16 मार्च 2020चं राशीफळ, सिंह राशीच्या सुखसाधनांमध्ये वाढ

16 मार्च 2020चं राशीफळ, सिंह राशीच्या सुखसाधनांमध्ये वाढ

मेष -  विद्यार्थ्यांना यश मिळेल

विद्यार्थ्यांना एखाद्या नव्या प्रयोगात यश मिळेल. बिघडलेली कामे पुन्हा पूर्ववत होतील. एखाद्या अभियानात यश मिळेल. मुलांकडून चिंता वाढण्याची शक्यता आहे. गुंतवणूकीसाठी काळ अनुकूल नाही. 


कुंभ -  पाठीचे दुखणे कमी होईल

आज तुम्हाला एखाद्या अज्ञात भिती सतावू शकते. पाठीचे दुखणे जाणवण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना परिक्षेत यश मिळेल. जुन्या समस्या सुटतील. आर्थिक स्थिती चांगली असेल. 


मीन- नवीन प्रेमसंबंध निर्माण होतील

आज तुमचे नवीन प्रेमसंबंध निर्माण होण्याची शक्यता आहे. एखाद्या मंगल कार्यात सहभागी व्हाल. व्यवसायात प्रगती होईल. मित्रांसोबत प्रवासाला जाल. वादविवाद मिटणार आहेत. 

 

वृषभ - आर्थिक नुकसान होणार नाही याची काळजी घ्या 

आज कोणतेही आर्थिक नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. व्यावसायिक कामे रद्द होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. प्रेमसंबंधात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. विरोधकांपासून सावध राहा.


मिथुन - आरोग्य उत्तम असेल

आज तुमची तब्येत चांगली असेल. उत्पन्न आणि खर्च याबाबत सावध रहा. राजकारणात यश मिळेल. आत्मविश्वास वाढेल. जोडीदाराची भावनिक साथ मिळेल.


कर्क - कौटुंबिक समस्या सुटणार आहेत

मुलांकडून समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक समस्यांमुळे स्वभाव चिडचिडा होईल. कामाच्या ठिकाणी दुर्लक्षपणा करू नका. आत्मविश्वास कमी जाणवेल. योग आणि अध्यात्मातील रस वाढणार आहे.


सिंह - सुख साधनांमध्ये वाढ होईल

आज तुम्हाला धनसंपत्तीबाबत चांगली बातमी समजेल. कौटुंबिक सुख साधनांमध्ये वाढ होईल. सामाजिक मानसन्मान आणि भेटवस्तूंमध्ये वाढ होईल. रखडलेली कामे पूर्ण होतील. नवीन योजना यशस्वी होणार आहेत. 


कन्या - तणाव वाढणार आहे

आज मुलांबाबत चिंता सतावू शकते. तणाव वाढण्याची शक्यता आहे. व्यवसायात चढ - उतार येण्याची शक्यता आहे. राजकारणात व्यस्त राहण्याची शक्यता आहे. सामाजिक प्रतिष्ठा आणि भेटवस्तूंमध्ये वाढ होणार आहे. 


तूळ - जोडीदासोबत चांगला काळ जाईल

एखाद्या व्यक्तीकडून आकर्षक भेटवस्तू मिळेल. जोडीदारासोबत वेळ चांगला जाईल. एखाद्या कामात कौशल्य दाखवून स्वतःची प्रतिष्ठा वाढवाल. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांची  साथ चांगली मिळेल. 


वृश्चिक -  विद्यार्थ्यांना करिअरची चांगली संधी

आज तरूणांना करिअरची चांगली संधी मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढणार आहेत. नकारात्मक विचारांचा प्रभाव पडेल. देणी घेणी सावधपणे करा. मित्र भेटतील.

 

धनु - सुख साधनांंमध्ये वाढ होईल

आज तुम्हाला पैशांबाबत एखादी चांगली बातमी मिळेल. कौटुंबिक सुखसाधनांमध्ये वाढ होईल. सामाजिक मानसन्मान आणि भेटवस्तू वाढतील. रखडलेली कामे पूर्ण होतील. नवीन योजना आखणार आहात. 


मकर - व्यवसायात चढ उतार येतील

आज विद्यार्थ्यांनी त्यांचा वेळ व्यर्थ घालवू नये. व्यवसायात चढ उतार येण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी एखाद्या अधिकाऱ्याची चांगली साथ मिळेल. देणी घेणी सावधपणे करा. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत. 

हे ही वाचा -

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

अधिक वाचा -

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

राशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव

तुम्ही 'या' राशीचे असाल, तर तुम्ही आहात भाग्यवान