14 मार्च 2020 चं राशीफळ, सिंह राशीसाठी शुभकाळ

14 मार्च 2020 चं  राशीफळ, सिंह राशीसाठी शुभकाळ

मेष -  दिवसभर फ्रेश वाटेल

आज जीवनशैलीत केलेल्या बदलांमुळे तुमचे आरोग्य चांगले राहील. दिवसभर फ्रेश वाटेल. जोडीदाराशी नातेसंबध मजबूत होतील. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल असेल. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या दूर होतील.  


कुंभ -  विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळेल

आज विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ मिळणार आहे. मार्केटिंग क्षेत्रातील लोकांना यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायातील नवीन योजनांमुळे वातावरण उत्साहाचे असेल. सामाजिक मानसन्मान आणि धनसंपत्तीत वाढ होईल. 


मीन- छोट्या चुकीमुळे नुकसान होण्याची शक्यता

आज कामाच्या ठिकाणी एखादी छोटीशी चुक तुमच्यासाठी नुकसानकारक असू शकते. वादविवादांपासून सावध राहा. व्यवसायात समस्या येण्याची शक्यता आहे. एखादी चांगली बातमी कानी पडेल. जोडीदाराच्या भावनांचा आदर राखा. 


वृषभ -  प्रेमात त्रिकोण निर्माण होण्याची शक्यता
आज तुमच्या प्रेमप्रकरणात त्रिकोण निर्माण होण्याची शक्यता आहे. एखाद्या परक्या व्यक्तीमुळे घरात वाद होण्याची शक्यता आहे. व्यवसायात भागिदारीने तणाव वाढण्याची शक्यता आहे. रचनात्मक कार्यात वाढ होणार आहे. 


मिथुन -  नवीन सुखसाधनांमध्ये वाढ होईल

आज तुम्हाला रोजगाराची नवीन संधी मिळणार आहे. कुटुंबातील सुखसाधनांमध्ये वाढ होईल. मित्रांकडून भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. धार्मिक अथवा सामाजिक कार्यातील प्रतिष्ठा वाढणार आहे. राजकारणातील सक्रियता वाढेल. प्रेमसंबंधातील कलह वाढणार आहेत. 

कर्क - मानसिक अशांतता जाणवेल

आज तुम्हाला भावनिक समस्या जाणवणार आहेत. मानसिक अशांतता वाढणार आहे. वादविवादांपासून दूर राहा. राजकारणातील रस वाढणार आहे. वाहन चालवताना सावध राहा. 


सिंह - कौटुंबिक वातावरण सुखाचे असेल

आज तुमचे जुने नातेसंबंध पुन्हा भावनिक होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण आनंदाचे आणि उत्साहाचे असेल. जुने मित्रांच्या सहकार्यांने बिघडलेली कामे पुन्हा पूर्ववत होतील. आर्थिक स्थिती मजबूत असेल. 


कन्या - नोकरीत बदल होण्याची शक्यता

आज तुमच्या कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचा तणाव वाढणार आहे. नोकरीत बदल करावा लागण्याची शक्यता आहे. व्यवसायात मेहनतीचे फळ उशीरा मिळेल. वादविवादांपासून दूर राहा. मित्रांच्या सहकार्यांने कामे मार्गी लागतील. वाहन चालवताना सावध राहा. 


तूळ - दिलेले पैसे परत मिळतील

कला आणि सिनेक्षेत्रातील लोकांना चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात फायदा  होईल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. प्रवासाला जाण्याचा योग आहे. 


वृश्चिक -  विद्यार्थ्यांना जास्त मेहनत घ्यावी लागेल

आज तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा खराब होऊ शकते. झालेली कामे अर्धवट राहतील. कौटुंबिक वातावरण आनंदाचे असेल. जोडीदारासोबत नाते मजबूत होईल. 


धनु -  आरोग्य बिघडणार आहे

आज तुमचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. आहाराबाबत सावध राहा. व्यवसायात समाधानकारक वातावरण असेल. कामाच्या ठिकाणी समस्या  येतील. कौटुंबिक खर्च वाढणार आहे. व्यवहारात सावध राहा. 

 

मकर -प्रेमासाठी सुखाचा काळ असेल

आज तुमच्यासाठी दिवस प्रेमाचा असेल. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळणार आहे. विरोधक नमणार आहेत. सामाजिक प्रतिष्ठा आणि धनवृद्धीत वाढ होणार आहे. व्यवहार करताना सावध राहा.