT

तुम्ही वरील सांगितलेल्या घरगुती उपायांचा वापर सूजलेल्या हिरड्या किंवा हिरड्या मजबूत करण्यासाठी करू शकता. तसंच हिरड्या दुखत असल्यास गरम पाण्यात मीठ घालून गुळण्या करणे, मऊ ब्रिसल्स असलेला टूथब्रश वापरणे किंवा पेनकिलर घेणे हे काही प्राथमिक उपाय तुम्ही करू शकता. या वेदना सहन न झाल्यास वेळीच डेटींस्टला भेट द्या. 

2. हिरड्यांची सूज कमी होण्यासाठी साधारण किती वेळ लागतो?

हे तुम्ही दातांची आणि हिरड्यांची काळजी कशी घेता त्यावर अवलंबून आहे. जर तुम्ही नीट काळजी घेतली तर ही आरोग्य समस्या फक्त दोन आठवड्यात बरी होईल. पण त्यासाठी योग्य ते घरगुती किंवा डॉक्टरांकडील उपचार, योग्य आहार आणि काळजीची गरज आहे. 

3. तणावामुळेही हिरड्या सूजण्याचा त्रास होऊ शकतो का?

ADVERTISEMENT

जास्त प्रमाणात तणाव असल्यास तुमच्या शरीरात जळजळ किंवा शरीराच्या प्रतिकार शक्तीवर त्याचा नक्कीच परिणाम होऊ शकतो. परिणामी हिरड्या सूजणं किंवा दातातून रक्त येणं यासारख्या समस्या उद्भवू शकतात. 

4. माऊथवॉशने ही सूजलेल्या हिरड्यांपासून आराम मिळतो का?

माऊथवॉश हे अँटीसेप्टीकप्रमाणेच काम करते. त्यामुळे जर तुम्ही दिवसातून दोनदा माऊथवॉशने चूळ भरणे आणि व्यवस्थित दात घासणे या सवयी ठेवल्यास दातांचं आरोग्य नक्कीच चांगलं राहील. कारण माऊथवॉशमध्ये दातांमधील किटाणू मारण्याची क्षमता असते. ज्यामुळे हिरड्या दुखणे किंवा दातांच्या इतर समस्या उद्भवत नाही.

देखील वाचा – 
पिवळ्या दातांनी हैराण असलात तर करा 8 घरगुती उपाय

ADVERTISEMENT

 

17 Mar 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT