ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
घरीच बनवा केमिकल फ्री आणि सुगंधी टाल्कम पावडर

घरीच बनवा केमिकल फ्री आणि सुगंधी टाल्कम पावडर

शरीरातील दुर्गंधी आणि अतिरिक्त घाम शोषून घेण्यासाठी बॉडी पावडर अथवा टाल्कम पावडर हा स्किन केअर (skin care) चा एक भागच आहे. काही जण आंघोळ झाल्या झाल्याच टाल्कम पावडर लावतात. कोणत्याही डिओड्रंट अथवा परफ्यूमपेक्षा हा नक्कीच चांगला पर्याय आहे.  पण बाहेर मिळणाऱ्या टाल्कम पावडर हा केमिकलयुक्त असतात. पण टाल्कम पावडर या तुम्ही कोणत्याही क्षणी वापरू शकत नाही. दिवसभर तुम्हाला त्याचा वापर करता येत नाही. बाजारमध्ये मिळणाऱ्या अधिकांश टाल्कम पावडरमध्ये केमिकल्स असतात. जे आपल्या त्वचेला हानी पोहचवण्याचं काम करतात. त्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी सुगंधी टाल्कम पावडर तयार करू शकता. आश्चर्य वाटलं ना? पण हे कठीण काम नाही. तुम्ही घरच्या घरी अगदी चांगली टाल्कम पावडर तयार करून त्याचा वापर करू शकता. 

 

होममेड टाल्कम पावडर (Homemade talcum powder)

शरीरावर पावडरचा उपयोग हा त्वचा कोरडी ठेवण्यासाठी करण्यात येतो. घरी बनलेली टाल्कम पावडर ही आपल्या आरोग्यासाठीही अधिक फायदेशीर ठरते. या पावडरमध्ये नैसर्गिक वस्तूंचा वापर करण्यात येतो. ज्यामध्ये मॉईस्चर शोषून घेण्याची क्षमता असते. यामध्ये  आरारोट पावडर, मुलतानी माती आणि गुलाबाच्या पाकळ्यांची पावडर याचा वापर करण्यात येतो. तसंच या सर्व पदार्थांमध्ये त्वचेला होणाऱ्या इन्फेक्शनपासून वाचवण्यासाठी अँटिबॅक्टेरियादेखील असतात. आता या पावडर घरच्या घरी कशी बनवायची आणि त्यात कोणते साहित्य वापरायचे ते आपण जाणून घेऊया. 

गुलाबाची पावडर

ADVERTISEMENT

Shutterstock

ज्या टाल्कम पावडरमध्ये गुलाब वापरण्यात येतो त्यामध्ये अधिक सुगंध असतो. हिवाळ्यात जेव्हा गुलाब मिळतात तेव्हा तुम्ही त्याच्या पाकळ्या सुकवून त्याची पावडर बनवून घ्या. त्यासाठी तुम्हाला या पाकळ्या अतिशय बारीक वाटून घ्याव्या लागतील. तुम्हाला हवं तर आपल्या पावडरमध्ये तुम्ही कॅमेलिया तेलाचादेखील वापर करू शकता. पावडरमध्ये कोणत्याही तऱ्हेचे तेल मिसळायचे हे ऐकून तुम्हाला थोडं विचित्र वाटू शकतं. पण यामुळे त्वचेवर ही पावडर अधिक चांगला परिणाम मिळवून देते. ही पावडर त्वचेमधील अतिरिक्त तेल शोषून घेऊन त्वचा अधिक मुलायम बनवते. 

मुलतानी माती पावडर

Shutterstock

ADVERTISEMENT

टाल्कम पावडर बनवण्याच्या रेसिपीमध्ये तुम्ही मुलतानी मातीचा वापरही करून घेऊ शकता. या मातीमुळे त्वचेमधील अतिरिक्त तेल शोषून घेतलं जातं. त्यामुळेच पावडर बनवण्यासाठी मुलतानी मातीचा वेगवेगळ्या तऱ्हेने उपयोग करून घेतला जातो. पण हे बनवणं थोडं कठीण आहे.  

अरारोटची पावडर

अरारोट स्टार्च अथवा अरारोट पावडर या रेसिपीमध्ये समाविष्ट करून घेता येते. ग्लूटन फ्री वाली आरारोट पावडर यासाठी उत्तम पर्याय आहे. यामुळे मॉईस्चर लवकर शोषून घेतलं जातं आणि त्वचा अधिक मुलायम आणि रेशमी बनते.  

स्क्रबिंग करायची योग्य वेळ काय आहे: त्वचेची काळजी आणि रूटीनसंबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या

पावडर बनवण्यासाठी लागणारे साहित्य

ADVERTISEMENT

Shutterstock

4 चमचे अरारोट पावडर

1 चमचा गुलाब पावडर

1 चमचा मुलतानी माती

ADVERTISEMENT

1 चमचा कॅमेलिया बियांचे तेल

3 थेंब एसेन्शियल तेल

1 लहान वाटी किप जार

नवजात बाळाच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी टिप्स

ADVERTISEMENT

तयार करण्याची पद्धत

सर्वात पहिले गुलाबाच्या पाकळ्या एकत्र सुकवा. त्यानंतर मिक्सरमधून बारीक पावडर करा. एका लहान भांड्यात ही गुलाबाची पावडर, त्यात मुलतानी माती आणि अरारोट पावडर नीट मिक्स करा. आता एका लहान कंटेनरमध्ये कॅमेलिया बियांचे तेल घ्या आणि त्यात तीन थेंब एसेन्शियल तेल घाला आणि त्यात हे पावडरचे मिश्रण मिक्स करा. त्यानंतर फोकच्या मदतीने तुम्ही व्यवस्थित मिक्स करा. यामध्ये गुठळी राहता कामा नये. त्यानंतर किपच्या सहाय्याने पावडर एका जारमध्ये नीट भरा. आता तुमची पावडर तयार आहे. मध्यम तापमानात ही पावडर ठेवा. 

घरच्या घरी फेसपॅक करण्याआधी तयार करा या फेसपॅक पावडर

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

07 Mar 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT