2 मार्च 2020 चं राशीफळ, कर्क राशीच्या लोकांना नवीन वाहन खरेदीचा योग

2 मार्च 2020 चं राशीफळ, कर्क राशीच्या लोकांना नवीन वाहन खरेदीचा योग

मेष - आर्थिक संकट येण्याची शक्यता 

आज तुमच्यावर एखादे आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे. कर्ज घेणे टाळा. व्यवसायातील कामात अडचणी येतील. मुलांकडून आनंदवार्ता मिळेल. राजकारणातील रस वाढणार आहे.


कुंभ -  जोडीदारासोबत नाते दृढ होईल

आज मुलांची कर्तव्ये तुम्ही पूर्ण करणार आहात. जोडीदारासोबत नाते चांगले होईल. धनसंपत्तीबाबत चांगली बातमी मिळेल. कामाच्या ठिकाणी अधिकारी खुश असतील. कामासाठी प्रवास करावा लागेल. 


मीन-  मनासारखी पदोन्नती मिळेल

आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी मनासारखी पदोन्नती मिळणार आहे. व्यवसायातील योजना यशस्वी होतील. एखाद्या विशेष कामात यश मिळेल. जोडीदारासोबत लॉंग ड्राईव्हला जाण्याची योजना आखाल.

 

वृषभ - आरोग्यात हळूहळू सुधारणा होईल

आज तुमच्या आरोग्यात सुधारणा होणार आहे. आत्मविश्वास आणि उत्साह वाढणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत असेल. व्यावसायिक प्रवास करावा लागेल. देणी घेणी सावधगिरीने करा. जोडीदारासोबत नाते सुधारणा होणार आहे. 


मिथुन - नातेसंबंध बिघडणार आहेत

आज एखाद्या बाहेरच्या व्यक्तीमुळे तुमचं नातं बिघडण्याची शक्यता आहे. संपत्तीबाबत निर्णय घेण्याची घाई करू नका. कामाच्या ठिकाणी विरोधकांपासून सावध राहा. आर्थिक स्थिती मजबूत राहील.


कर्क -  नवीन वाहन खरेदी कराल

आज धनसंपत्तीच्या खरेदीसाठी चांगला दिवस आहे. नवीन वाहन खरेदी कराल. महत्त्वाची कामे पूर्ण होतील. जोडीदारासोबत लॉंग ड्राईव्हवर जाल. 

 

सिंह -  दुखापत होण्याची शक्यता आहे

आज तुमच्या पायाला दुखापत होण्याची शक्यता आहे. भावंडांकडून चांगली बातमी मिळेल. व्यवसायात चढ-उतार येण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल असेल. सामाजिक प्रतिष्ठा आणि धनसंपत्तीत वाढ होईल. 


कन्या -  एखाद्या व्यक्तीशी भेट होईल

आज तुमची एखाद्या खास व्यक्तीशी भेट होईल. जोडीदारासोबत मजबूत नाते होईल. कौटुंबिक आनंदी वातावरण असेल. कामाच्या  ठिकाणी पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायासाठी प्रवास करावा लागेल.


तूळ - व्यवसायातील कामे रद्द होण्याची शक्यता 

आज व्यवसायातील कामे रद्द होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अधिक मेहनत करण्याची गरज आहे. प्रेमसंबंधात सावध राहा. मित्रांकडून आनंदवार्ता मिळेल. रचनात्मक कार्यात प्रगती होण्याची शक्यता आहे. 


वृश्चिक - म्युच्युअल फंडात लाभ मिळेल

म्युचुअल फंडाबाबत काम करणाऱ्या लोकांना लाभ मिळणार आहे. चल-अचल संपत्ती खरेदीचा बेत आखाल. जोडीदारासोबत नाते मजबूत असेल. कोर्ट कचेरीतून सुटका मिळेल. 


धनु - नोकरीसाठी दगदग करावी लागेल

आज तुम्हाला मनासारखी नोकरी मिळवण्यासाठी दगदग करावी लागेल. व्यवसायात मेहनत जास्त आणि लाभ कमी मिळण्याची शक्यता आहे. रचनात्मक कार्यात प्रगती होण्याची शक्यता आहे. योगामध्ये रस वाढण्याची शक्यता आहे. 


मकर - मानसिक तणाव वाढण्याची शक्यता

आज तुमची अचानक तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. मानसिक ताण वाढू शकतो. अविवाहित लोकांना विवाहाचे प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी अधिकारी मदत करतील. सध्या प्रवासाच्या योजना आखू नका.