19 मार्च 2020चं राशीफळ, मीन राशीसाठी आजचा दिवस फायद्याचा

19 मार्च 2020चं राशीफळ, मीन राशीसाठी आजचा दिवस फायद्याचा

मेष -  काम शोधणं कठीण जाईल

आज तुम्हाला नवीन काम शोधावं लागेल. नवीन कामाला सुरूवात करणं कठीण जाईल. कोर्ट कचेरीत यश मिळेल. आईवडीलांकडून धनसंपत्ती मिळण्याची शक्यता आहे. मित्रांसोबत मौजमस्ती कराल. 


कुंभ - पदोन्नतीत अडचणी येण्याची शक्यता आहे

आज कामाच्या ठिकाणी चुकीच्या व्यवहारामुळे पदोन्नतीत अडचणी येण्याची शक्यता आहे. व्यवसायात चुकीचे निर्णय घेणे नुकसानकारक ठरू शकते. प्रॉपर्टी खरेदी करण्यात अडचणी येऊ शकतात. सध्या बाहेर फिरायला जाणे टाळा. 


मीन-  कलाक्षेत्रातील व्यक्तींना फायदा

आज तुम्हाला कला आणि सिनेक्षेत्रातून चांगला फायदा मिळू शकतो. व्यवसायात राजकीय सहकार्याचा फायदा होईल. देणी घेणी सांभाळून करा. कुटुंबातील लोकांसोबत फिरायला जाणे टाळा. आरोग्याची काळजी घ्या. 


वृषभ - भावंडाना आरोग्य समस्या जाणवतील

आज तुमच्या भावाची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. धावपळ करावी लागणार आहे. जवळचे संबंध अधिक दृढ होतील. घरखर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. जुन्या त्रासातून सुटका मिळेल. 


मिथुन -  जुने संबंध पुन्हा दृढ होतील

आज तुमच्या नात्यातील जवळीक अधिक वाढणार आहे. जुनी नाती पुन्हा दृढ होतील. कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण कराल. जोडीदाराची भावनिक साथ मिळेल. व्यवसायातील कामे पूर्ण होतील. 


कर्क - रोजगारासाठी प्रयत्न करावे लागतील

आज तुम्हाला नोकरीसाठी प्रयत्न करावे लागतील. व्यवसायासाठी परदेशी जाण्याची संधी मिळेल. मुलांना मिळालेल्या यशामुळे उत्साह वाढेल. जोडीदाराशी नातं प्रेमाचं असेल. आर्थिक स्थिती मजबूत असेल


सिंह - महागडी वस्तू हरवण्याची शक्यता

आज तुमच्या मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्या. एखादी मौल्यवान वस्तू हरवण्याची शक्यता आहे. आर्थिक समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. कर्ज घेणे सध्या टाळा. जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका. मित्रांकडून खुशखबर मिळेल. 

 

कन्या -  मानसिक तणाव कमी होईल

आज तुमच्या एखाद्या जुन्या मानसिक समस्येतून तुम्हाला सुटका मिळणार आहे.आत्मविश्वासात वाढ होणार आहे. नवीन प्रॉपर्टी खरेदी कराल. धार्मिक कार्यातील रस वाढणार आहे. व्यवसायातील अडचणी कमी होण्याची शक्यता आहे. 


तूळ -  आईवडीलांशी मतभेद होतील

आज तुमचे तुमच्या आईवडीलांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी विरोधकांचा त्रास वाढणार आहे. धार्मिक कार्यात रस वाढेल. मुलांचे सहकार्य मिळणार आहे. 


वृश्चिक -  उत्पन्न वाढेल


आज तुम्हाला उत्पन्न वाढवण्याचे आणखी नवे साधन मिळेल. रखडलेले पैसे परत मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी सहकारी मदत करतील. मित्रांसोबत फिरायला जाण्याचा प्लॅन कराल. कुटुंबासोबत वेळ चांगला जाईल. 


धनु -  तणाव वाढणार आहे

आज तुमच्या कौटुंबिक समस्या वाढणार आहेत. एखाद्या वाईट बातमीने तणाव वाढू शकतो. कुटुंब आणि मित्रांची साथ मिळणार आहे. विरोधकांपासून सावध राहा. व्यवसायातील योजना पूर्ण होतील. 


मकर - आईवडीलांची चांगली साथ मिळेल

आज कठीण काळात तुम्हाला तुमच्या आईवडीलांची चांगली साथ मिळणार आहे. एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीची भेट होऊ शकते.नवीन व्यावसायिक सहकारी भेटण्याची शक्यता. कोर्ट कचेरीत यश मिळेल.

हे ही वाचा -

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

अधिक वाचा -

राशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव

जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात 'प्रेम'

जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात 'प्रेम'