17 मार्च 2020 चं राशीफळ, कन्या राशीला होणार धनलाभ

17 मार्च 2020 चं राशीफळ, कन्या राशीला होणार धनलाभ

मेष - नातेसंबंध सुधारतील

आज तुमच्या  चांगल्या स्वभावामुळे तुमचे नातेसंबध चांगले होतील. जोडीदारासोबत असलेले मतभेद कमी होण्याची शक्यता आहे. आनंदी आणि फ्रेश वाटेल. कामाच्या ठिकाणी पदोन्नतीची शक्यता आहे. प्रवासाला जाण्याचा योग आहे. 


कुंभ -  विद्यार्थ्यांचे मन अशांत राहील

आज कामाच्या ठिकाणी समस्या येण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचे मन निराश राहील. अचानक आर्थिक लाभ होईल. मुलांच्या तब्येतीची काळजी घ्या. वादविवाद करणे टाळा. 


मीन- जोडीदाराला इंन्फेक्शन होण्याची शक्यता 

आज तुम्हाला जोडीदाराची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. इन्फेक्शन होण्याचा धोका आहे. नवीन योजना सफळ होतील. भविष्यात लाभ मिळेल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याची संधी मिळेल. 


वृषभ - व्यवसायासाठी नवीन पर्याय मिळण्याची शक्यता 

आज तुम्हाला व्यवसायात नवीन पर्याय समोर येण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढणार आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासात रस वाटेल. एखादी खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंध मजबूत होतील.


मिथुन - आर्थिक स्थिती चांगली असेल

आज तुमचा खर्च आणि उत्पन्नात समतोल बिघडण्याची शक्यता आहे. घाईघाईत कोणतेही काम करू नका. विरोधकांपासून सावध राहा. रचनात्मक कार्यात प्रगती होण्याची शक्यता आहे. कोर्ट कचेरीतून सुटका मिळेल. 


कर्क -  एखादे जुने आजारपण वर येईल

आज तुम्हाला एखाद्या जुन्या आजारपणातून सुटका मिळणार आहे. नवीन कामे करण्यासाठी उत्साही असाल. कुटुंबासोबत फिरायला जाण्याची संधी मिळेल. बिघडलेली कामे पुन्हा सुधारणार आहेत. प्रियकरासोबत प्रवासाला जाण्याचा योग आहे. 


सिंह - भावंडासोबत वाद होण्याची शक्यता 

आज तुमचे भावासोबत वाद होऊ शकतात. घाईत आणि रागात कोणताच निर्णय घेऊ नका. कदाचित तुम्हाला याचा पश्चाताप होऊ शकतो. व्यवसायात समस्या येण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी अधिक जबाबदारी वाढणार आहे. 

 

कन्या -  पैसे पर मिळतील

आज तुम्ही एखाद्या व्यक्तीला दिलेले पैसे परत मिळणार आहेत. प्रियकरासोबत खरेदी करण्यामध्ये व्यस्त व्हाल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात यश मिळेल. व्यावसायिकांसाठी प्रवासाला जाण्याचा योग आहे. 


तूळ - अस्वस्थता आणि चिडचिड वाढणार आहे

आज जुन्या आठवणींनी तुमचे मन अस्वस्थ होईल चिडचिड जाणवेल. सध्या तरी प्रवासाला जाणे टाळावे लागेल. आर्थिक स्थिती चांगली असेल. जोडीदाराची भावनिक साथ मिळेल. धार्मिक कार्यात आणि योगामध्ये रस वाढणार आहे. 


वृश्चिक -  विवाहात अडचणी दूर होतील

आज तुमच्या विवाहातील अडचणी दूर होतील. नवीन लोकांशी भेट फायदेशीर ठरेल. जोडीदारासोबत वेळ आनंदात जाईल. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढणार आहे.


धनु - कामात अडचणी येतील

आज  व्यवसायात तुमच्या समस्या वाढण्याची शक्यता आहे. कामात थोड्या अडचणी येण्याची शक्यता आहे. विरोधकांपासून सावध राहा. घरातील वृद्धांबाबत चिंता सतावेल. जोडीदाराची भावनिक साथ मिळेल. 


मकर -  मित्रांकडून महागड्या भेटवस्तू मिळतील

आज तुम्हाला मित्रांकडून महागडी भेटवस्तू मिळणार आहे. कामाच्या  ठिकाणी पदोन्नतीची शक्यता आहे. नवीन कामांमधू फायदा मिळेल.रचनात्मक कार्यात प्रगती होईल. धार्मिक कार्यांसाठी प्रवासाला जाल.

हे ही वाचा -

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

अधिक वाचा -

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

राशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव

तुम्ही 'या' राशीचे असाल, तर तुम्ही आहात भाग्यवान